उद्धव शेळके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
उद्धव शेळके
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg

उद्धव ज. शेळके (जन्मदिनांक- ८ आक्टोंबर १९३०) हे मराठी भाषेतील कादंबरीकार आहेत. त्यांची धग ही कादंबरी विशेष गाजली होती.

उद्धव ज. शेळके हे अमरावती जिल्ह्यातील आहेत. त्यांनी लिहिलेली 'धग' ही कादंबरी ग्रामीण पार्श्वभूमीवरील असून इ.स. १९९०च्या दशकात या कादंबरीचे नागपूर आकाशवाणी केंद्राच्या प्रसारणातून क्रमशः वाचन केले गेले. वारांगनांच्या जीवनावरील "डाळिंबाचे दाणे' ही त्यांची कादंबरीही प्रसिद्ध आहे.[१]या कादंबरीत वैदर्भीय बोली भाषा आली आहे

लेखन[संपादन]

इ.स. १९५० च्या दरम्यान शेळक्यांनी कथालेखनाला प्रारंभ केला. 'शिळान' हा त्यांचा पहिला कथासंग्रह त्यात त्यांनी केलेल्या वैदर्भीय ग्रामीण जीवनाच्या सूक्ष्म चित्रणामुळे व बोलीच्या वापरामुळे हा कथासंग्रह लक्षणीय ठरला. 'धग' च्या यशानंतर उद्धव शेळके यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या. 'धुंदी', 'पुरुष', 'नांदतं घर', 'कोवळीक', 'गोल्डन व्हिला', 'नर्तकीचा नाद', 'पूर्ती', 'डाग', 'डाळिंबाचे दाणे', 'बाईविना बुवा', 'निर्माता', 'महामार्ग' अशा अनेक कादंबऱ्याचे लेखन त्यांनी केले.[२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ [१], दै. सकाळ मध्ये प्रसिद्ध लेख. दि. 17 ऑगस्ट 2013
  2. ^ "उद्धव शेळके" (मराठी मजकूर). पॉप्युलर प्रकाशन. २३ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले.