नवश्या मारुती
Appearance
पुण्यातील नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) पु.ल देशपांडे उद्यानाच्या बरोबर समोर असलेले हे एक प्राचीन मारुती मंदिर आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला एक पिंपळाचा वृक्ष आहे. नवस पूर्ण करणारा मारुती अशी ख्याती असल्याकारणाने या मारुतीचे नवश्या मारुती असे नामकरण झाले. दर शनिवारी येथे दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागतात.