आबा गोविंदा महाजन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आबा गोविंद महाजन या पानावरून पुनर्निर्देशित)
आबा गोविंदा महाजन

आबा गोविंदा महाजन (जन्म : १९७५) हे मराठी भाषेतील लेखक आहेत. प्रामुख्याने बालसाहित्यासाठी त्यांची ख्याती आहे. त्यांची १३ पुस्तके व ८ पोस्टर कविता प्रकाशित झाल्या आहेत. त्यांना महराष्ट्र राज्य शासनाचे ३ पुरस्कार मिळाले आहेत

आबा महाजन यांनी बालकथा. बालकादंबरी, बालकविता, बालनाट्य व मुलांसाठी ललित लेखन असे बालसाहित्यातल्या सर्व प्रकारांचे लेखन प्रकाशित आहे.

'मन्हा मामाना गावले जाऊ 'हा महाराष्ट्रातील पहिला अहिराणी बालकविता संग्रह त्यांच्या नावावर आहे. अहिराणी व मराठी असा द्वैभाषिक प्रयोग या पुस्तकात केलेला आहे.

'मन्हा गावले' हा संपूर्ण अहिराणी बालकविता संग्रह प्रकाशित असून हा कवितासंग्रह स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ मराठी विभागाच्या एम ए साठी अभ्यासक्रमात समाविष्ट आहे त्यांच्या अनेक कथा/कविता इतर भाषांत अनुवादित झाल्या असून त्यांपैकी काहींचा पाठ्य पुस्तकांत, विद्यापीठ अभ्यासक्रमांत समावेश झाला आहे.

आबा गोविंदा महाजन हे महाराष्ट्र सरकारच्या महसूल खात्यात अधिकारी आहेत.

आबा गोविंदा महाजन यांची पुस्तके[संपादन]

  • गमतीदार खेळांचा खजिना
  • गंमतीच्या राज्यात
  • चिऊचा मोबाईल
  • ठोंब्या (कादंबरी)
  • प्रेम बीम (कवितासंग्रह)
  • मन्हा गावले (बालकविता संग्रह)
  • मन्हा मामाना गावले जाऊ
  • मी माझ्याच बायकोचा (कवितसंग्रह)
  • शेखचिल्लीची फुल २ धमाल
  • हिप हिप हुर्रे (कवितासंग्रह)

बाह्य दुवे[संपादन]