शांताबाई कांबळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


शांताबाई कृष्णाजी कांबळे
टोपणनाव: शांताबाई कृष्णाजी कांबळे
जन्म: मार्च १, १९२३
महाराष्ट्र, भारत
धर्म: बौद्ध
प्रभाव: भीमराव रामजी आंबेडकर
अपत्ये: अरुण कांबळे, मंगल तिरमारे, चंद्रकांत कांबळे


शांताबाई कृष्णाजी कांबळे (१ मार्च, १९२३ - २५ जानेवारी, २०२३) या मराठी साहित्यिक अरुण कांबळे यांच्या आई होत.

जीवन[संपादन]

शांताबाई कांबळे ह्या दलित स्त्री लेखिका, शिक्षिका व सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यात महुद बुद्रुक या गावी झाला. त्यांचे आईवडील अत्यंत दरिद्ऱ्यात जगत होते, तरीही त्यांना मुलीला शिकवायचे होते. जातीयतेच्या जोखडात अडकलेल्या समाजकडून त्यांना प्रचंड त्रास झाला. इयत्ता तिसरीपासून त्यांनी शालेय शिक्षणासाठी झगडा देऊन शिक्षण पूर्ण केले.

कार्य[संपादन]

शांताबाई काळंबळे या पुण्याच्या महिला शाळेत शिकूना शिक्षिका झल्या. १८५७ साली (!!!!) बाबासाहेबांच्या नेतृत्वात आजूबाजूच्या ७ गावांत शांताबाई आणि त्यांचे पति यांच्या माध्यमातून धर्मांतरण झाले. १९८३ साली सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यावर शांताबाई कांबळे यांनी लिहिलेले 'माज्या जल्माची चित्तरकथा' हे आत्मवृत्त प्रसिद्ध झाले. दलित महिला लेखिकेने लिहिलेले हे भारतातील पहिले आत्मकथन आहे. दिनकर साक्रीकरांच्या प्रयत्नांतून हे आत्मवृत्त १९८२ साली ‘पूर्वा’ मासिकात पहिल्यांदा प्रकाशित झाले. जन्माने महार. पुढे ५७ साली डॉ. बाबासाहेबांच्या प्रेरणेने धर्मांतर केले. महारकीची कामे करीत, सुगीच्या वेळी शेतावरच्या बैलांनी खाल्लेली आणि शेणातून पडलेली ज्वारी धुऊन स्वच्छ करून खात, सातवीपर्यंतचे शिक्षण खेड्याहूनही खेडे असलेल्या गावात शांताबाईंने आवडीने व जिद्दीने केले. नंतरही गावातून अन्न गोळा करत घरी आणण्याची पाळी आली, तर तेही केले. लग्न झाल्यावर नवऱ्याने दुसरी बायको करून आणली म्हणून स्वतःचे व्यक्तिमत्त्व शोधायला घराबाहेर पडलेली ही दलित ‘नोरा’ मास्तरकी करीत शिक्षणक्षेत्रात शिक्षणाधिकारी म्हणून निवृत्त झाली. 'माज्या जल्माची चित्तरकथा' या पुस्तकावर आधारित नाजुका या नावाने एक दूरचित्रवाणी मालिका होती. शांताबाई कांबळे यांचा अनेक पुरस्काराने सन्मान झाला आहे, त्यांत दलितमित्र हा एक सन्मान आहे.

प्रकाशित साहित्य[संपादन]