Jump to content

अनिल अवचट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अनिल अवचट
जन्म १९४४
ओतूर, पुणे
मृत्यू इ.स. २७ जानेवारी २०२२
[पुणे]
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र पत्रकार, लेखक, समाजसेवक
कार्यकाळ १९६९ - २०२२
पत्नी डॉ. सुनंदा अवचट
अपत्ये मुली - मुक्ता आणि यशोदा
पुरस्कार महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्कार

अनिल अवचट (१९४४ - २७ जानेवारी, २०२२) हे एक सामाजिक कार्यकर्ते आणि मराठी लेखक होते. त्यांचा जन्म १९४४ मध्ये पुणे जिल्ह्यात झाला. त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले आणि नंतर १९६८ मध्ये बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथून वैद्यकीय पदवी प्राप्त केली.

त्यांनी आपल्या पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्यासोबत त्यांनी पुण्यात "मुक्तांगण" हे व्यसनमुक्ती केंद्र सुरू केले. तसेच पश्चिम भारताच्या पातळीवर प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र सुरू केले आणि महिलांसाठी स्वतंत्र विभाग निर्माण केला. मुक्तांगणाची गोष्ठ आणि गर्द ऐसी ही दोन पुस्तके त्यांनी मुक्तांगण आणि तेथील रुग्णांचे अनुभव यावर लिहिली आहेत. या सामाजिक कार्यासाठी त्यांना २०१३मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते.[१]

२०१० मध्ये अवचट यांच्या सृष्टीत..गोष्टीत या कथासंग्रहाला मराठी बाल साहित्य पुरस्कार श्रेणीत साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.[२]

जन्म आणि  शिक्षण

[संपादन]

अवचट यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे झाला. त्यांनी आपली एम.बी.बी.एस पदवी पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून घेतली. आपल्या महाविद्यालयीन जीवनातही त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला.

बहुआयामी व्यक्तिमत्त्व

[संपादन]

अवचट हे साहित्यिक होते. १९६९ मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक पूर्णिया हे प्रसिद्ध केले. तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले होते. त्यांची २२ पेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित झाली.

मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र

[संपादन]

अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक होते. त्यांनी आपल्या पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धती ही जगभरांतील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते.

पत्रकारिता

[संपादन]

अवचट यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी लिखाण केले.

प्रकाशित पुस्तके

[संपादन]
नाव प्रकाशक प्रकाशन वर्ष (इ.स.) साहित्यप्रकार / प्रकार नोंदी / पुरस्कार संदर्भ
पूर्णिया—१९६९कादंबरी—[३]
हमीद—१९७७व्यक्तिचित्रण / चरित्रहमीद दलवाई यांच्यावरील पुस्तक
संभ्रम—१९७९कादंबरी—
माणसं!—१९८०व्यक्तिचित्रण—[४]
वाघ्या मुरळी—१९८३सामाजिक / वैचारिक—
कोंडमारा—१९८५सामाजिक / वैचारिक—
गर्द—१९८६सामाजिक / वैचारिकव्यसनमुक्ती विषयावरील लेखन
धागे आडवे उभे—१९८६सामाजिक / वैचारिक—
मोर—१९८६ललित निबंध—
धार्मिक—१९८९सामाजिक / वैचारिक—
स्वतःविषयी—१९९०आत्मपर लेखन—
अमेरिका—१९९२प्रवासवर्णन—[५]
आप्‍त—१९९७व्यक्तिचित्रण—
कार्यरत—१९९७सामाजिक / व्यक्तिचित्रणविविध सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा परिचय[६]
छंदांविषयी—२०००ललित निबंध—
प्रश्न आणि प्रश्न—२००१सामाजिक / वैचारिक—
जगण्यातले काही—२००५ललित निबंध—
दिसले ते—२००५ललित निबंध—
सृष्टीत...गोष्टीत—२००७बालवाङ्मय—
पुण्याची अपूर्वाई—२०१०ललित निबंध—
कुतूहलापोटी—२०१७वैचारिक / सामाजिक—
जिवाभावाचेमौज प्रकाशन२०१७व्यक्तिचित्रण—[७]
अक्षरांशी गप्पा——संवादात्मक / ललित—
आपले‘से’——ललित निबंध—
कार्यमग्न——सामाजिक / वैचारिक—
छेद——सामाजिक / वैचारिक—
बहर शिशिराचा : अमेरिकेतील फॉल सीझन——प्रवासवर्णन—
Beyond Work- Visionaries From Another India——अनुवाद (इंग्रजी)'कार्यरत' या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर
मजेदार ओरिगामी——बालवाङ्मय / हस्तकलाओरिगामी (कागदी काम) विषयावर
मस्त मस्त उतार——काव्यसंग्रह—
माझी चित्तरकथा——आत्मपर / ललित—
मुक्तांगणची गोष्ट——सामाजिक / संस्मरणव्यसनमुक्ती केंद्राच्या अनुभवांवर आधारित
People——अनुवाद (इंग्रजी)'माणसं' पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर (सहलेखक: विश्राम गुप्ते)
रिपोर्टिंगचे दिवस——पत्रकारिता / संस्मरण—
Learning to Live Again——अनुवाद (इंग्रजी)'मुक्तांगणची गोष्ट' पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर
लाकूड कोरताना——कला / ललित—
वनात..जनात——बालवाङ्मय / निसर्ग—
वेध——सामाजिक / वैचारिक—
शिकविले ज्यांनी——व्यक्तिचित्रण—
सरल तरल——ललित निबंध—
सुनंदाला आठवताना——व्यक्तिचित्रण / संस्मरणपत्नी सुनंदा अवचट यांच्या आठवणी
सृष्टी-दृष्टी, वनात-जनात——बालवाङ्मय—
हवेसे——ललित निबंध—

