भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी या पानावरून पुनर्निर्देशित)
The Network of National Highways in India

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण ही संस्था भारतातील महामार्गांची बांधणी व देखभाल करते. भारताच्या अर्थव्यवस्थेत या महामार्गांच्या जाळ्याचा मोठा व महत्त्वाचा वाटा आहे. या महामार्गांची एकूण लांबी सुमारे ५८,००० कि.मी आहे, पैकी ४,८८५ कि.मी. लांबीचा रस्ता जाण्या-येण्याच्या मार्गिकांमध्ये दुभागलेला आहे.

यातील बहुतेक महामार्गांवर २+२ मार्गिका असतात. विकसित भागात अनेकदा हे ४+४ मार्गिकांइतके रुंद होतात तर मोठ्या शहरांमध्ये ८+८ मार्गिकांचे महामार्गही आहेत. भारतातील एकूण रस्त्यांच्या लांबीपैकी फक्त २% रस्ते महामार्ग आहेत पण त्यांवरून सुमारे ४०% वाहनांची वाहतूक होते. राष्ट्रीय महामार्ग (सुधारित) कायदा, १९९५नुसार महामार्गांची बांधणी व देखभालीसाठी खाजगी उद्योगांनाही मुभा मिळाली आहे.

रा.म. ७ हा वाराणसीपासून कन्याकुमारी पर्यंतचा महामार्ग सगळ्यात जास्त लांबीचा आहे. जबलपूर, नागपूर, हैदराबादबंगलोर मार्गे जाणारा हा रस्ता २,३६९ कि.मी. लांबीचा आहे. रा.म. ४७अ हा महामार्ग सगळ्यात छोटा आहे. ६ कि.मी. लांबीचा हा रस्ता एर्नाकुलमला कोचीन बंदराशी जोडतो. मनालीपासून लेहला जाणारा महामार्ग जगातील सगळ्यात उंचीवरचा महामार्ग आहे.

भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी अशी :

अंदमान आणि निकोबार[संपादन]

क्र. रा.म.क्र. मार्ग लांबी (कि.मी.)
२२३ राष्ट्रीय महामार्ग २२३ पोर्ट ब्लेअर - बाराटांग - मायाबंदर ३००

अरुणाचल प्रदेश[संपादन]

क्र. रा.म.क्र. मार्ग लांबी (कि.मी.)
५२ आसाम सीमेपासून - पासीघाट - दाम्बुक - रोइंग - पया - तेझू - वाक्रो - नमसाई - आसाम सीमेपर्यंत ३१०
५२-ए आसाम सीमेपासून - इटानगर - आसाम सीमेपर्यंत ४२
१५३ आसाम सीमेपासून - म्यानमार सीमेपर्यंत(स्टिलवेल रोड) ४०

आंध्र प्रदेश[संपादन]

क्र. रा.म.क्र. मार्ग लांबी (कि.मी.)
कर्नाटकच्या सीमेपासून - पल्मानेर - चित्तूर - नरहरीपेटा - तमिळनाडूच्या सीमेपर्यंत ८३
ओरिसा सीमेपासून - इच्छापुरम - नरसण्णापेटा - श्रीकाकुलम - भिमुनीपटणम - विशाखापट्टणम - प्रट्टीपाडु - राजमुंद्री - एलुरू - हनुमान जंक्शन - विजयवाडा - गुंटुर - ओंगोले - नेल्लोर - गुडुर - तमिळनाडू सीमेपर्यंत १०००
महाराष्ट्र सीमेपासून - आदिलाबाद - निर्मल - रामायमपेट - हैदराबाद - कुर्नूल - गूटी - अनंतपूर - पेनुकोंडा - कर्नाटक सीमेपर्यंत ७५३
कर्नाटक सीमेपासून - झहीराबाद - हैदराबाद - सुरियापेट - विजयवाडा - मछलीपट्टणम ४३०
१६ निझामाबाद - अरमुर - जगत्याल - चिन्नुर - महाराष्ट्र सीमेपर्यंत २२०
१८ कुर्नूल - नंद्याल - कडप्पा - रायाचोटी - चित्तूर ३६९
४३ ओरिसा सीमेपासून - सालूर - रामभद्रपुरम - विजयनगर - नटवळसा जवळ रा.म.५शी तिठ्यापर्यंत ८३
६३ कर्नाटक सीमेपासून - गुंटकल - गूटी ६२
२०२ हैदराबाद - वारंगळ - वेंकटपुरम - छत्तीसगड सीमेपर्यंत २४४
१० २०५ अनंतपूर - कादिरी - मदनपल्ले - रेणीगुंठा - तमिळनाडू सीमेपर्यंत ३६०
११ २१४ कथीपुडी - काकीनाडा - राझोल - सिंचिनाडा- नरसापूर - पमुर्रू (?) २७०
१२ २१४-ए दिगामर्रू जवळ रा.म.२१४च्या तिठ्यापासून - नरसापूर - मछलीपट्टणम - चल्लापल्ले - अवनीगड्डा - रेपल्ले - बपतला - चिराळा - ओंगोले जवळ रा.म.५शी तिठ्यापर्यंत २५५
१३ २१९ मदनपल्ले - पुंगानुरू - पल्मानेर - कुप्पम - तमिळनाडू सीमेपर्यंत १२८
१४ २२१ विजयवाडा जवळ रा.म.९च्या तिठ्यापासून - कोंडापल्ली - मल्लावरम - तिरुवुरू - पेनुबल्ली - कोतागुडेम - पलोंचा - भद्राचलम - नेल्लीपका - चिंतुरू - कोंटा - छत्तिसगढ सीमेपर्यंत १५५
१५ २२२ महाराष्ट्र सीमेपासून ते निर्मल जवळ रा.म.७शी तिठ्यापर्यंत ६०

