धोंडोपंत बाजीराव पेशवे
धोंडोपंत बाजीराव पेशवे | |
---|---|
![]() नानासाहेब पेशवे |
|
टोपणनाव: | नानासाहेब पेशवे |
जन्म: | १९ मे १८२४ बिठूर, भारत |
मृत्यू: | १८५७ कानपूर |
चळवळ: | १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध |
धर्म: | हिंदू |
वडील: | बाजीराव पेशवे (द्वितीय) |
नानासाहेब पेशवे[संपादन]
पार्श्वभूमी :
दुसरे बाजीराव हे तितकेसे शूर नसल्याने पुढे त्यांची सत्ता संपुष्टात आली. त्यांचे राज्य इंग्रजांनी बळकावले. पेशवे मांडलिक बनले व बिठूर येथे जाऊन राज्य करू लागले.
पुढे काही काळानंतर त्यांनी झाशीच्या राणीच्या मदतीने बिठूर स्वंतत्र घोषित केले. अल्पशा आजाराने बाजीरावांचे निधन झाले व त्यांचे दत्तक पुत्र धोंडोपंत ऊर्फ नानासाहेब पेशवे झाले.
पेशवेपदासाठीचा संग्राम :
नानासाहेब दत्तक पुत्र असल्याने ईस्ट इंन्डिया कंपनीने त्यांचा स्वीकार केला नाही. बिठूर जरी स्वंतत्र असले तरी जो पर्यत ईस्ट इन्डिया कंपनीची परवानगी मिळत नाही तो पर्यत हिंदुस्थानातल्या कुठल्याही राजाला राजा म्हणून मान्यता मिळत नसे. तोच विरोध नानासाहेबांना झाला. पेशवेपद मिळविण्यासाठी त्यांना इंग्रज सेनापती मेन्सन ह्याच्याशी युद्ध करावे लागले. ह्या युद्धात नानासाहेबांचा पराजय झाला.
बिठूरचे विलिनीकरण :
नानासाहेब बिठूरचा क्रांतिदलात सक्रिय सहभाग होता. पण इंग्रजांच्या सैन्यानेही बंड मोडायचा निश्चय केला होता. त्यांनी बिठूरवर अचानक हल्ला करून नानासाहेबांना झुकायला भाग पाडले. स्वतःचा जीव वाचावा म्हणून नानासाहेबांनी बिठूर फिरंगी सत्तेत विलीन केले ते कायमचेच.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |