अतुल कहाते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अतुल कहाते (जन्म : १९७३ - हयात) हे मराठी माहितीतंत्रज्ञ व लेखक आहेत.

लेखन[संपादन]

Broom icon.svg
या लेखातील किंवा विभागातील काही मजकुर जाहिरातसदृष्य आहे.अथवा विशीष्ट वस्तुचे मुल्य नमूद केले गेले आहे. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.
मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.

मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.



आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.

संदेश = कृपया या बाबतचे आपले मत [[::अतुल कहाते|चर्चापानावर]] नोंदवा.


संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, विज्ञान, अर्थशास्त्र, क्रिकेट, करिअर मार्गदर्शन या विषयांवर त्यांनी मराठी वृत्तपत्रांमधून व नियतकालिकांमधून विपुल लिखाण केले आहे. ओघवत्या शैलीत विषयाची सखोल माहिती सोप्या पद्धतीने वाचकांपर्यंत पोचवण्याचे वैशिष्ट्य त्यांच्या लेखनशैलीत आढळते. त्यांनी इंग्रजीमध्ये २३ पुस्तके लिहिली असून, ती जगभरात पाठ्यक्रमातही वापरली जातात. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ते आयआयटी, सिंबायोसिस, इंदिरा, फर्ग्युसन, गरवारे अशा अनेक नामांकित महाविद्यालयांमध्ये `गेस्ट लेक्चरर` म्हणून अनेक विषयांवर व्याख्याने देतात. लोकसत्ता, सकाळ, महारा‌ष्ट्र टाइम्स, लोकप्रभा, सामना, साधना, साप्ताहिक सकाळ, तरुण भारत अशा अनेक प्रकाशनांमधून त्यांचे नियमित ले़खन सुरु असते. आयबीएन लोकमत, साम मराठी या टीव्ही चॅनेल्सवर त्यांचे अनेक कार्यक्रम होत असतात.

अतुल कहाते यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • अणुऊर्जा
  • अणुबॉम्ब
  • अमेरिकी राष्ट्रपती
  • Operating Systems (इंग्रजी, सहलेखक अच्युत गोडबोले)
  • आय.टी. गाथा
  • आय.टी.तच जायचंय (सहलेखक - डॉ. श्रीराम गीत , विवेक वेलणकर)
  • इंटरनेट वापरातील धोके टाळण्यासाठी
  • Introduction to Database Management Systems (इंग्रजी)
  • It Happens Only In I.T. (इंग्रजी)
  • XML and Related Technologies (इंग्रजी)
  • कहाणी 'फ्ल्यू' ची - इन्फ्ल्यूएन्झा ते स्वाइन फ्ल्यू
  • केवळ ‘आयटी’.तच
  • क्रिकेट कसं खेळावं
  • Cryptography and Network Security (इंग्रजी)
  • गुलाम - स्पार्टाकस ते ओबामा (सहलेखक अच्युत गोडबोले)
  • ‘च’ची भाषा
  • तुमचे आमचे झुंजार क्रांतिकारी फिडेल कॅस्ट्रो
  • ट्‌विटर
  • Data Communications And Networks (इंग्रजी, सहलेखक अच्युत गोडबोले)
  • तंत्रज्ञानाचा ओव्हरलोड
  • ध्यास जिंकण्याचा (मूळ लेखिका - साइना नेहवाल, मराठी अनुवाद - अतुल कहाते)
  • तुमचे आमचे सुपर हिरो - नारायण मूर्ती
  • पॅलेस्टाईन इस्रायल - एका अस्तित्वाचा संघर्ष
  • पैसा
  • फिडेल कॅस्ट्रो
  • बखर इंटरनेटची
  • बखर मोबाईल फोनची
  • बिल गेट्सचे मायक्रोसॉफ्ट
  • बोर्डरूम (सहलेखक अच्युत गोडबोले)
  • महामंदीच्या उंबरठ्यावर
  • महामंदीतून सुटका
  • महामंदी समजून घेताना
  • यांनी जग बदललं - अॅमेझॉन
  • यांनी जग बदललं - गुगल
  • यांनी जग बदललं - फेसबुक
  • रहस्य वंशवेलीचे
  • वर्णद्वेष संपवणारा युगपुरुष नेल्सन मंडेला
  • वॉरेन बफे
  • Web Technologies (सहलेखक - अच्युत गोडबोले)
  • संकट आयसिसचे
  • सुपर हिरो - अमर्त्य सेन
  • तुमचे आमचे सुपर हिरो - नारायण मूर्ती
  • स्टीव्ह जॉब्ज - एक झपाटलेला तंत्रज्ञ! (सहलेखक - अच्युत गोडबोले)

बाह्य दुवे[संपादन]