विनायक महादेव कुलकर्णी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वि.म. कुलकर्णी या पानावरून पुनर्निर्देशित)
विनायक महादेव कुलकर्णी
जन्म महाराष्ट्र, भारत
मृत्यू ,महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, पत्रकारिता, राजकारण, चित्रपट, शिक्षण
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा, कादंबरी, नाटक, कविता, चरित्र लेखन, वृत्तपत्रलेखन

वि.म. कुलकर्णी (ऑक्टोबर ७, इ.स. १९१७ - मे १३, २०१०) हे मराठी भाषेतील कवी आणि बालकुमार-साहित्यिक होते.

जीवन[संपादन]

कुलकर्ण्यांचा जन्म महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातील मणेराजुरी येथे झाला. महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या कुलकर्णी यांनी १९४० मध्ये तर्खडकर सुवर्णपदकासह बी.ए.ची पदवी प्राप्त केली. ते मुंबई विद्यापीठातून १९४२ मध्ये एम.ए. झाले आणि मराठी विषयात प्रथम क्रमांक मिळवून ते चिपळूणकर पारितोषिकाचे मानकरी ठरले. ’नाटककार खाडिलकर’ या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी १९५० मध्ये पीएच.डी. संपादन केली. बेळगाव येथील लिंगराज कॉलेजमध्ये १९४४ ते १९५० या काळात ते मराठीचे प्राध्यापक होते. त्यानंतर ते सोलापूरच्या दयानंद कॉलेजमध्ये रुजू झाले आणि १९७७ मध्ये निवृत्त होऊन पुण्याला स्थायिक झाले.

डॉ. यू.म. पठाण, निर्मलकुमार फडकुले आणि सुशीलकुमार शिंदे हे त्यांचे विद्यार्थी. यू.म. पठाण पुढे दयानंद कॉलेजमधे प्राध्यापक झाले.

प्रकाशित सहित्य[संपादन]

प्रसिद्ध कविता[संपादन]

पुरस्कार[संपादन]

  • गदिमा पुरस्कार
  • कविश्रेष्ठ भा. रा. तांबे पुरस्कार
  • दिनकर लोखंडे बालसाहित्य पुरस्कार
  • उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून राज्यशासनाचा पुरस्कार


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.