लक्ष्मण माने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लक्ष्मण बापू माने (जन्मः इ.स. १९४९) हे भारतातील भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांचा अभ्यास करून त्यांच्या साठी झटणारे कार्यकर्ते, तसेच मराठी भाषेतील लेखक आहेत. त्यांच्या उपरा नावाच्या साहित्यकृतीमुळे 'उपराकार' लेखक लक्ष्मण माने असेही ओळखले जातात. त्यांच्या ’उपरा’चे हिंदी रूपांतर ’पराया’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. 'समाजातील उपेक्षित' या विषयावरील परिवर्तनवादी व पुरोगामी विचार व्यक्त करणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक. हे महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेचे १९९० ते १९९६ या काळात सदस्य होते.

जीवन[संपादन]

लक्ष्मण माने यांचा जन्म कैकाडी या जातीत झाला. त्यांना शैलेंद्र आणि समता असे अनुक्रमे पुत्र आणि कन्या आहेत. लक्ष्मण माने इ.स. २००६च्या ऑक्टोबरमध्ये बुद्धधर्माचा स्वीकार करणार होते. त्यानिमित्ताने मराठी लेखक डॉ. यशवंत मनोहर यांनी लक्ष्मण मानेंना वेळोवेळी पत्रे लिहिली. ही वीस पत्रे ’धम्मपत्रे: लक्ष्मण माने यांना’ या पुस्तकात संग्रहित करून प्रकाशित करण्यात आली आहेत. लक्ष्मण माने यांनी शेवटी १३ मे २००७ रोजी बुद्ध धर्म स्वीकारला.

कारकीर्द[संपादन]

मानसन्मान[संपादन]

 • संमेलनाध्यक्ष : अस्मितादर्श साहित्य संमेलन
 • संमेलनाध्यक्ष : आंबेडकरवादी दलित साहित्य संमेलन
 • संमेलनाध्यक्ष : दुसरे राज्यव्यापी समतावादी साहित्य संमेलन, कऱ्हाड, २०/२१ डिसेंबर २०१०

आरोप[संपादन]

सातारा जिल्ह्यातील जकातवाडी येथील आश्रमशाळेत स्वयंपाकी महिलेवर यांनी बलात्कार केल्याचा गुन्हा पोलिस ठाण्यात दाखल झाला. पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या तक्रारींनुसार सातारा येथील आश्रमशाळा आणि पुणे येथील सरकारी विश्रांतिगृहात बलात्कार करण्यात आल्याचे त्यांच्याच संस्थेतील पाच महिलांनी म्हटले आहे. सदर घटने नंतर त्यांचा पद्मश्री किताब काढून घ्यावा अशी मागणी भारतीय विद्यार्थी सेनेतर्फे सातारा जिल्हाधिकारी यांच्या कडे करण्यात आली.[१][२]

पुस्तके[संपादन]

 • उध्वस्त
 • उपरा (आत्मकथन)
 • क्रांतिपथ (कवितासंग्रह)
 • खेळ साडेतीन टक्क्यांचा (लेखसंग्रह)
 • पालावरचं जग (लेखसंग्रह)
 • प्रकाशपुत्र (नाटक)
 • बंद दरवाजा (लेखसंग्रह)
 • भटक्याचं भारुड (विधानपरिषदेतील कामाचा लेखाजोखा)
 • विमुक्तायन (महाराष्ट्रातील विमुक्त जमाती: एक चिकित्सक अभ्यास)

पुरस्कार[संपादन]

संदर्भ[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.