जगदीश काबरे
जगदीश काबरे | |
---|---|
जगदीश काबरे | |
टोपणनाव | जेट जगदीश |
जन्म | १ ऑक्टोबर, १९५१ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | लेखन, वक्तृत्व |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | वैज्ञानिक लेखन |
कार्यकाळ | शिक्षण काळापासून अद्यापपर्यंत |
विषय | सामाजिक आणि आत्मकथन |
प्रसिद्ध साहित्यकृती | शून्याचा प्रवास |
प्रभाव | गोपाळ गणेश आगरकर, गाडगेबाबा, प्रबोधनकार ठाकरे, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरूजी, वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले वि. दा. सावरकर, जयंत नारळीकर |
वडील | बन्सीलाल |
आई | ताराबाई |
पत्नी | माधुरी काबरे |
जगदीश काबरे (जन्म : १ ऑक्टोबर १९५१) हे वैज्ञानिक विषयांवर लेखन करणारे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी मराठी भाषेत ३६हून अधिक विज्ञानविषयक पुस्तके लिहिली आहेत. त्यांपैकी शून्याचा प्रवास या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.[ संदर्भ हवा ] जगदीश काबरे हे शाळेमध्ये विज्ञान विषयाचे शिक्षक आहेत.
प्रारंभिक जीवन
[संपादन]बालपण
[संपादन]शिक्षण
[संपादन]जगदीश काबरे हे बी.एस्सी. बी.एड. आहेत.[ संदर्भ हवा ]
अध्यापन व कार्य
[संपादन]या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
१) इ.स. १९७६ ते इ.स. १९७८ स्वामी मुक्तानंद शाळा, चेंबूर.
२) इ.स. १९७९ ते इ.स. १९८५ अफॅक इंग्लिश स्कूल, चेंबूर.
३) इ.स. १९८५नंतर नवी मुंबईतील अनेक शाळांमध्ये visiting शिक्षक म्हणून आजतागायत कार्यरत.
४) इ.स. १९८९ ते इ.स. १९९१मध्ये मुंबई दूरदर्शनवर 'विज्ञानके खेल' नावाची भारतभर प्रसारित होणारी मालिका हिंदीतून सादर केली.
५) इ.स. १९८४ ते इ.स. १९९२मध्ये शालेय चित्रवाणीत विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.
६) इ.स. १९८६ साली 'खगोल मंडळ' या संस्थेची मुंबईत स्थापना, संस्थापक अध्यक्षपद.
७) इ.स. १९८०पासून महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये 'विज्ञानातील जादूई खेळ' हा प्रयोगशील कार्यक्रम सादर करणे चालू आहे.
८) इ.स. १९८० ते इ.स. १९९४ दरम्यान आकाशवाणीवरून भाषणे, नाटिका,श्रुतिका आदी विविध कार्यक्रमांत सहभाग.
९) लोक विज्ञान संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मराठी विज्ञान परिषद, ग्रंथाली या संस्थामध्ये सक्रिय सहभाग.
१०) 'आदर्श शिक्षक' म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे इ.स. १९९६ साली सन्मानित.
११) नवी मुंबईतील अशोकपुष्प पब्लिकेशनतर्फे इ.स. २०१४ साली "समाजभूषण" पुरस्काराने सन्मानित..
१२) यशवंत रामकृष्ण प्रतिष्ठान तर्फे इ.स. १९८९ साली 'आदर्श शिक्षक' पुरस्कार मिळाला.
१३) आर्टिस्ट व्हिलेज सांस्कृतिक मंडळातर्फे इ.स. २००१ साली "आदर्श नागरिक" म्हणून सन्मानित केले गेले.
१४) जळगावच्या खानदेश शिक्षण सभेतर्फे इ.स. १९९० साली "विज्ञान प्रसारक" पुरस्कार मिळाला.
१५) ३६हून पुस्तके विज्ञानविषयक पुस्तके लिहिली. त्यांपैकी 'शून्याचा प्रवास' या पुस्तकाला इ.स. १९९४ साली शरद पवारांच्या हस्ते राज्य पुरस्कार मिळाला.
लिखित पुस्तके[ संदर्भ हवा ]
[संपादन]- अतूट नाते रक्ताचे
- अवकाशयात्रेची पूर्वतयारी
- असे का बरे !
- आज असं घडलंय : विज्ञान जगतात (माहितीपर)
- कालयंत्र
- केसवानी जी.एच. (चरित्र)
- चंद्रशेखर व्यंकट रमण (चरित्र)
- चंद्राची दुनिया
- ज्योतिषशास्त्रावर प्रकाशझोत
- फलज्योतिषाचा बोजवारा (संपादित)
- फलज्योतिषाचे मूल्यांकन (संपादित)
- माणसाला हवंय तरी काय (विज्ञानकथा)
- लपंडाव
- विज्ञान कुतूहल (सहलेखक - अरविंद कुलकर्णी)
- विज्ञानखेळ
- विज्ञानगोष्टी भाग १ ते ३
- विज्ञानाच्या खिडकीतून
- विज्ञान नाटुकली
- विज्ञाननिष्ठ निबंध
- विज्ञानाशी हितगुज
- वैज्ञानिक इसाप
- वैज्ञानिक धमाल
- शून्याचा प्रवास
- सत्यकथा
- साधेच की अदभुत
- हे विश्वचि माझे घर
पुरस्कार आणि सन्मान[ संदर्भ हवा ]
[संपादन]लोक विज्ञान संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ, मराठी विज्ञान परिषद, ग्रंथाली चळवळ यांमध्ये सक्रिय सहभाग. खगोल मंडळाचे संस्थापक.
- नवी मुंबई महानगर पालिकेकडून "उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन गौरव (इ.स. १९९७)
- चतुरंग प्रतिष्ठान (इ.स. १९८५)
- यशवंत रामकृष्ण प्रतिष्ठान (इ.स. १९८४)
- महाराष्ट्र शासनाचा शून्याचा प्रवास पुस्तक वर्षातील सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून पुरस्कार (प्रकाशन वर्ष इ.स. १९९३)
- विभागीय पातळीवर विज्ञान प्रदर्शनासाठी पुरस्कार इ.स. १९८३ व इ.स. १९८४
- समाज भूषण पुरस्कार अशोक पुष्प प्रकाशन इ.स. २०१४
- मुबंईच्या ब्राईट समूहाकडून चार्वाक पुरस्कार (दिनांक २६ मार्च २०१६) [१]