रत्‍नाकर मतकरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रत्नाकर मतकरी या पानावरून पुनर्निर्देशित)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
रत्‍नाकर मतकरी
जन्म नोव्हेंबर १७, १९३८
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र कादंबरी, नाटक, चित्रपट दिग्दर्शन, चित्रकला
भाषा मराठी
साहित्य प्रकार गूढकथा
वडील रामकृष्ण विठ्ठल मतकरी
संकेतस्थळ रत्‍नाकर मतकरी यांचे संकेतस्थळ

रत्‍नाकर मतकरी (१७ नोव्हेंबर, इ.स. १९३८[१] - ) मराठीतील गूढकथा लेखक, नाटककार आहेत.

मतकरी हे नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कादंबरी, ललित लेख, वैचारिक साहित्य अशा साहित्य प्रकारांत दर्जेदार लेखन करणारे साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रकार देखील आहेत. त्यांनी महाराष्ट्रात बालरंगभूमीची मुहूर्तमेढ रोवून, सुमारे तीस वर्षे पदरमोड करुन बालनाट्यांची निर्मिती केली. झोपडपट्टीतीतील मुलांना त्यांना ’नाटक’ शिकवले.

"वेडी माणसं" ह्या इ.स. १९५५ साली, म्हणजे वयाच्या सोळाव्या वर्षी लिहिलेल्या एकांकिकेपासून रत्‍नाकर मतकरी यांनी लेखनाचा श्रीगणेशा केला. ती एकांकिका मुंबई आकाशवाणीवरून ध्वनिक्षेपित झाली होती. इ.स.२०१४ साली रत्‍नाकर मतकरी यांच्या नावावर ३१ कथासंग्रह होते.

रत्नाकर मतकरी यांच्या 'निर्मनुष्य' या कथासंग्रहातील 'भूमिका' या कथेवर त्याच नावाचे मराठी नाटक चिन्मय पटवर्धन यांनी लिहिले आहे. नाटकाचा पहिला प्रयोग २०१७ सालच्या डिसेंबरमध्ये झाला. नाटकाचे दिग्दर्शन गौरव बर्वे यांचे होते.

रत्‍नाक्षरं[संपादन]

रत्‍नाकर मतकरींच्या 'रत्‍नाक्षरं' हा ग्रंथ चार भागात विभागला गेला आहे. पहिल्या विभागात एक अस्वस्थ कलावंत, एक माणूस कलावंत, मतकरी : लेखन प्रपंच या मुलाखतींचा समावेश करण्यात आला आहे.

दुसर्‍या विभागात मतकरींच्या कथा, एकांकिका, नाटके, कादंबर्‍या, लेख, कविता, प्रस्तावना, पत्रे, अर्पणपत्रिका या साहित्य प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.

तिसर्‍या विभागात मान्यवर मंडळींना मतकरी कसे वाटतात यावरील लेखनप्रपंचाचा समावेश करण्यात आला आहे.

चौथ्या विभागात मतकरींच्या संपूर्ण साहित्याच्या (संग्रहित आणि असंग्रहित) आणि नाट्यप्रयोगांच्या तपशिलांची दीर्घ सूचीही दिलेली आहे.

प्रकाशित पुस्तके[संपादन]

