शंकरराव खरात
शंकरराव खरात | |
---|---|
जन्म |
११ जुलै १९२१ पुणे जिल्हा, महाराष्ट्र |
मृत्यू | ९ एप्रिल, २००१ (वय ७९) |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
धर्म | बौद्ध धर्म |
कार्यक्षेत्र | कवी, लेखक, समाजसुधारक, कुलगुरू |
साहित्य प्रकार | लेखक |
प्रसिद्ध साहित्यकृती | तराळ अंतराळ, बारा बलुतेदार |
प्रभाव | डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध |
वडील | रामचंद्र खरात |
शंकरराव रामचंद्र खरात (जुलै ११, १९२१ - एप्रिल ९, २००१) हे मराठी लेखक, कादंबरीकार व इतिहासकार होते. ते आंबेडकरी चळवळीतील एक प्रमुख लेखक होते. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सुद्धा कार्यरत होते. खरातांचा जन्म आटपाडी येथे झाला. 'तराळ-अंतराळ' हे त्यांचे आत्मचरित्र आहे. 'मी स्वतः महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा शिष्य आहे' असे ते नेहमी म्हणत. इ.स. १९५८ ते १९६१ या काळात प्रबुद्ध भारत या नियतकालिकाचे त्यांनी संपादनही केले. इ.स. १९८४ साली जळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते.
'शंकराण्णा तुम्ही असाच साहित्य लेखनात जोर केला पाहिजे. आपण पुढं एकदा माडगूळलाच साहित्य संमेलन घेऊ.' असे माडगूळकर यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. त्यांच्याप्रमाणेच गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, शंकर पाटील, द.मा. मिरासदार यांच्यासोबत आचार्य प्र.के. अत्रे, शिरीष पै यांनी त्यांना लेखनासाठी उत्तेजन दिले. इ.स. १९५७ साली त्यांची नवयुग दिवाळी अंकात, वयाच्या पस्तीसाव्या वर्षी 'सत्तूची पडीक जमीन' नावाची पहिली कथा प्रकाशित झाली. त्यांनतर रामा महार, बंडा मांग अशा बलुतेदारांच्या बारा कथा त्यांनी नवयुगमध्येच लिहिल्या.
इ.स. १९५७-५८ मध्ये शंकरराव खरातांची 'माणुसकीची हाक' ही महार बलुतेदारावर लिहिलेली कादंबरी गाजली. त्यामुळे ते पुढे लेखक म्हणून उदयाला आले. साहित्याच्या ओढीने त्यांनी राजकारणही सोडले.
प्रकाशित साहित्य
[संपादन]- आज इथं तर उद्या तिथं (१९८३, ललितलेखसंग्रह)
- आडगावचे पाणी (१९७०, कथासंग्रह
- गावचा टिनपोल गुरुजी (१९७१, कादंबरी)
- गाव-शीव (१९७०)
- झोपडपट्टी (१९७३, कादंबरी)
- टिटवीचा फेरा (१९६३, कथासंग्रह)
- तडीपार (१९६१)
- तराळ-अंतराळ (आत्मचरित्र)
- दौण्डी (१९६५) (कथासंग्रह)
- फूटपाथ नंबर १ (१९८०, कादंबरी)
- बारा बलुतेदार (१९५९)
- मसालेदार गेस्ट हाऊस (१९७४, कादंबरी)
- माझं नाव (१९८७, कादंबरी
- सांगावा (१९६२)
- सुटका (१९६४, कथासंग्रह)
- हातभट्टी (१९७०, कादंबरी)
शंकरारव खरात यांच्यावरील आणि त्यांच्या लेखनासंबंधीची पुस्तके
[संपादन]- शंकरराव खरातांचे कथाविश्व (संदीप सांगळे)
पुरस्कार व गौरव
[संपादन]- अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन, जळगाव, १९८४
इतर
[संपादन]- बँक ऑफ इंडियाचे संचालक
- ऑफिसर्स सिलेक्शन कमिटीचे चेरमन
बाह्य दुवे
[संपादन]- महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्रातील खरातांवरचा लेख Archived 2008-05-03 at the Wayback Machine.
- मायबोली- शंकरराव खरात
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |