अरविंद गजेंद्रगडकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अरविंद गजेंद्रगडकर

पंडित अरविंद गजेंद्रगडकर (जानेवारी ११, १९२८ - मे ३०, २०१०) हे मराठी बासरीवादक, लेखक होते.

जीवन[संपादन]

गजेंद्रगडकरांचा जन्म जानेवारी ११, १९२८ रोजी महाराष्ट्रात नाशिक येथे झाला. बी.एस्सी. मानसशास्त्र विषयात त्यांनी पदवी मिळवली. पंडित पन्नालाल घोषांकडे ते बासरीवादन शिकले. पुढे काही काळ त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयात संगीताचे अध्यापन केले. आकाशवाणीवर संगीतसंयोजक व निर्मात्याच्या पदांवर त्यांनी १८ वर्षे नोकरी केली. बासरीवादनासोबतच त्यांनी लेखनही केले. त्यांनी 'असे सूर अशी माणसे', 'स्वरांच्या बनात' इत्यादी पुस्तकांसह आठ कादंब्ऱ्या आणि तीन कथासंग्रह लिहिले. अरविंद गजेंद्रगडकर हे एक जोतिषीही आहेत.

अरविंद्र गजेंद्रगडकरांची संगीतावरील ललित पुस्तके[संपादन]

  • असे सूर! अशी माणसं!
  • सूरसावल्या
  • स्वरसंगम (मराठी, इंग्रजी)
  • स्वरांची स्मरणयात्रा
  • स्वरांच्या बनात


संगीतावरची अन्य पुस्तके[संपादन]

  • आलाप विशारद
  • The Indian Flute
  • तबला विशारद
  • ५० राग - आलाप, गती, ताना
  • बासरी वादन
  • वाद्यवादनाचे संपूर्ण गाईड
  • संगीतशास्त्राचे गाईड
  • हार्मोनियम गाईड

विविध पुस्तके[संपादन]

  • ज्योतिषाच्या डायरीतून