लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरींग या पानावरून पुनर्निर्देशित)
कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरिंग
सी.एम.ई.
स्थापना इ.स. १९४३
विद्यार्थी ५५०



College of Military Engineering, Pune 1993 stamp of India.jpg

लष्करी यांत्रिकी महाविद्यालय किंवा कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरिंग (College of Military Engineering) ही भारतीय लष्कराच्या कोअर ऑफ इंजिनियर्स ह्या शाखेची एक तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्था आहे. येथे भारतीय लष्करातील निवडक जवानांना यांत्रिकीचे प्रशिक्षण दिले जाते.

मुंबई–पुणे महामार्गावर पुणे महानगरातील खडकी लष्कर तळाजवळ हे कॉलेज आहे. कॉलेजचा परिसर मुळा नदीच्या काठावर ३,६०० एकर (१५ चौ. किमी) क्षेत्रावर पसरला असून येथे केवळ लष्करी अधिकाऱ्यांना व व लष्करातील नागरी कर्मचाऱ्यांना प्रवेश मिळतो.