शाहिस्तेखान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


शाइस्ताखानाचे मूळ नाव अबू तालिब. तो तुर्कस्तान चा नवाब होता. मिर्झा अमीर उल् उमरा हैबतजंग नबाब शाहिस्तेखान अबू तालिब हे त्याचे पदव्यांसकट नाव होते. तो मुघल सम्राट औरंगजेबाचा मामा होता.

शाइस्तेखान दख्खनचा सुभेदार असताना शिवाजीच्या स्वराज्यावर स्वारी करून पुण्यात आला होता. त्यापू्र्वी त्याच्या बलाढ्य फौजेने ५६ दिवस लढून चाकणचा किल्ला घेतला होता. पुण्यात आल्यावर शाहिस्तेखान जनतेवर अन्याय करून अत्याचार व लुटालूट करत होता. शिवाजी महाराजांनी धाडसाने इ स १६६३मध्ये मध्यरात्री लाल किल्ल्यात घुसून त्याच्यावर हल्ला केला. तो हल्ल्यातून बचावला, पण त्याची तीन बोटे छाटली गेली आणि पुऱ्या मोगल राजवटीची अब्रू गेली. पुढे हाच शाइस्तेखान मरेपर्यंत बंगालचा सुभेदार होता. त्याचे थडगे बांगलादेशमधील ढाका शहरात आहे. शिवरायांची कीर्ती आणि पराक्रम आग्ऱ्यापासून ते तंजावर-जिंजीपर्यंत आणि गुजरातपासून ते बंगालपर्यंत होती, याचा बंगालचा सुभेदार शाहिस्तेखान हा भक्कम पुरावा आहे.

शाहिस्तेखानावरील पुस्तके[संपादन]