फ्रान्सिस दिब्रिटो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फादर दिब्रिटो या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
फ्रान्सिस दिब्रिटो

फादर फ्रान्सिस दिब्रिटो (४ डिसेंबर, इ.स. १९४३[१]; नंदाखाल, ठाणे जिल्हा, महाराष्ट्र - हयात) हे महाराष्ट्रातल्या वसई येथील कॅथॉलिकपंथीय ख्रिस्ती धर्मगुरू व मराठी लेखक आहेत. ख्रिस्ती व ज्यू धर्म हे त्यांचे प्रमुख अभ्यासविषय असून त्यांविषयी त्यांनी मराठीतून लेखन केले आहे.

जीवन[संपादन]

दिब्रिटोंचा जन्म ४ डिसेंबर, इ.स. १९४२ रोजी वसई तालुक्यातल्या नंदाखाल गावी झाला. दिब्रिटो इ.स. १९८३ ते इ.स. २००७ या कालखंडात सुवार्ता या प्रामुख्याने मराठी कॅथॉलिक समाजाशी संबंधित असलेल्या वार्तापत्राचे मुख्य संपादक होते</ref name="कार्व्हालो">. त्यांचे शिक्षण नंदाखाल येथील संत जोसेफ मराठी हायस्कुलात झाले. इ.स. १९७२ साली त्यांनी कॅथॉलिक धर्मगुरुपदाची दीक्षा घेतली. त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात बी.ए., तर धर्मशास्त्रात एम.ए. केले आहे.

कार्य[संपादन]

फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिस्ती धर्मगुरू असले, तरी त्यांची खरी ओळख ती नाही. दिब्रिटो हे पर्यावरणाचे रक्षणकर्ते, गुंडशाहीविरुद्ध आवाज उठविणारे कार्यकर्ते आणि सुजाण, सजग आणि सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व आहे. ’सुवार्ता’ या मासिकाद्वारे त्यांनी सामाजिक प्रबोधनाचे अनेक वेगवेगळे विषय मांडले आणि काही उपक्रमही राबवले. त्यामुळे हे मासिक केवळ ख्रिस्तीधर्मीयांसाठी न राहता मराठी साहित्यातही या मासिकाचा स्वतंत्र ठसा उमटला. ’हरित वसई संरक्षण समिती’च्या माध्यमातून फ्रान्सिस दिब्रिटो यांनी पर्यावरण संरक्षण, जतन आणि संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली. वसईतील ’राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकारण’ यांच्या विरोधातही त्यांनीपुढाकार घेतला आणि मोठी मोहीम राबविली.

संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची हे पुस्तक लिहिण्यासाठी दिब्रिटो यांनी बराच काळ इस्रायलमध्ये राहून संशोधन केले होते.[२].

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे प्रकाशित साहित्य[संपादन]

 • आनंदाचे अंतरंग : मदर तेरेसा
 • ओअ‍ॅसिसच्या शोधात
 • तेजाची पाऊले
 • नाही मी एकला
 • संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची : इस्रायल व परिसराचा संघर्षमय इतिहास
 • सुबोध बायबल - नवा करार (’बायबल दि न्यू टेस्टॅमेंट’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद)
 • सृजनाचा मोहोर

सन्मान[संपादन]

 • फ्रान्सिस दिब्रिटो हे पुणे येथे झालेल्या १५व्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
 • ’सुबोध बायबल- नवा करार’ या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमीचा २०१३ सालचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार मिळाला आहे.
 • प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान (१४-७-२०१७)

संदर्भ[संपादन]

 1. ^ सिसिलिया कार्व्हालो. "कृतिशील समाजचिंतक: फादर दिब्रिटो" (मराठी मजकूर). थिंकमहाराष्ट्र.कॉम. २४ सप्टेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. 
 2. ^ "सृजनाचा मोहोर[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (मराठी मजकूर). लोकसत्ता. १४ जुलै, इ.स. २००२.  Wikilink embedded in URL title (सहाय्य)
Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.