काशीबाई कानिटकर
Appearance
काशीबाई कानिटकर | |
---|---|
जन्म |
इ.स. १८६१ अष्टे, महाराष्ट्र |
मृत्यू | इ.स. १९४८ |
राष्ट्रीयत्व | मराठी भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कथा, कादंबरी |
विषय | स्त्रीवाद |
पती | गोविंद वासुदेव कानिटकर |
काशीबाई कानिटकर (इ.स. १८६१ - इ.स. १९४८) या मराठी भाषेतील लेखिका व स्त्रीवादी समाजसुधारक होत्या. मराठी समाजात व स्थूलमानाने भारतीय समाजात स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविषयी त्यांनी आपल्या साहित्याद्वारे आवाज उठवला.
जीवन
[संपादन]काशीबाईंचा जन्म वर्तमान महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातील अष्टे गावी झाला. न्यायालयीन पेशात असलेल्या व स्वतः व्यासंगी लेखक असलेल्या गोविंद वासुदेव कानिटकरांसोबत वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह झाला[१]. गोविंदरावांनी काशीबाईंना घरीच मराठी, संस्कृत, इंग्रजी भाषा शिकवल्या[२].
काशीबाई बनारस हिंदू विश्वविद्यालयात मराठी भाषाविषय शिकवीत असत[२]. पहिल्या भारतीय स्त्री डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चरित्र काशीबाई कानिटकर यांनी लिहिले.
काशीबाई इ.स. १९१० च्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनास हजर होत्या[२].
कादंबरी
[संपादन]- रंगराव
- पालखीचा गोंडा
कथा संग्रह
[संपादन]- शेवट तर गोड झाला
- चांदण्यातील गप्पा
संदर्भ
[संपादन]- ^ अनगोळ,पद्मा. द इमर्जन्स ऑफ फेमिनिझम इन इंडिया, १८५० - १९२० (स्त्रीवादाचा भारतातील उदय, इ.स. १८५० - इ.स .१९२०) (इंग्लिश भाषेत). p. २३१.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ a b c एन्सायक्लोपीडिक डिक्शनरी ऑफ मराठी लिटरेचर - व्हॉल्यूम १ (मराठी साहित्याचा कोशसंग्रह - खंड १) (इंग्लिश भाषेत). p. २९८.CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |