आशा बगे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.
आशा बगे

आशा बगे या मराठी भाषेत लिहिणाऱ्या भारतीय कादंबरीकार व लेखिका आहेत. त्यांच्या भूमी या कादंबरीला २००६चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

आशा बगे यांचे बालपण नागपूर येथे गेले. त्यांचे वडील वकील होते. बगे यांचे मराठी साहित्य व संगीतात पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. नोकरी न करता घरसंसार सांभाळून लेखनाचा छंद जोपासला. आशा बगे यांच्या लेखनाची सुरुवात ‘सत्यकथे’पासून झाली. त्यांची गाजलेली कथा ‘रुक्मिणी’ १९८० साली प्रसिद्ध झाली. मौजचे श्री.पु. भागवत व राम पटवर्धन यांनी मग आशा बगेंच्या लेखनशैलीला आकार दिला व नंतर मौज व बगे असे समीकरण जुळून गेले. मौजच्या दिवाळी अंकात नेमाने लेखन करणाऱ्या आशा बगे यांचा २०१८ सालापर्यंतचा प्रकाशित ग्रंथसंभार १३ लघुकथासंग्रह, सात कादंबऱ्या, ललितलेखांची दोन पुस्तके असा व्यापक आहे.

आशा बगे यांचा ‘मारवा’ हा कथासंग्रह विशेष प्रसिद्ध आहे, तर ‘भूमी’ व ‘त्रिदल’ या कादंबऱ्यांना अनेक सन्मान मिळाले आहेत. ‘भूमी’ला २००७चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. यात त्यांनी प्रथमच एका तमिळ मुलीचे भावविश्व रेखाटले आहे. ‘दर्पण’ हा त्यांचा गाजलेला कथासंग्रह. या पुस्तकासाठी केशवराव कोठावळे पुरस्कार त्यांना मिळाला.

आशाताईंना संगीताची खूप आवड आहे. संगीतावर त्यांनी अनेकदा लिहिलेही आहे. त्यांच्या लेखनातसुद्धा संगीताचा संदर्भ हमखास येतोच. त्यांचे आयुष्य मोठय़ा व एकत्रित कुटुंबात गेले. त्याहीमुळे असेल, पण अशा कुटुंबांत होणारी स्त्रियांची घुसमट अनेक कथांमधून त्यांनी समर्थपणे मांडली आहे.

आशा बगे यांचे प्रकाशित साहित्य[संपादन]

 • अनंत (कथासंग्रह)
 • अनुवाद (माहितीपर)
 • ऑर्गन (कथासंग्रह)
 • आशा बगे यांच्या निवडक कथा (संपादित, संपादक - प्रभा गणोरकर)
 • ऋतूवेगळे (कथासंग्रह)
 • चक्रवर्ती (धार्मिक)
 • चंदन (कथासंग्रह)
 • जलसाघर (कथासंग्रह)
 • त्रिदल (ललित)
 • दर्पण (कथासंग्रह)
 • धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे (ललित कथा)
 • निसटलेले (कथासंग्रह)
 • पाऊलवाटेवरले गाव (कथासंग्रह)
 • पिंपळपान भाग १, २, ३ (कथासंग्रह; सहलेखक - शं.ना. नवरे, हमीद दलवाई)
 • पूजा (कथासंग्रह)
 • प्रतिद्वंद्वी (कादंबरी)
 • भूमिला आणि उत्सव (कथासंग्रह)
 • भूमी (कादंबरी)
 • मांडव
 • मारवा (कथासंग्रह)
 • मुद्रा (कादंबरी)
 • वाटा आणि मुक्काम (अनुभव कथन; सहलेखक - भारत सासणे, मिलिंद बोकील, सानिया)
 • वामन चोरघडे यांच्या निवडक कथा भाग १, २ (संपादित)
 • श्रावणसरी
 • सेतू (कादंबरी)

पुरस्कार आणि सन्मान[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ आशा बगे. Loksatta (Marathi भाषेत). 13-04-2018 रोजी पाहिले. विदर्भ साहित्य संघाने पहिल्यांदा लोखिका संमेलन घेतले तेव्हा त्यांनी अगदी आनंदाने अध्यक्षपद स्वीकारले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे[संपादन]