वसंत आबाजी डहाके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
वसंत आबाजी डहाके

वसंत आबाजी डहाके (मार्च ३० १९४२ -हयात ) हे मराठीचे भाषातज्‍ज्ञ, कोशकार तसेच लेखक आणि कवी आहेत.१९६६ साली 'योगभ्रष्ट' या दीर्घ कवितेमुळे ते प्रकाशात आले."चित्रलिपी" या संग्रहाकरिता २००९ सालच्या साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते.[१] फेब्रुवारी २०१२ च्या चंद्रपूर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

व्यक्तिगत जीवन[संपादन]

यांचा जन्म मार्च ३० १९४२ मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील 'बेलोरा' या गावी झाला. प्राथमिक शिक्षण बेलोरा येथे तर पाचवी ते बी.ए. पर्यंतचे शिक्षण चंद्रपूर येथे झाले. त्‍या वेळेपासून ते कविता करीत असत.

प्रकाशित साहित्य[संपादन]

 • मराठी साहित्य इतिहास आणि संस्कृती (संशोधित लेखन)
 • शुभवर्तमान(काव्य संग्रह)
 • योगभ्रष्ट (काव्य संग्रह)
 • यात्रा-अंतर्यात्रा (ललितलेख )
 • शुन:शेप (काव्यसंग्रह)
 • चित्रलिपी (काव्यसंग्रह)
 • सर्वत्र पसरलेली मुळे (दीर्घ काव्य)
 • अधोलोक (कादंबरी)
 • प्रतिबद्ध आणि मर्त्य (कादंबरी)
 • मालटेकडीवरून (ललित लेखसंग्रह)
 • मराठी समीक्षेची सद्यस्थिती आणि इतर निबंध
 • मराठीतील कथनरूपे


प्रसिद्ध कविता[संपादन]

 • योगभ्रष्ट

संपादित साहित्य[संपादन]

 • निवडक सदानंद रेगे (इ.स. १९९६)
 • संक्षिप्त मराठी वाङ्मय कोश
 • वाङ्मयीन संज्ञा आणि संकल्पना कोश
 • शालेय मराठी शब्दकोश

गौरव, पुरस्कार[संपादन]

 • २००९ मध्ये विदर्भ साहित्य संघाचा "जीवनव्रती" पुरस्कार.
 • साहित्य अकादमी पुरस्कार २००९: 'चित्रलिपी' या काव्यसंग्रहासाठी.
 • कादंबरी व कवितेसाठी १९८१ व १९८७ साली महाराष्ट्र राज्य पुरस्कार.
 • २००३ मध्ये गंगाधर गाडगीळ पुरस्कार.
 • २००५ मध्ये महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार.
 • २०१० मध्ये मास्टर दीनानाथ प्रतिष्ठानतर्फे 'शांता शेळके' पुरस्कार.
 • कविवर्य दामोदर अच्युत कारे पुरस्कार.
 • पुणे मराठी ग्रंथालय पुरस्कार.
 • ८५व्या मराठी साहित्य संमेलनाचे निर्वाचित अध्यक्ष- (चंद्रपूर, २०१२)

[२] आणि [३]

इतर[संपादन]

 • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील छायाचित्रात्मक ग्रंथासाठी विशेष योगदान

संदर्भ[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]