निर्मलकुमार फडकुले
Appearance
निर्मलकुमार फडकुले (: १६ नोव्हेंबर, १९२८ - २९ जुलै, २००६) हे मराठी संत साहित्यातले विद्वान होते. त्यांचा जन्म सोलापूर येथे एका संस्कृत विद्वानाच्या (न्यायतीर्थ, पंडित जिनदासशास्त्री फडकुले यांच्या) घरी झाला.
त्याच्या "लोकहितवादी: काल आणि कर्तृत्त्व" ह्या संशोधन प्रबंधास डॉक्टरेट मिळाली होती. त्यांनी नांदेडमध्ये (इ.स.१९५४ ते५५ या काळात) व नंतर संगमेश्वर कॉलेजमध्ये मराठी विभाग प्रमुख म्हणून काम केले.
ललित लेखन आणि संतसाहित्याच्या लेखनाबरोबरच त्यांची "आस्वाद समीक्षा" साहित्य जगतात कौतुकास पात्र ठरली होती.
प्रकाशित साहित्य
[संपादन]- अमृतकण कोवळे
- अश्रूंची कहाणी
- आनंदाची डहाळी
- कल्लोळ अमृताचे
- काही रंग, काही रेषा
- चिंतनाच्या वाटा
- परिवर्तनाची चळवळ
- प्रिय आणि अप्रिय
- मन पाखरू पाखरू
- संतकवी तुकाराम : एक चिंतन
- संत चोखामेळा आणि समकालीन संतांच्या रचना
- संत तुकारामांचा जीवन विचार
- संत वीणेचा झंकार
- संत सहवास
- संत साहित्य : सौंदर्य आणि सामर्थ्य
- संतांचिया भेटी
- साहित्यातील प्रकाशधारा
- सुखाचा परिमळ
- हिरव्या वाटा
- रंग एकेकाचे (चौथा ललित संग्रह)
संपादन
[संपादन]- अमृतधारा (संपादक निर्मलकुमार फडकुले व द. ता. भोसले)
- चिपळूणकरांचे तीन निबंध
- नियतकालिक : आदित्य
- नियतकालिक : शुभंकर
- प्रबोधनातील पाऊलखुणा
- रत्नकरंड श्रावकाचार
- ज्ञानेश्वरी प्रथमाध्याय
व्याख्याने
[संपादन]निर्मलकुमार फडकुले ह्यांची आंबेडकर, कवी कुंजविहारी, ना.सी. फडके, प्रल्हाद केशव अत्रे, महात्मा फुले, सावरकर ह्यांच्यावरील व्याख्याने प्रसिद्ध आहेत.
पुरस्कार आणि सन्मान
[संपादन]- भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार.
- डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचे नाव सोलापुरातील एका सभागृहाला देण्यात आले आहे.
गौरव
[संपादन]- नाशिक येथे झालेल्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (१९८६)
बाह्य दुवे
[संपादन]इतर
[संपादन]- डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठानतर्फे २००७ सालापासून दरवर्षी साहित्यातील व समाजसेवेतील कार्यासाठी पुरस्कार देण्यात येतो.