सरोज देशपांडे
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सरोज देशपांडे | |
---|---|
जन्म | महाराष्ट्र, भारत |
मृत्यू | ,महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कथा, कादंबरी अनुवाद |
प्रसिद्ध साहित्यकृती | अशी काळवेळ |
पुरस्कार | साहित्य अकादमी पुरस्कार |
सरोज देशपांडे (जन्मदिनांक अज्ञात - हयात) या मराठी भाषेतील लेखिका आहेत.
शिक्षण
[संपादन]सरोज देशपांडे यांचे शिक्षण पुणे विद्यापीठाच्या संस्कृत प्रगत अध्ययन केंद्रात झाले आहे.
लेखन
[संपादन]इतिहास, भूशास्त्र, पर्यावरण इत्यादी विषयांवरील पुस्तके, तसेच गिरीश कर्नाड यांची काही नाटके व काही अन्य सामाजिक विषयांवरील कादंबऱ्याही त्यांनी अनुवादित केल्या आहेत. ’झेन अँड द आर्ट ऑफ़ मोटारसायकल मेन्टेनन्स’ या जीवनविषक तत्त्वज्ञान सांगणाऱ्या कादंबरीचा त्यांनी केलेला अनुवाद रोहन प्रकाशनने प्रसिद्ध केला आहे.
सरोज देशपांडे यांची पुस्तके
[संपादन]- अग्नी आणि पाऊस (अनुवादित. मू्ळ लेखक - गिरीश कर्नाड)
- अशी काळवेळ (अनुवादित. मूळ पुस्तक - ए मॅटर ऑफ टाईम. लेखक - शशी देशपांडे)
- उपाय साधेसोपे (अनुवादित. मूळ लेखक शशी देशपांडे)
- काटेसावरी (अनुवादित, मूळ लेखक - गिरीश कर्नाड)
- जिथं स्त्रियांना घडवलं जातं (अमुवादित. मूळ हिंदी पुस्तक - जहाँ औरतें गढ़ी जाती हैं. लेखिका - मृणाल पांडे)
- झेन अँड द आर्ट ऑफ़ मोटारसायकल मेन्टेनन्स (अनुवादित. मूळ लेखक - रॉबर्ट एम. पिरसिंग)
- डॅडी लाँगलेग्ज (अनुवादित. मूळ लेखक - जीन वेब्सस्टर)
- परिस्थिती विज्ञान (किशोर विज्ञान मालिका). अनुवादित, मूळ लेखक - मायकल स्कॉट
- तमचं बाळ (सहलेखिका यशोधरा वैद्य)
- तुमचा बालक (सहलेखिका यशोधरा वैद्य)
- पुष्पसाज (अनुवादित, मूळ लेखक - गिरीश कर्नाड)
- पृथ्वी आपला ग्रह (मूळ लेखक - मायकल स्कॉट?)
- बली (अनुवादित. मू्ळ लेखक - गिरीश कर्नाड)
- बाग एक जगणं
- ब्रिटिशांची भारतातील राजनीती (अनुवादित. मूळ पुस्तक - British Policy in India, 1858-1905, लेखक - सर्वेपल्ली गोपाल)
- भंगलेले बिंब (अनुवादित, मूळ लेखक - गिरीश कर्नाड)
- भरतमुनींचे नाट्यशास्त्र
- भारतीय प्रयोगकलांचा शास्त्रविचार : संगीत, नृत्य आणि नाटक (सहलेखिका - अमला शेखर व शुभांगी बहुलकर)
- महात्मा गांधीं - राजकीय चरित्र (अनुवादित. मूळ जर्मन पुस्तक : Mahatma Gandhi: Der Revolutionar der Gewaltlosigkeit : eine politische Biographie, लेखक डीटमार रोदरमुंड)
- महात्म्याच्या प्रतीक्षेत (अनुवादित. मूळ पुस्तक - वेटिंग फॉर दि महात्मा, मूळ लेखक - आर.के. नारायण)
- मालगुडीचा नरभक्षक (अनुवादित. मूळ पुस्तक दि मॅन-ईटर ऑफ मालगुडी, मूळ लेखक - आर.के. नारायण)
- वेडिंग आल्बम (अनुवादित, मूळ लेखक - गिरीश कर्नाड)
- संस्कृत साहित्याची तोंडओळख
- साहित्यशास्त्र : स्वरूप आणि समस्या
- हयवदन (अनुवादित, मूळ लेखक - गिरीश कर्नाड)
पुरस्कार
[संपादन]’अशी काळवेळ’ या मराठीत अनुवादित केलेल्या पुस्तकासाठी त्यांना इ.स. २०१० सालातील साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. या अनुवादाचे ’ए मॅटर ऑफ टाईम’ नावाचे मूळ पुस्तक शशी देशपांडे यांनी लिहिले होते. अकादमीने इ.स. २००४ ते इ.स. २००८ या कालावधीतील अनुवादित पुस्तके विचारात घेऊन देशपांडे यांना पुरस्कार जाहीर केला.