रँडचा खून

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Info talk.png
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.


१९व्या शतकाअखेरीस पुण्यात प्लेगने थैमान घातले. प्लेगला आळा घालण्याच्या निमित्ताने विल्यम चार्ल्स रॅन्ड या बिटिश अधिकाऱ्याने लोकांचा छळकेला. हिंदूंची घरे उपसून जाळणे, देवघरात जाऊन देवांचा अपमान करणे, तपासणीच्या नावाखाली महिलांशी अभद वर्तन करणे, कर्त्या पुरुषांना नामर्दाप्रमाणे हीन वागवणे अशा त्याच्या क्रूर आणि अमानवी कृत्यांमुळे समाजाच्या सर्वच थरांमध्ये संतापाची लाट उसळली. सूडाची ठिणगी मनात पडली आणि धगधगू लागली होती.

राष्ट्र आणि धर्मप्रेमाच्या या जाज्ज्वल्य भावनेतूनच चापेकर बंधू रँडच्या विरोधात पेटून उठले आणि २२ जून १८९७ला रँडवर पाळत ठेवून चापेकर बंधूंपैकी दामोदरने त्याच्यावर गोळी झाडली. २५ जूनला रँडचा मृत्यू झाला. आर्यस्ट तत्काल मृत्यू पावला.