 • अजून यौवनात मी (नाटक)
 • अ‍ॅडम
 • अंतर्बाह्य
 • अपरात्र (कथासंग्रह)
 • अंश (कथासंग्रह)
 • आम्हाला वेगळं व्हायचंय
 • आरण्यक (महाभारतावरील कथानकावर आधारित नाटक. या नाटकाच्या पुस्तकाला दुर्गा भागवत यांची प्रस्तावना आहे.)
 • इंदिरा (नाटक, लेखन आणि दिग्दर्शन - रत्‍नाकर मतकरी)
 • इन्व्हेस्टमेंट (या कथासंग्रहातील ’इन्व्हेस्टमेंट’ या कथेवर याच नावाचा मराठी चित्रपट आहे.)
 • एकदा पहावं करून (मूळ इंग्रजी नाटकाचा स्वैर अनुवाद असलेले नाटक, गुजराथीत हे नाटक ’बे लालना राजा’ या नावाने रंगभूमीवर आले आहे, दिग्दर्शक :अरविंद जोशी)
 • एक दिवा विझताना (कथासंग्रह)
 • ऐक टोले पडताहेत
 • कबंध (कथासंग्रह)
 • कर्ता-करविता (नाटक)
 • कायमचे प्रश्न (वैचारिक)
 • खेकडा (कथासंग्रह)
 • खोल खोल पाणी (नाटक)
 • गहिरे पाणी (रंगमंचावर अनेकदा सादर झालेल्या कथांचा संग्रह. दूरचित्रवाणीवरही या कथा ५०हून अधिक भागांत क्रमशः प्रदर्शित झाल्या)
 • घर तिघांचं हवं
 • चार दिवस प्रेमाचे (ललित)
 • चि.सौ.कां.चंपा गोवेकर (नाटक)
 • चूकभूल द्यावी घ्यावी (एकांकिका)
 • जादू तेरी नझर (नाटक)
 • जावई माझा भला (नाटक)
 • जोडीदार
 • जौळ (कथासंग्रह)
 • तन-मन (नाटक)
 • तृप्त मैफल (कथासंग्रह)
 • दहाजणी
 • दादाची गर्ल फ्रेंड
 • निजधाम (कथासंग्रह)
 • निर्मनुष्य (कथासंग्रह)
 • परदेशी (कथासंग्रह)
 • पानगळीचं झाड
 • पोर्ट्रेट आणि दोन एकांकिका
 • प्रियतमा (नाटक)
 • फँटॅस्टिक
 • फाशी बखळ (कथासंग्रह)
 • बकासुर (नाटक)
 • बारा पस्तीस
 • बाळ, अंधार पडला
 • बृहन्महाराष्ट्र मंडळ शिकागो संमेलन २०११ - भाषण
 • ब्रह्महत्या
 • मध्यरात्रीचे पडघम (कथासंग्रह)
 • महाराष्ट्राचं चांगभलं (ललित)
 • माझे रंगप्रयोग (७०४ पानी ग्रंथ - आत्मकथन, अनुभव कथन, आठवणी)
 • माणसाच्या गोष्टी भाग १, २.
 • मृत्युंजयी (कथासंग्रह)
 • रंगयात्री
 • रंगरूप-रंगभूमी चिकित्सा
 • रंगांधळा (कथासंग्रह)
 • रत्‍नपंचक
 • रत्‍नाकर मतकरी यांच्या श्रेष्ठ कथा  : भाग १, २. (संपादक गणेश मतकरी)
 • रत्‍नाक्षरं - रत्‍नाकर मतकरी : व्यक्ती आणि साहित्य (ललित)
 • रसगंध (माहितीपर)
 • लोककथा - ’७८
 • विठो रखुमाय (नाटक)
 • शब्द ..शब्द ..शब्द
 • शांततेचा आवाज
 • शूऽऽ कुठं बोलयचं नाही (नाटक, मूळ इंग्रजी नाटकावर आधारित))
 • संदेह (कथासंग्रह)
 • संभ्रमाच्या लाटा (कथासंग्रह)
 • साटंलोटं (नाटक)
 • सोनेरी मनाची परी
 • स्पर्श अमृताचा (नाटक)
 • स्वप्नातील चांदणे (परिकथासंग्रह)
 • हसता हसविता

बालसाहित्य/नाटके[संपादन]

 • अचाटगावची अफाट मावशी
 • अलबत्या गलबत्या
 • गाऊ गाणे गमतीचे (बालगीते)
 • चटकदार - ५+१
 • चमत्कार झालाच पाहिजे !
 • निम्माशिम्मा राक्षस
 • यक्षनंदन
 • राक्षसराज झिंदाबाद
 • शाबास लाकड्या
 • सरदार फाकडोजी वाकडे

स्तंभ लेखन[संपादन]

 • ’आपलं महानगर’ या वृत्तपत्रातून मधून "सोनेरी सावल्या"

पुरस्कार[संपादन]

 • १९७८ : अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा ज्योत्स्ना भोळे पुरस्कार
 • १९८६ : उत्कृष्ठ पटकथेसाठी दादासाहेब फाळके पुरस्कार (चित्रपट : माझं घर माझा संसार)
 • नाट्यदर्पणचा नाना ओक पुरस्कार
 • १९८५ : अखिल भारतीय नाट्यपरिषदेचा देवल पुरस्कार
 • १९८५ : राज्य शासनाचा अत्रे पुरस्कार
 • १९९९ : नाट्यव्रती पुरस्कार
 • २००३ : संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार
 • २०१६ : ‘माझे रंगप्रयोग’ या ग्रंथासाठी इंदिरा-भालचंद्र पुरस्कार
 • २०१६ : शांता शेळके पुरस्कार

गौरव[संपादन]

 • १९८३: भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाची शिष्यवृत्ती

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. "पहिल्या ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रत्नाकर मतकरी यांच्याविषयी" (मराठी मजकूर). युनिक फीचर्स. १ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले. 


बाह्य दुवे[संपादन]