Jump to content

सारसबाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सारस बाग या पानावरून पुनर्निर्देशित)
सारसबागेतील गणपतीमंदिर

तळ्यातला गणपती असलेले सारसबाग हे उद्यान पुण्यातील एक महत्त्वाचे पर्यटन आकर्षण आहे. पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या या बागेतील गणपती पेशव्यांचे पूजास्थान होता.

श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत पर्वतीच्या पायथ्याशी सन १७५० साली आंबील ओढयाच्या सीमेवर एक कृत्रिम तलाव तयार करण्याचे काम सुरू झाले. तलावाचे काम सन १७५० ते १७५३ या कालावधीपर्यंत चालले होते. त्या तलावाचे क्षेत्र अंदाजे २५ एकर एवढे विस्तीर्ण होते. या तलावाचा उपयोग नौकाविहारासाठी करण्यात येत होता. तलावात सारस पक्षी सोडले होते. तलावाच्या कामाची खोदाई करीत असताना तलावामध्ये अंदाजे २५००० चौरस फुटाचे बेट तयार करून ते मंदिर व बाग-बगीचा तयार करण्याकरिता राखून ठेवण्यात आले. त्या नंतर बेटावर सुंदर बाग तयार करण्यात येऊन श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी या बागेला काव्यात्मक ' सारस बाग ' असे नाव ठेवले.

श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी सन १७८४ साली तलावाच्या बेटावर छोटेसे मंदिर बांधून तेथे आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक गजाननाची स्थापना केली. साहजिकच पर्वती, सारस बाग आणि तलाव ही पुणेकरांची फिरावयास येण्याची व देवदर्शनाची ठिकाणे झाली.

स्वातंत्र्यपूर्व काळात सन १८६१ च्या सुमारास शहरातील अनेक जागा पुणे नगरपालिकेकडे देण्यात आल्या . त्यावेळी गणपती मंदिराचे बेट सोडून तलावाची जागा मुंबई सरकारने पुणे नगरपालिकेकडे हस्तांतरित केली. पुणे नगरपालिकेकडून साधारण सन १९६६ साली तलावाचे जागेत उद्यान विकसित करण्यात आले.

अन्य माहिती[संपादन]

थोरले माधवराव पेशवे यांनी हैदर‍अल्लीच्या स्वारीवर जाताना दृष्टान्त झाल्यावरून या तळ्यात गणपतीची स्थापना केली, असे म्हणतात (?). गणपतीची मूर्ती संगमरवरी व उजव्या सोंडेची असून भोवताली भव्य सभामंडप व प्रदक्षिणा मार्ग आहे.

चित्रदालन[संपादन]