विष्णु भिकाजी कोलते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विष्णु भिकाजी कोलते
जन्म नाव विष्णु भिकाजी कोलते
जन्म जून २२, इ.स. १९०८
महाराष्ट्र, भारत
मृत्यू एप्रिल ८, इ.स. १९९८
महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार इतिहास, ऐतिहासिक साहित्य
विषय महानुभावीय मराठी साहित्य
पुरस्कार पद्मश्री पुरस्कार (इ.स. १९९१)

डॉ. विष्णु भिकाजी कोलते (जून २२, इ.स. १९०८ - एप्रिल ८, इ.स. १९९८) हे मराठी लेखक, महानुभाव साहित्याचे संशोधक व कवी होते. यांना इ.स. १९९१ साली पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.

जीवन[संपादन]

विष्णु भिकाजी कोलते यांचा जन्म २२ जून, इ.स. १९०८ रोजी नाखले नावाच्या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण मलकापूर येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण खामगाव व नागपूर येथे झाले. इ.स. १९३० साली त्यांनी एम.ए. पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरा केला. इ.स. १९३१ ते इ.स. १९४४ या कालखंडात अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात, तर इ.स. १९४४ ते इ.स. १९६४ या कालखंडात नागपुरातील मॉरिस कॉलेजात त्यांनी मराठी विषय शिकवला. इ.स. १९६६ ते इ.स. १९७२ या काळात ते नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू होते.

त्यांचे आत्मचरित्र अजुनी चालतोच वाट या नावाने इ.स. १९९४ साली प्रकाशित झाले.

प्रकाशित साहित्य[संपादन]

लिखित साहित्य[संपादन]

पुस्तकाचे नाव प्रकाशन वर्ष (इ.स.) प्रकाशन साहित्यप्रकार भाषा
लव्हाळी इ.स. १९२८ काव्यसंग्रह मराठी
मराठी संतों का सामाजिक कार्य इ.स. १९३५ संशोधनात्मक हिंदी
भास्कर भट्ट बोरीकरः चरित्र व काव्य विवेचन इ.स. १९३५ संशोधनात्मक मराठी
स्वस्तिक इ.स. १९३७ काव्यसंग्रह मराठी
महात्मा रावण (पुस्तिका) माहितीपर मराठी
महानुभाव तत्त्वज्ञान इ.स. १९४५ संशोधनात्मक मराठी
महानुभाव आचारधर्म इ.स. १९४५ संशोधनात्मक मराठी
श्री चक्रधर चरित्रग्रंथ मराठी
मूर्तिप्रकाश १९६२ संपादित ग्रंथ मराठी
महानुभाव संशोधन (खंड १ व २) इ.स. १९६२,
इ.स. १९६४
संशोधनात्मक मराठी
साहित्य संचार इ.स. १९६५ निबंधमाला मराठी
प्राचीन मराठी साहित्य संशोधन इ.स. १९६८ संशोधनात्मक मराठी
चक्रधर : शेवटचे प्रकरण इ.स. १९८२ संशोधनात्मक मराठी
मराठी अस्मितेचा शोध इ.स. १९८९ संशोधनात्मक मराठी
स्नेहबंध इ.स. १९९४ निबंधमाला मराठी
सैह्याद्री-माहात्म्य चरित्रात्मक मराठी
गिरिपर्ण इ.स. १९८९ निबंधमाला मराठी

संपादित साहित्य[संपादन]

पुस्तकाचे नाव प्रकाशन वर्ष (इ.स.) प्रकाशन साहित्यप्रकार भाषा
उद्धव गीता इ.स. १९३५
स्थान पोथी इ.स. १९३७
मूर्तिप्रकाश इ.स. ????
रुक्मिणी स्वयंवर इ.स. १९४०
वाचाहरण इ.स. १९५३
शिशुपाल वध इ.स. १९६०
लीळाचरित्र इ.स. १९७८
श्री गोविंद प्रभू इ.स. १९९४

गौरव[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.