विष्णू सखाराम खांडेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वि.स. खांडेकर
Vi sa khandekar.jpg
विष्णू सखाराम खांडेकर
जन्म नाव विष्णू सखाराम खांडेकर
जन्म जानेवारी १९, १८८९
मृत्यू सप्टेंबर २, १९७६
कार्यक्षेत्र कादंबरीकार
भाषा मराठी
साहित्य प्रकार कादंबरी
प्रसिद्ध साहित्यकृती ययाति
वडील सखाराम खांडेकर
पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार (ययाति १९७४ )

विष्णू सखाराम खांडेकर (जानेवारी १९, १८८९ - सप्टेंबर २, १९७६) हे मराठी कादंबरीकार, लेखक होते.

पूर्वायुष्य[संपादन]

 • वि. स. खांडेकर यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यामध्ये झाला. त्यांच्या पूर्वायुष्यात, त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती. वि.स.खांडेकरांचे लेखन ध्येयवादी आहे. अंत:करणात समाजकल्याणाची व प्रगतीची तळमळ आहे. ललित भाषा रम्य कल्पना, कोटीबाजपणा व समाजहिताचा प्रचार ही त्यांच्या लघुकथेची वैशिष्ट्ये आहेत. कल्पनाशक्ती अतिशय तल्लख आणि तेजस्वी. ले

खनातून मनोरंजन करण्याबरोबर समाजजीवनावर भाष्य करणे हे त्यांच्या लेखनाचे स्वरूप होते. खांडेकरांच्या लेखनातून माणुसकीचा गहिवर दिसून येतो. त्यंच्या लेखनातून माणसावरील अपार श्रद्धा व्यक्त होते. रूपक कथा हा नवा प्रकार त्यांनी रुढ केला. रचनाकौशल्यतंत्रनिपुणता त्यांच्या कथेत आढळून येत नाही, पण कथालेखनातून व्यक्त होणारे जीवनदर्शन आणि धेयनिष्ठा वाचकांना प्रभावित करतात, म्हणूनच तर वि.स.खांडेकर हे जीवनवादी लेखक म्हणून ओळखले जातात.

व्यावसायिक आणि साहित्यिक आयुष्य[संपादन]

 • इ.स. १९२० साली खांडेकरांनी शिरोडे या गावी ( सिंधुदुर्ग, महाराष्ट्र ) शिक्षकी पेशास सुरुवात केली.
 • तेथे त्यांनी इ.स. १९३८ पर्यंत काम केले. ह्या काळात मिळालेल्या फावल्या वेळेत त्यांनी मराठी साहित्यातील निरनिराळ्या प्रकारांमध्ये मोलाचे योगदान दिले.
 • आपल्या आयुष्यात त्यांनी १६ कादंबर्‍या, ६ नाटके, जवळपास २५० ललितलेख, १०० निबंध आणि कित्येक टीकाटिपण्या लिहिल्या.

पुरस्कार[संपादन]

खांडेकर लिखित[संपादन]

 • ययाति
 • हृदयाची हाक ( १९३० )
 • कांचनमृग ( १९३१ )
 • उल्का ( १९३४ )
 • दोन मने ( १९३८ )
 • हिरवा चाफा ( १९३८ )
 • दोन ध्रुव ( १९३४ )
 • रिकामा देव्हारा ( १९३९ )
 • पहिले प्रेम ( १९४० )
 • क्रौंचवध ( १९४२ )
 • जळलेला मोहर ( १९४७ )
 • पांढरे ढग ( १९४९ )
 • अमृतवेल
 • सुखाचा शोध
 • अश्रू
 • सोनेरी स्वप्ने भंगलेली

बाह्यदुवे[संपादन]