गजानन त्र्यंबक माडखोलकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
ग. त्र्यं. माडखोलकर
जन्म नाव गजानन त्र्यंबक माडखोलकर
जन्म २८ डिसेंबर १८९९
मुंबई
मृत्यू २७ नोव्हेंबर १९७६
धंतोली , नागपूर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कादंबरी
वडील त्र्यंबक माडखोलकर
अपत्ये चंद्रशेखर माडखोलकर , मीनाक्षी फडणीस.
पुरस्कार

साहित्य अकादमी पुरस्कार

('भारतीय साहित्यशास्त्र'या पुस्तकासाठी)

गजानन त्र्यंबक माडखोलकर (जन्म : मुंबई, डिसेंबर २८, १८९९ - मृत्यू : नागपूर, नोव्हेंबर २७, १९७६) हे मराठी लेखक, कवी, पत्रकार व समीक्षक होते. आपल्या वाङ्‌मयीन कारकीर्दीच्या आरंभकाळात माडखोलकरांनी काही संस्कृत-मराठी कविता केल्या होत्या. रविकिरण मंडळाचे ते सदस्य होते. त्या मंडळाच्या १९२४ साली प्रकाशित झालेल्या ’उषा’ ह्या काव्यसंग्रहात त्यांच्या काही कविता आहेत.

ग.त्र्यं. माडखोलकर हे १९४६मध्ये बेळगाव येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. याच संमेलनात संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा ठराव पहिल्यांदा पास झाला.

पूर्वायुष्य[संपादन]

गणित या विषयात गती नसल्याने माडखोलकर मॅट्रिकच्या परीक्षेत नापास झाले, आणि त्यानंतर वयाच्या १८व्या वर्षीच त्यांनी शाळा कायमची सोडली. मात्र माडखोलकरांचे मराठी, इंग्रजी आणि संस्कृत वाङ्मयाचे वाचन चालूच राहिले. केवळ आवड म्हणून माडखोलकरांनी इटली आणि आयर्लंडच्या इतिहासांचे अध्ययन केले..

न.चिं. केळकरांचे लेखनिक, भारतसेवक समाजातील एक कर्मचारी, पुण्याच्या ’दैनिक ज्ञानप्रकाश’चे विभागसंपादक, नागपूरच्या ’दैनिक महाराष्ट्र’चे साहाय्यक संपादक अशा विविध नोकर्‍या केल्यानंतर नागपूरच्या ’तरुण भारत’ ह्या दैनिकाचे प्रमुख संपादक म्हणून १९४४ ते १९६७ पर्यंत उत्तम प्रकारे काम केल्यावर ते निवृत्त झाले.

भारताच्या १९३० व १९४२ च्या स्वातंत्र्य-आंदोलनात, तसेच १९४६ नंतरच्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात माडखोलकरांनी सक्रिय भाग घेतला होता. आपली लेखणी व वाणी त्यांनी त्यासाठी उपयोगात आणली. हिंदी भाषेच्या प्रचार व प्रसाराबाबतही ते प्रयत्नशील होते. दलित साहित्य चळवळीकडे ते आत्मीयतेने पाहात. त्यांचा पत्रव्यवहारही महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने मोलाचा आहे.

लेखन[संपादन]

 • वयाच्या १९व्या वर्षी ग.त्र्यं माडखोलकरांनी लिहिलेला ’केशवसुतांचा संप्रदाय’ या नावाचा लेख ’साप्ताहिक नवयुग’मध्ये प्रसिद्ध झाला आणि नावाजला गेला.
 • वयाच्या २१व्या वर्षी माडखोलकर साप्ताहिक ’केसरी’मध्ये राजकीय विषयांवरील लेख लिहू लागले. त्यांचे पहिले चार लेख आयर्लंडमधील Sinn Féin या चळवळीसंबंधी होते.
 • वयाच्या २२व्या वर्षी माडखोलकरांना ’आधुनिक कविपंचक’ नावाचा समीक्षा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामुळे त्यांना कमालीची प्रसिद्धी मिळाली.
 • ग.त्र्यं. माडखोलकरांचे १० समीक्षा ग्रंथ, १८ कादंबर्‍या, ६ एकांकिका, २ लघुकथासंग्रह आणि काही कविता आहेत. त्यांच्या अनेक कादंबर्‍या राजकीय विषयांवर आहेत. त्यांच्या कादंबर्‍यांतून गांधीवादी विचारसरणीला विरोध, सशस्त्र क्रांतीबद्दलचे प्रेम आणि समाजवादाचा अंधुक पुरस्कार आढळतो.

कादंबर्‍या[संपादन]

 • अनघा
 • उद्धार
 • ऊर्मिला
 • कांता
 • चंदनवाडी
 • डाक बंगला
 • दुहेरी जीवन
 • नवे संसार
 • नागकन्या
 • प्रमद्वरा
 • भंगलेलें देऊळ
 • मुक्तात्मा
 • मुखवटे
 • रुक्मिणी
 • शाप
 • श्रीवर्धन
 • सत्यभामा
 • स्वप्नांतरिता

लघुकथासंग्रह[संपादन]

 • रातराणीची फुले
 • शुक्राचे चांदणे

नाटके[संपादन]

 • देवयानी

ललित आणि राजकीय लेखसंग्रह[संपादन]

 • अवशेष
 • जीवनसाहित्य
 • परामर्श
 • महाराष्ट्राचे विचारधन
 • माझी नमोवाणी
 • माझे आवडते लेखक
 • माझे लेखनगुरू
 • विलापिका
 • विष्णु कृष्ण चिपळूणकर : टीकात्मक निबंध
 • स्वैरविचार

व्यक्तिचित्रणे[संपादन]

 • व्यक्तिरेखा
 • व्यक्ती तितक्या प्रकृती
 • श्रद्धांजली

आत्मचरित्रपर[संपादन]

 • एका निर्वासिताची काहणी
 • दोन तपे
 • मी आणि माझे वाचक
 • मी आणि माझे साहित्य
 • मृत्युंजयाच्या सावलीत

प्रवासवर्णनपर[संपादन]

 • मी पाहिलेली अमेरिका

समीक्षा ग्रंथ[संपादन]

 • भारतीय साहित्यशास्त्र