विश्राम बेडेकर
विश्राम बेडेकर | |
---|---|
जन्म नाव | विश्वनाथ चिंतामणी बेडेकर |
टोपणनाव | विश्राम बेडेकर |
जन्म | ऑगस्ट १३ १९०६ |
मृत्यू |
३० ऑक्टोबर १९९८ पुणे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य, लेखन, व्याख्याता |
साहित्य प्रकार | कादंबरी |
वडील | चिंतामण बेडेकर |
पत्नी | मालती विश्वनाथ बेडेकर |
विश्राम बेडेकर ऊर्फ विश्वनाथ चिंतामणी बेडेकर,एम्. ए. एल्एल.बी. (जन्म : अमरावती, ऑगस्ट १३, १९०६ - - पुणे, ऑक्टोबर ३०, १९९८) हे मराठीतले लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक होते. त्यांचे शिक्षण अमरावती आणि नागपूर येथे झाले होते. मराठी लेखिका मालती बेडेकर (माहेरच्या बाळूताई खरे) या त्यांच्या पत्नी होत.
मराठी रंगभूमीवरील नट चिंतामणराव कोल्हटकर व गायक नट मास्टर दीनानाथ यांनी स्थापन केलेल्या केलेल्या ‘बलवंत पिक्चर्स’ ह्या संस्थेच्या ’कृष्णार्जुन युद्ध’ ह्या चित्रपटाचे सहदिग्दर्शक म्हणून बेडेकर प्रथम चित्रपटव्यवसायात आले (१९३४). त्याअगोदर मास्टर दीनानाथांच्या ‘बलवत संगीत नाटक मंडळी’साठी ब्रह्मकुमारी (१९३३) हे नाटक त्यांनी लिहिले होते. ’बलवंत पिक्चर्स’ ही संस्था बंद झाल्यानंतर, १९३५ साली बेडेकरांनी ’कृष्णार्जुन युद्धा’चे आणखी एक सहदिग्दर्शक वा. ना. भट ह्यांच्या सहकार्याने ‘भट-बेडेकर प्रॉडक्शन्स’ ही चित्रपट संस्था स्थापन केली. राम गणेश गडकरी यांच्या ’ठकीचे लग्न’ आणि चि.वि. जोशी यांच्या ’सत्याचे प्रयोग’ या विनोदी कथांवर त्यांनी चित्रपट तयार केले. मराठी चित्रसृष्टीतील हे पहिले विनोदी चित्रपट होते.
प्रकाशित साहित्य
[संपादन]नाव | साहित्यप्रकार | प्रकाशक | प्रकाशन वर्ष (इ.स.) |
---|---|---|---|
एक झाड आणि दोन पक्षी | आत्मचरित्र | पॉप्युलर प्रकाशन | |
काबुलीवाला | हिंदी पटकथा | १९६१ | |
टिळक आणि आगरकर | नाटक | पॉप्युलर प्रकाशन | १९८० |
नरो वा कुंजरो वा (नाटक) | नाटक | १९६१ | |
ब्रह्मकुमारी | नाटक | पॉप्युलर प्रकाशन | १९३३ |
रणांगण (कादंबरी) | कादंबरी | देशमुख आणि कंपनी प्रकाशन | १९३९ |
वाजे पाऊल आपुले | विनोदी नाटक | पॉप्युलर प्रकाशन | १९६७ |
शेजारी | पटकथा | ||
सिलिसबर्गची पत्रे | आठवणी | पॉप्युलर प्रकाशन | |
स्वातंत्र्यवीर सावरकर : चित्रपट कथा व संवाद : भाग १आणि २ | पटकथा | पॉप्युलर प्रकाशन | |
The Immortal Song (अमर भूपाळीचे इंग्रजी रूपांतर | पटकथा |
विश्राम बेडेकर यांच्याबद्दल लिहिलेली पुस्तके
[संपादन]- विदग्ध प्रतिभावंत : विश्राम बेडेकर (डाॅ. पुरुषोत्तम माळोदे)
चित्रपट दिग्दर्शन
[संपादन]- एक नन्ही मुन्नी लडकी थी (हिंदी)
- कृष्णार्जुन युद्ध
- क्रांतीवीर वासुदेव बळवंत
- चूल आणि मूल
- जय जवान जय मकान
- ठकीचे लग्न
- नारद-नारदी
- पहिला पाळणा
- रामशास्त्री
- रुस्तुम-सोहराब (हिंदी)
- लक्ष्मीचे खेळ
- लाखाराणी (हिंदी)
- वासुदेव बळवंत
- सत्याचे प्रयोग
- Kabuliwala(?)
पुरस्कार
[संपादन]- साहित्य अकादमी पुरस्कार, १९८५, एक झाड आणि दोन पक्षी
- विष्णूदास भावे पुरस्कार
गौरव
[संपादन]- अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन, मुंबई १९८८
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |