सुधीर गाडगीळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सुधीर गाडगीळ
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
ख्याती मुलाखतकार
धर्म हिंदू
पुरस्कार ग.दि.मा. पुरस्कार
पुण्यभूषण पुरस्कार[१], महाराष्ट्र वैभव सन्मान (१ मे २०१७)
संकेतस्थळ
http://www.sudhirgadgil.com/

सुधीर गाडगीळ ( , पुणे - हयात) हे मराठी संचालक, निवेदक, मुलाखतकार, लेखक, पत्रकार [२] आहेत.[ चित्र हवे ] त्यांनी विविध क्षेत्रांतील २८००हून अधिक नामवंत व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. या मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर, अभिनेत्री माधुरी दीक्षित, चित्रकार मकबूल फिदा हुसेन, गायक आशा भोसले, व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण इत्यादींचा समावेश आहे.[३]

सुधीर गाडगीळ यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

 • झगमगत्या दुनियेत (ललित लेखसंग्रह)
 • ताजंतवानं (ललित लेखसंग्रह)
 • तो ती (वेगवेगळी नाती, त्यातील बंध यांतील मौज सांगणाऱ्या लेखांचा संग्रह)
 • मानाचं पान (प्रस्थापितांच्या खाण्याच्या आवडीनिवडींविषयी)
 • मुद्रा (ललित लेखसंग्रह)
 • लाइफ स्टाइल (व्यक्तिचित्रे)

पुरस्कार आणि सन्मान[संपादन]

 • बासरीवादक अजित सोमण स्वरशब्दप्रभू पुरस्कार ( ५-८-२०१७)
 • आचार्य अत्रे पुरस्कार (२००२)
 • इंद्रधनू संस्थेतर्फे निवेदनाची पंचविशी आणि वयाची पन्नाशी पूर्ण केल्याबद्दल आशा भोसले यांच्या हस्ते सत्कार (डिसेंबर २०००)
 • कॉसमॉस पुरस्कार (२०००)
 • गदिमा पुरस्कार (२००४)
 • श्रीमंत दगडूशेठ गणपती पुरस्कार (१९९६)
 • दगडूशेठ दत्त कृतज्ञता पुरस्कार (१९९९)
 • नाट्यदर्पण पुरस्कार (१९९९)
 • पुण्यभूषण पुरस्कार (२०१३)
 • हुतात्मा बाबू गेनू पुरस्कार (१९९७)
 • बाळ ठाकरे यांच्या हस्ते निवेदनासारख्या वेगळ्या कारकीर्द मध्ये २५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल पुण्यात भव्य नागरी सत्कार (एप्रिल २०००)
 • मटा सन्मान पुरस्कार (२००३)
 • महाराष्ट्र वैभव सन्मान (१-५-२०१७)
 • माध्यमरत्‍न पुरस्कार (२००१)
 • मुंबई मराठी पत्रकार संघाचा ललित लेखनासाठी विद्याधर गोखले पुरस्कार (२००८)
 • Lion Excellence Award (२००३)

संदर्भ[संपादन]