पुरस्कार

[संपादन]
  • व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्यासाठी भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार (२०१३)
  • अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार (१३-१-२०१८)
  • महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार
  • २०१७ सालचा फर्ग्युसन गौरव पुरस्कार
  • “सृष्टीत.. गोष्टीत" या पुस्तकाला साहित्य अकादमीतर्फे उत्कृष्ट बालसाहित्याचा पुरस्कार
  • डॉ. अनिल अवचट यांची पुस्तके सलग तीन वर्षे महाराष्ट्र शासनाने "सर्वोत्कृष्ट पुस्तके" म्हणून जाहीर केली आहेत.
  • अमेरिकेतील आयोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लेखकांच्या संमेलनात त्यांच्या साहित्याचा गौरव करण्यात आला आहे.
  • सातारा येथील न्या. रामशास्त्री प्रभुणे प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा सामाजिक न्याय पुरस्कार (२००७).
  • साहित्य अकादमी तर्फे प्रथम बाल-साहित्य पुरस्कार १४ नोव्हेंबर २०१०.
  • महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार २०११.
  • डॉ. अनिल अवचट यांच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राला १२व्या पुलोत्सव सोहळ्यात पुल कृतज्ञता सन्मान (२०१५) प्रदान करण्यात आला.
  • अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशन या संस्थेकडून साहित्य जीवन गौरव पुरस्कार

मराठीतील साहित्यिक डॉक्टर

बाह्य दुवे

[संपादन]


संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ↑ "President to honour Awachat on June 26". DNA India (इंग्रजी भाषेत). 2022-01-30 रोजी पाहिले.
  2. ↑ "..:: साहित्‍य अकादेमी - बाल साहित्‍य पुरस्‍कार ::." web.archive.org. 2017-08-02. रोजी मूळ पानापासून संग्रहित2017-08-02. 2022-01-30 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  3. ↑ "मौज प्रकाशन ग्रंथसूची". २०२६-०७-२३ रोजी पाहिले.[permanent dead link]
  4. ↑ "अनिल अवचट यांची गाजलेली पुस्तके". २०२६-०७-२३ रोजी पाहिले.[permanent dead link]
  5. ↑ "अनिल अवचट यांचे साहित्य". २०२६-०७-२३ रोजी पाहिले.
  6. ↑ "कार्यरत पुस्तक". २०२६-०७-२३ रोजी पाहिले.[permanent dead link]
  7. ↑ "जिवाभावाचे - अनिल अवचट". २०२६-०७-२३ रोजी पाहिले.[permanent dead link]