आसाम[संपादन]

क्र. रा.म.क्र. मार्ग लांबी (कि.मी.)
३१ पश्चिम बंगाल सीमेपासून - गौरीपूर - उ. सलमारा - बिजनी - चरलियामिनगांव - रा.म.क्र. ३७शी तिठा ३२२
३१ब उत्तर सल्मारिया - जोगिघोपाजवळ रा.म.क्र. ३७शी तिठा १९
३१क पश्चिम बंगाल सीमेपासून - कोचुगांव - सिडली - बिजनीजवळ रा.म.क्र. ३१शी तिठा ९३
३६ नागौन - डबाका - अमलाखी - नागालॅंड सीमेपर्यंत १६७
३७ गोलपाराजवळ रा.म.क्र. ३१बशी तिठा - पैकान - गुवाहाटी - दिसपूर - नागांव - नुमलीगढ - जोरहाट - झांझई - दिब्रुगढ - तिनसुकिया - माकुम - सैखोआघाट ६८०
३७अ कुवारी तालतेजपूरजवळ रा.म.क्र. ५२शी तिठा २३
३८ माकुम - लेडो - लेखापानी ५४
३९ नुमलीगढ - नौजन - बोकाजन नागालॅंड सीमेपर्यंत ११५
४४ मेघालय सीमेपासून - बदरपूर - करीमगंज - पठारकंडी त्रिपुरा सीमेपर्यंत १११
१० ५१ पैकन मेघालय सीमेपर्यंत २२
११ ५२ बैहाटर - चरली - मंगलदेई - ढेकियाजुली - तेजपूर - गोहपुर - बंदरदेवा - उत्तर लखीमपुर - धेमाजी - कुलाजन - अरुणाचल प्रदेश सीमा - सैखोआघाटजवळ रा.म.क्र. ३७शी तिठा ५४०
१२ ५२अ गोहपूर - अरुणाचल प्रदेश सीमा - बंदरदेवा १५
१३ ५२ब कुलाजन - दिब्रूगढ ३१
१४ ५३ बदरपूरजवळ रा.म. ४४शी तिठा - सिलचर - लखीपूर मणिपूर सीमेपर्यंत. १००
१५ ५४ डबाका - लुम्डिंग - लांगटींग - हबलोंग - सिलचर - दवारबंद मिझोरम सीमेपर्यंत ३३५
१६ ६१ झांझी - अंगूरी - नागालॅंड सीमेपर्यंत २०
१७ ६२ दुधनई - दामरा मेघालय सीमेपर्यंत
१८ १५१ करीमगंज - बांग्लादेश सीमेपर्यंत १४
१९ १५२ पतचरकुची - हजुआ - भूतान सीमेपर्यंत ४०
२० १५३ लिडो - लेखापानी - अरुणाचल प्रदेश सीमेपर्यंत २०
२१ १५४ धलेश्वर (बदरपूर) - भैरभी - मिझोरम सीमेपर्यंत ११०

उत्तर प्रदेश[संपादन]

