शिंद्यांची छत्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिंद्यांची छत्री

शिंद्यांची छत्री हे महाराष्ट्राच्या पुणे शहराजवळील वानवडी येथे असलेले स्मारक आहे. हे स्मारक इ.स.च्या १८व्या शतकातील मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी सेनानी महादजी शिंदे याच्या स्मॄत्यर्थ बांधवले गेले आहे.

पानिपतच्या तिसर्‍या लढाईनंतर महादजी शिंदे याने मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले. पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्याच्या नेतृत्वाखाली मराठा फौजांनी काही लढायांमध्ये ब्रिटिशांचा निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. १२ फेब्रुवारी, इ.स. १७९४ रोजी त्याचे निधन झाले.

इ.स. १७९४ सालाच्या सुमारास वर्तमान शिंद्यांच्या छत्रीच्या जागी महादजीने बांधवलेले शिवालय होते. महादजीच्या मॄत्यूनंतर त्याचे अंत्यसंस्कार याच जागेत करण्यात आले.