दिलीप प्रभावळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
दिलीप प्रभावळकर
जन्म जन्म दिनांक, 1944
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, मराठी नाटके, इंग्रजी नाटके
कारकीर्दीचा काळ १९७२ - चालू
भाषा मराठी, हिंदी, इंग्रजी
प्रमुख नाटके वासूची सासू, एक झुंज वार्‍याशी, नातीगोती, हसवाफसवी
प्रमुख चित्रपट एक डाव भुताचा
चौकट राजा
झपाटलेला
रात्र आरंभ
सरकारनामा
लगे रहो मुन्नाभाई
प्रमुख टीव्ही कार्यक्रम चिमणराव, झोपी गेलेला जागा झाला, श्रीयुत गंगाधर टिपरे
पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार
महाराष्ट्र राज्य पुरस्कार
राजीव गांधी पुरस्कार
नाट्यदर्पण,
म. टा. सन्मान

ओळख[संपादन]

दिलीप प्रभावळकर हे मराठी नाट्य-चित्रसृष्टीतील चतुरस्र व्यक्तिमत्त्व आहे. प्रभावळकर हे रंगभूमी व चित्रपटांमध्ये अभिनय तर करतातच पण ते एक लेखकही आहेत.

जीवन[संपादन]

उल्लेखनीय[संपादन]

कार्य[संपादन]

दिलीप प्रभावळकर यांची भूमिका असलेले मराठी चित्रपट[संपादन]

दिलीप प्रभावळकर यांची भूमिका असलेले हिंदी चित्रपट[संपादन]

दिलीप प्रभावळकर यांचे इंग्रजी चित्रपट[संपादन]

दिलीप प्रभावळकर यांची भूमिका असलेली मराठी नाटके[संपादन]

दिलीप प्रभावळकर यांची भूमिका असलेले मराठी दूरचित्रवाणी कार्यक्रम[संपादन]

दिलीप प्रभावळकर यांची भूमिका असलेल्या हिंदी दूरचित्रवाणी मालिका[संपादन]

एकपात्री[संपादन]

दिलीप प्रभावळकर हे 'चिमणराव ते गांधी' हा एकपात्री प्रयोग सादर करतात.

या एकपात्रीतून 'चिमणराव' या मुंबई दूरदर्शनवरील लोकप्रिय मालिकेपासून सुरू झालेला प्रभावळकरांच्या कारकिर्दीचा प्रवास दृक-श्राव्य माध्यमातून उलगडत जातो. काही दुर्मीळ दृश्यफिती, प्रत्येक व्यक्तिरेखा सादर करताना अभिनेता म्हणून करावी लागलेली तयारी, संबंधित भूमिका साकारताना घडलेल्या रंजक कथा, मोजक्या भूमिकांचे उत्स्फूर्त सादरीकरण आणि कलाकार म्हणून घडविणारे, समृद्ध करणारे अनुभव... असे प्रभावळकरांच्या व्यक्तिरेखेचे अनेक अनवट पैलू या एकपात्रीच्या निमित्ताने सामोरे येतात.. चिमणराव, चेटकीण, नाना कोंबडीवाला, 'नातीगोती' नाटकातील काटदरे, 'चौकट राजा'मधील नंदू, 'सरकारनामा'मधील अण्णा यासारख्या अनेक व्यक्तिरेखा प्रभावळकर यांनी नर्मविनोदी शैलीत उलगडतात. तसेच, त्या भूमिका साकारतानाचे किस्से अन् काही संवेदनशील आठवणी सांगत ते प्रेक्षकांना अंतर्मुख करतात.

दिलीप प्रभावळकर लिखित पुस्तके[संपादन]

एकांकिका स्पर्धा[संपादन]

दिलीप प्रभावळकर यांच्या नावाच्या एकांकिका स्पर्धा आहेत. त्या पहिल्यांदा १०-१२ फेब्रुवारी २०११ या काळात मुंबईत झाल्या.

पुरस्कार[संपादन]

  • पुलोत्सवातर्फे देण्यात आलेला पुलं स्मृती सन्मान (२०१५)
  • सर्वोत्कृष्ट उगवता कलावंत पुरस्कार (प्रेमकहाणीसाठी) (१९७२)
  • महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार
  • नटवर्य मामा पेंडसे पुरस्कार
  • नटसम्राट गणपतराव भागवत पुरस्कार
  • गांधींच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पारितोषिक
  • संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार
  • 'बाल साहित्य' पुरस्कार. ('बोक्या सातबंडे' या पुस्तक-मालिकेसाठी)

[१]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

https://www.timeoutmumbai.net/film/features/interview-dilip-prabhavalkar

  1. http://www.misalpav.com/node/19839