सखाराम हरी देशपांडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सखाराम हरी देशपांडे (१९२४ - जुलै २९, २०१०) हे मराठी लेखक होते.

जीवन[संपादन]

देशपांड्यांचा जन्म महाराष्ट्रात शिरवळ येथे १९२४ साली झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण शिरवळातच झाले. पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर तेथील सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून त्यांनी बी.ए. पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. पदवीनंतर मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्रात त्यांनी एम.ए. केले. पुढे डॉक्टरेट मिळवली. विद्यापीठातच प्राध्यापकाची नोकरी करून १९८४ साली ते निवृत्त झाले.

साहित्यिक कारकिर्द[संपादन]

राष्ट्रवादहिंदुत्व हे देशपांड्यांच्या विशेष अभ्यासाचे विषय होते. त्यावर त्यांनी पुस्तकेही लिहिली.

प्रकाशित साहित्य[संपादन]

  • काही आर्थिक काही सामाजिक
  • संमतविचार आणि नवी भारतविद्या
  • हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व
  • हिंदुत्वाची फेरमांडणी
  • संघातले दिवस
  • हिंदू वैदिक विवाह पद्धत
  • भारताचा राष्ट्रवाद
  • दुभंग
  • व्यक्ती आणि प्रकृती
  • अमृतसिद्धी भाग १ पु. ल. समग्रदर्शन, अमृतसिद्धी भाग २ पु. ल. समग्रदर्शन