नागनाथ कोत्तापल्ले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नागनाथ कोत्तापल्ले (जन्मः २९ मार्च, इ.स. १९४८;मुखेड, नांदेड- हयात) हे मराठी भाषेतील लेखक, कवी, व समीक्षक आहेत व राजभाषा मराठीचे धोरण ठरविण्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष आहेत.[१] ते ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत.

जीवन[संपादन]

नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म २९ मार्च, इ.स. १९४८ या दिवशी जिल्हा नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे झाला.[२] शालेय शिक्षण मुखेडच्या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये आणि बीए मराठीचे शिक्षण देगलूर महाविद्यालय येथे पूर्ण केले. त्यात ते मराठवाड्यात तिसरे तर मराठी विषयात पहिले आले..[३] त्यांनी १९८० मध्ये पीएच. डी. मिळवली.

कारकीर्द[संपादन]

नागनाथ कोतापल्ले हे इ.स. १९७७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यानंतर ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख बनले. २००४ पासून २००९ पर्यंत कोतापल्ले मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते.

नॅक, राज्य मराठी विकास संस्था, साहित्य अकादमी, राज्य ग्रंथ पुरस्कार समिती, बालपुरस्कार समिती आणि एसएससी बोर्डाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असे कामही त्यांनी केले आहे. याउपर, नागनाथ कोतापल्ले हे १९८८ ते ९५ या काळात मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह, १९९५ ते ९६मध्ये साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष आणि साहित्य संस्कृती मंडळाच्या मराठी वाङ्मयकोशाचे समन्वय संपादक होते.

मुंबईतले युवक साहित्य संमेलन, श्रीगोंद्यात आठवे ग्रामीण साहित्य संमेलन आणि कराडजवळ उंडाळे येथील साहित्य संमेलन या संमेलनांची अध्यक्षपदे नागनाथ कोतापल्ले यांनी भूषविली आहेत. याशिवाय, ते २०१२मध्ये चिपळूण येथील ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचेही अध्यक्ष होते. [२] [४][२]

कोतापल्ले यांचे किंवा त्यांच्यासंबंधीचे प्रकाशित साहित्य[संपादन]

  • डॉ.नागनाथ कोतापल्ले : व्यक्ती आणि वाङ्‌मय (संपादन : डॉ. शैलेश त्रिभुवन)

पुस्तके[संपादन]

कविता संग्रह[संपादन]

  • कृष्णमेघ
  • मूड्स

कादंबरी व कथासंग्रह[संपादन]

  • कर्फ्यू आणि इतर कथा
  • कवीची गोष्ट
  • गांधारीचे डोळे
  • देवाचे डोळे
  • पराभव
  • मध्यरात्र
  • रक्त आणि पाऊस
  • राजधानी
  • संदर्भ
  • सावित्रीचा निर्णय

समीक्षण, वैचारिक[संपादन]

  • अपार्थिवाचे गाणे
  • आधुनिक मराठी कविता: एक दृष्टिक्षेप
  • ग्रामीण साहित्य स्वरूप व शोध
  • ज्योतिपर्व
  • दहा समीक्षक
  • नवकथाकार शंकर पाटील
  • निवडक बी. रघुनाथ
  • पाचोळा
  • पापुद्रे
  • साहित्याचा अन्वयार्थ
  • साहित्याचा अवकाश (समीक्षा)
  • स्त्री-पुरुष तुलना

पुरस्कार[संपादन]

  • पुणे मराठी ग्रंथालयाचा साहित्य सम्राट न. चिं. केळकर साहित्य पुरस्कार [५]
  • महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेले ग्रंथ
    • मूड्स (१९७६)
    • संदर्भ (१९८४)
    • गांधारीचे डोळे (१९८५)
    • ग्रामिण साहित्य (१९८५)
    • उद्याच्या सुंदर दिवसासाठी (२००२)
  • ज्योतिपर्व साठी केशवराव विचारे पारितोषिक (२००२)
  • राख आणि पाऊस साठी बी. रघुनाथ पुरस्कार (१९९५)
  • राख आणि पाऊस साठी महात्मा फुले पुरस्कार (१९९५)
  • ग्रामीण साहित्य स्वरूप आणि शोध साठी परिमल पुरस्कार (१९८५)
  • साहित्य अवकाश साठी शिरीष गांधी साहित्य पुरस्कार
  • यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार (२००१)

संदर्भ[संपादन]

  1. भाषा सल्लागार समिती अध्यक्षपदी डॉ. कोत्तापल्ले
  2. २.० २.१ २.२ "नागनाथ कोत्तापल्ले संमेलनाध्यक्ष", महाराष्ट्र टाईम्स, २ नोव्हेंबर २०१२. ७ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले. 
  3. "नागनाथ कोत्तापल्ले यांचा प्रवास", महाराष्ट्र टाईम्स, ३ नोव्हेंबर २०१२. ७ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले. 
  4. "नागनाथ कोत्तापल्ले साहित्य संमेलनाचे अध्यक्ष", झी न्यूज मराठी, १ नोव्हेंबर २०१२. ७ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले. 
  5. "डॉ. नागनाथ कोत्तापल्ले", महाराष्ट्र टाईम्स, २९ ऑगस्ट २००९. ७ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले. 


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.