पुणे महानगर क्षेत्र
Jump to navigation
Jump to search
पुणे महानगर क्षेत्रामध्ये पुणे जिल्ह्यातील १४ तालुक्यांपैकी पुणे शहर तालुका आणि हवेली तालुका यांचा संपूर्णपणे समावेश होतो तर मुळशी, मावळ, भोर, दौंड, खेड या तालुक्यांच्या काही भागाचा समावेश होतो.
पुणे महानगर क्षेत्राचा विस्तार ७,२५३ चौरस किलोमीटर आहे.
या क्षेत्रासाठी महाराष्ट्र शासनाने पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पी.एम.आर.डी.ए.) या संस्थेची स्थापना केलेली आहे.
पुणे महानगर क्षेत्रामध्ये खालील संस्थांच्या हद्दीमध्ये येणारा परिसर समाविष्ट होतो:
- पुणे महानगरपालिका
- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
- पुणे छावणी परिषद
- खडकी छावणी परिषद
- देहूरोड छावणी परिषद
- तळेगाव दाभाडे नगरपरिषद
- लोणावळा नगरपरिषद
- आळंदी नगरपरिषद
- सासवड नगरपरिषद
- शिरुर नगरपरिषद
- चाकण नगरपरिषद
- राजगुरुनगर नगरपरिषद
आणि लगतची सुमारे ८६५ गावे