सुधाकर प्रभू
सुधाकर प्रभू | |
---|---|
जन्म | पेडणे, गोवा, भारत |
मृत्यू |
जुलै ३०, २००७ पुणे, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | बालसाहित्य, अध्यापन |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कथा |
सुधाकर प्रभू मराठी भाषेतील बालकुमारसाहित्यकार होते.
सुधाकर प्रभू यांचा जन्म गोव्यात पेडणे गावी झाला. शालेय शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षणाकरता ते मुंबईला गेले. या काळातच वयाच्या अठराव्या वर्षी 'आनंद' व भा.रा. भागवतांच्या 'बालमित्र' या मासिकांत त्यांच्या कथा प्रकाशित झाल्या. बी.ए. व बी.एड्. पदव्या संपादल्यानंतर त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला.
सुधाकर प्रभू यांनी दोनशेहून अधिक पुस्तके लिहिली. त्यातील 'राजू प्रधान' ही व्यक्तिरेखा भा.रा. भागवतांच्या 'फास्टर फेणे'प्रमाणे लोकप्रिय ठरली. पुस्तकांखेरीज 'साप्ताहिक स्वराज्य', 'रविवार सकाळ', 'साप्ताहिक हिंदू', 'साधना' यासारख्या नियतकालिकांतूनही त्यांनी लेखन केले. बालसाहित्यातील कामगिरीबद्दल गोवा कला अकादमी, गोवा सरकार, भारत सरकारचे पुरस्कार त्यांना लाभले. कोल्हापूर येथे १९९१ मध्ये झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
जुलै ३०, २००७ रोजी पुणे येथे सुधाकर प्रभू यांचे निधन झाले.
प्रकाशित साहित्य
[संपादन]- हिरवी हिरवी गार
- मी सातववाडीचा लहान्या
- चला झाडे लावू चार
- अशी जिंकली खिंड हाजीपीर
- धिटुकली
- लग्नघरात राजू प्रधान
- प्राणी स्वतंत्र झाले
- एका रात्रीची गंमत
- कोणार्कचा कलाकार
- अमोल अमोल
फ