गिरीश कुबेर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गिरीश कुबेर
जन्म गिरीश कुबेर
अज्ञात
निवासस्थान मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा
  • लेखक
  • संपादक
  • पत्रकार
मालक एक्स्प्रेस समुह
प्रसिद्ध कामे द टाटास् (The Tatas)
ख्याती लोकसत्ता अग्रलेख
धर्म हिंदू

गिरीश कुबेर (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे मराठी पत्रकार, लेखक आणि संपादक आहेत. ते विशेषतः लोकसत्ताच्या अग्रलेखांसाठी लोकप्रिय आहेत.

आंतरराष्ट्रीय अर्थकारण, राजकारण हे त्यांचे विशेष अभ्यासाचे विषय आहेत. सन २०१०पासून ते लोकसत्ताचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. लोकसत्तात येण्यापूर्वी ते इकॉनॉमिक टाईम्समध्ये राजकारण शाखेचे संपादक होते.

कुबेर हे लोकसत्ताचे संपादक असून इंडियन एक्सप्रेसमध्ये नेहमी लिहितात. ते The Tatas: How a Family Built a Business and a Nation चे लेखक आहेत, ज्याने 2019 मध्ये गजा कॅपिटल बिझनेस बुक प्राइज जिंकला आहे.[१] त्यांनी मराठीत सहा पुस्तकेही लिहिली आहेत. ते मुंबईत राहतात.

वाद-विवाद[संपादन]

  • अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर कुबेर यांनी ' बळीराजाची बोगस बोंब हा अग्रलेख १६ डिसेंबर २०१४ रोजी लिहिला, ज्यावर शेतकरी संघटना सह सर्वपक्षीय नेत्यांनी निषेध नोंदवत टीका केली होती. निषेधाचा ठराव संमत झाल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'यापुढे अशा प्रकारे लेखन वृत्तपत्रातून होणार नाही याबाबत सूचना केल्या.'[२][३]
  • असंतांचे संत नावाच्या अग्रलेखात कुबेर यांनी मदर तेरेसा यांच्यावर केलेल्या टीकेवर वाद उफळल्यावर त्यांनी यावर माफी मागत १९ मार्च २०१६ रोजी संबंधित लेख मागे घेतला.[४][५]
  • कुबेर यांच्यावर वाङ्मयचौर्याचे आरोप आहेत.[६]
  • 'रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकात कुबेर यांनी छत्रपती संभाजी राजे आणि महाराणी सोयराबाई यांच्या बद्दल केलेल्या लिखाणाबद्दल त्यांच्यावर शिवसेना, भारतीय जनता पक्ष तसेच संभाजी ब्रिगेड सहित अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांनी प्रखर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अमोल कोल्हे यांनी कुबेर यांना पत्र लिहून संबंधित लिखाण मागे घेण्याची मागणी केली.[७] तर शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी छत्रपती यांनी 'या पुस्तकावर देशात आणि राज्यात बंदी घालावी' अशी राज्य सरकार कडे मागणी करत कुबेर यांना 'महाराष्ट्रात फिरु देणार नाही' असा इशारा देखील दिला.[८] याशिवाय संभाजी ब्रिगेड या संघटनेने त्यांच्यावर शाई फेक देखील केली.[९] या प्रकरणी राजे शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि भाजपा युवा मोर्चाचे महेश पवळे यांनी कुबेर यांच्या विरोधात २६ मे २०२१ रोजी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली.[१०]

प्रकाशित साहित्य[संपादन]

शीर्षक प्रकाशन प्रकाशन दिनांक (इ.स.) भाषा साहित्यप्रकार
अधर्मयुद्ध राजहंस प्रकाशन मराठी ललितेतर
एका तेलियाने राजहंस प्रकाशन डिसेंबर, इ.स. २००८ मराठी ललितेतर
टाटायन राजहंस प्रकाशन जानेवारी इस २०१५ मराठी ललितेतर
युद्ध जिवांचे राजहंस प्रकाशन ऑगस्ट, इ.स. २०१० मराठी ललितेतर
हा तेल नावाचा इतिहास आहे राजहंस प्रकाशन जून, इ.स. २००६ मराठी ललितेतर
पुतिन: महासत्तेच्या इतिहासाचे अस्वस्थ वर्तमान राजहंस प्रकाशन २०१७ मराठी ललितेतर

पुरस्कार[संपादन]

  • मारवाडी फाऊंडेशनचा प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार (२५-११-२०१७)

संदर्भ[संपादन]

  

  1. ^ "Girish Kuber". HarperCollins Publishers India. 2022-05-06 रोजी पाहिले.
  2. ^ "'बोगस बोंब मारायला आमचा 'बळीराजा' कुबेर नाही' - आव्हाड". झी न्यूज मराठी. २८ फेब्रुवारी २०२४ रोजी पाहिले.
  3. ^ "ही तर बुद्धीभ्रमाची बद्धकोष्टता!". www.baliraja.com. २८ फेब्रुवारी २०२४ रोजी पाहिले.
  4. ^ "एक बड़े अखबार के संपादक ने इस एडिटोरियल के लिए मांगी माफी". www.samachar4media.com. Archived from the original on २५ फेब्रुवारी २०२५. २५ ऑगस्ट २०२० रोजी पाहिले.
  5. ^ "असंतांचे संत". Archived from the original on २५ सप्टेंबर २०२१.
  6. ^ "Loksatta editor Girish Kuber plagiarises Marathi editorial from a blog post". OpIndia (इंग्रजी भाषेत). 2020-05-16. 2021-03-11 रोजी पाहिले.
  7. ^ "पत्रकार गिरीश कुबेरांच्या पुस्तकात आक्षेपार्ह मजकूर, राष्ट्रवादी, भाजप, संभाजी ब्रिगेड आक्रमक, बंदीची मागणी". टीव्ही ९ मराठी. २८ फेब्रुवारी २०२४ रोजी पाहिले.
  8. ^ "गिरीश कुबेरांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही', वादग्रस्त पुस्तकावरुन संभाजी छत्रपती संतप्त". टीव्ही ९ मराठी. २८ फेब्रुवारी २०२४ रोजी पाहिले.
  9. ^ "गिरीश कुबेर यांना का 'काळं फासलं'? असं काय लिहिलंय त्यांनी संभाजी महाराज यांच्याविषयी?". झी न्यूज मराठी. २८ फेब्रुवारी २०२४ रोजी पाहिले.
  10. ^ "गिरीश कुबेर यांच्या विरोधात पोलिसात पहिली तक्रार, पुण्यात भाजपकडून तक्रार अर्ज दाखल". टीव्ही ९ मराठी. २८ फेब्रुवारी २०२४ रोजी पाहिले.