Jump to content

लक्ष्मीकांत तांबोळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लक्ष्मीकांत तांबोळी
जन्म नाव लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी
जन्म २१ सप्टेंबर, १९३९
जिंतूर
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता, कथा, कादंबरी, ललित, समीक्षा
विषय मराठी
पत्नी मालती लक्ष्मीकांत तांबोळी

लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी (जन्म : २१ सप्टेंबर १९३९) मराठी भाषेतील मनस्वी लेखक आहेत. त्यांच्या लेखनातून कायम सर्जनशीलता जपण्याचा ते प्रयत्न करतात. कथा, कविता, कादंबरी, ललित लेख, समीक्षा अशा बहुविध वाङ्मय प्रकारात त्यांनी लिखाण केले आहे. त्यांचा कवितेतून चिंतनशीलतेचा प्रत्यय येतो.

.प्रारंभिक जीवन[संपादन]

प्रकाशित साहित्य[संपादन]

कवितासंग्रह अस्वस्थ सूर्यास्त (१९७०), गोकुळवाटा (२००४), जन्मझुला (२०१३), मी धात्री मी धरित्री (१९९१, २००३), हुंकार (१९५९)
कथासंग्रह तवंग (१९६८), सलाम साब (१९८१)
कादंबऱ्या अंबा (१९७८), कृष्णकमळ (१९७५), गंधकाली (१९७९), दूर गेलेले घर (१९७०, १९८५, १९९७),
ललित लेखसंग्रह कबिराचा शेला (१९९६), झिरपा (२००८), सयसावल्या (२००६)
समीक्षा काव्यवृत्ती आणि प्रवृत्ती (१९९३)
संकीर्ण मार्ग हा सुखाचा (प्रौढ साक्षरांसाठी)


पुरस्कार आणि सन्मान[संपादन]

  • अकोल्याच्या अंकुर साहित्य संघाचा अक्षर तपस्वी पुरस्कार, २००५.
  • कुसुमताई चव्हाण पुरस्कार, २०१०.
  • 'जनसंवाद' पुरस्कार, २००९.
  • पुण्यात भरलेल्या 'याज्ञवल्क्य वासंतिक साहित्य संमेलना'चे अध्यक्षपद.
  • रसरंग पुरस्कार, २०१३.
  • रामगोपाल गुप्ता जीवनगौरव पुरस्कार, २०१८.
  • स्वातंत्र्यसैनिक विनायकराव चारठाणकर पुरस्कार, सेलू, १९९५.
  • महाकवी विष्णूदास पुरस्कार, २००८.
  • संगीत दरबार पुरस्कार, २०१८.
  • सूर्योदय पुरस्कार, जळगाव, २०१०.