किशोर शांताबाई काळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. किशोर शांताबाई काळे (जन्म: इ.स. १९७०; मृत्यू : २००७) हे मराठीतील एक डॉक्टर व लेखक होते.

भटक्या तमासगीर "कोल्हाटी" समाजात जन्माला आलेल्या, व बाप कोण हे माहिती नसल्याने आईचे नांव लावणाऱ्या डॉ. किशोर काळे ह्यांचे अत्यंत गाजलेले कोल्हाट्याचे पोर हे आत्मचरित्र ग्रंथालीने नोव्हेंबर १९९४मध्ये प्रकाशित केले होते. त्याचे इंग्रजी भाषांतर ’पेन्ग्विन पब्लिकेशन्स’ ने प्रकाशित केले आहे.

अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा किशोर काळे यांनी वैद्यकशास्त्रातील एम.बी.बी.एस. ही पदवी मिळवली. कोल्हाट्याचे पोर या पुस्तकाचा शेवट ’मी१९९४साली एम.बी.बी.एस. झालो’ या वाक्याने होतो.

पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर डॉ. काळ्यांना त्यांच्या समाजाने बहिष्कृत केले.

डॉ. काळ्यांचे दुसरे पुस्तक मी डॉक्टर झालो हे "आपलं प्रकाशन" ने प्रकाशित केले आहे.

२१ फेब्रुवारी २००७ ला डॉ. किशोर काळ्यांचा वयाच्या ३७ व्या वर्षी अपघाती मृत्यू झाला.

त्यांच्या मृत्यूनंतर १९ वर्षांनी कोल्हाटी समाजाच्या काही नेत्यांनी या पुस्तकावर बंदी आणावी अशी मागणी केली आहे!

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.