क्र. रा.म.क्र. मार्ग लांबी (कि.मी.)
हरियाणा सीमेपासून - कोसी - मथुरा - आग्रा - फिरोझाबाद - इटावाह - औरैया - कानपूर - फतेहपूर - अलाहाबाद - गोपीगंज - वाराणसी - चंदौली - बिहार सीमेपर्यंत ७५२
२A सिकंद्रा - भोगनीपूर २५
आग्रा राजस्थान सीमेपर्यंत २६
वाराणसी - मिर्झापूर - लालगंज - बरौंदा मध्यप्रदेश सीमेपर्यंत १२८
११ आग्रा - किरौली राजस्थान सीमेपर्यंत ५१
१२A मध्यप्रदेश सीमेपासून झांसीजवळ रा.म. २६शी तिठ्यापर्यंत
१९ गाझीपुर - बलिया - रूद्रपूर बिहार सीमेपर्यंत १२०
२४ दिल्ली सीमेपासून - गाझियाबाद - मुरादाबाद - रामपुर - बरेली - शाहजहानपुर - सीतापुर - लखनौ ४३१
२४A बक्शी-का-तालाब - चेनहट (रा.म. २८) १७
१० २५ लखनौ - उन्नाव - कानपुर - उरई - झांसी - रकसा मध्यप्रदेश सीमेपर्यंत २७०
११ २५A रा.म. २५ च्या कि.मी.१९ ते बक्शी-का-तालाब ३१
१२ २६ झांसी - ललितपुर - गोना मध्यप्रदेश सीमेपर्यंत १२८
१३ २७ अलाहाबाद - जसरा मध्यप्रदेश सीमेपर्यंत ४३
१४ २८ बिहार सीमेपासून - त्रियासुजान - गोरखपुर - बस्ती - फ़ैजाबाद - बाराबंकी - लखनौ ३११
१५ २८B बिहार सीमेपासून - पदरौना - कसिया - रा.म.२८शी तिठा २९
१६ २८C बाराबंकी - रामनगर - बहराइच - नानपाडा नेपाळ सीमेपर्यंत १४०
१७ २९ सोनौली - फरेंदा - गोरखपूर - चिल्लुपूर - कोपगंज - गाझीपूर - सैदपूर - वाराणसी ३०६
१८ ५६ लखनौ - अमेठी - जगदीशपुर - सुलतानपुर - बदलापुर - जौनपुर - वाराणसी २८५
१९ ५६A चेनहाड (रा.म. २८) कि.मी.१६ ( रा.म. ५६) १३
२० ५६B रा.म.५६ वरील कि.मी. १६ पासून रा.म.२५ च्या कि.मी. १९पर्यंत १९
२१ ५८ दिल्ली सीमेपासून - गाझियाबाद - मेरठ - मुजफ्फरनगर - पुरकाझी - उत्तराखंड सीमेपर्यंत १६५
२२ ७२A छुटमलपुर उत्तराखंड सीमेपर्यंत. ३०
२३ ७३ उत्तराखंड सीमेपासून - सहारनपूर - सरसावा - हरियाणा सीमेपर्यंत ६०
२४ ७४ उत्तराखंड सीमेपासून - नजिबाबाद - नगीना - धापपूर - अफझलगढ - उत्तराखंड सीमा- अमारिया - जहानाबाद - पीलीभीत - नवाबगंज - बरेली १४७
२५ ७५ मध्यप्रदेश सीमेपासून - करारी - मकरार - मौरामपूर - मध्यप्रदेश सीमा- दुधीनगर - विन्डहॅमगंज ११०
२६ ७६ मध्यप्रदेश सीमेपासून - झांसी - मौरानीपूर - मध्यप्रदेश सीमा - कुलपहार - महोबा - बांदा - कारवी - महू - जस्रा - अलाहाबाद - मिर्झापूर ५८७
२७ ८६ कानपुर - घाटमपूर - हमीरपुर - मौदाहा - कबराई - महोबा - मध्यप्रदेश सीमेपर्यंत. १८०
२८ ८७ रामपुर - बिलासपूर उत्तराखंड सीमेपर्यंत ३२
२९ ९१ गाझियाबाद - दादरी - सिकंदराबाद - बुलंदशहर - खुर्जा - अमिया - अलिगढ - इटाह - कनौज - कानपुर ४०५
३० ९१A इटावाहजवळ रा.म. २शी तिठा भरथाना - बिधुना - बेला - कनौजजवळ रा.म. ९१शी तिठा१२६ ४०५
३१ ९२ भोनगांव - बेवार - किशनी - इटावाह - उडी राजस्थान सीमेपर्यंत ७५
३२ ९३ आग्रा - हाथरस - अलिगढ - बब्राला - चंदौसी - बिलारी - मुरादाबाद २२०
३३ ९६ फैजाबाद - सुलतानपुर - बेला - प्रतापगढ - सोराओं - अलाहाबाद १६०
३४ ९७ गाझीपुर - झमानिया - सैयद राजा ४५
३५ ११९ मेरठजवळ रा.म. ५८शी तिठा - मावना - बाहसुमा - बिजनोर - किरतपूर - नजिबाबाद - उत्तराखंड सीमेपर्यंत. १२५

उत्तराखंड[संपादन]

क्र. रा.म.क्र. मार्ग लांबी (कि.मी.)
५८ उत्तर प्रदेश सीमेपासून - मंगलूर - रुरकी - हरिद्वार - ऋषिकेश - शिवपुरी - देवप्रयाग - श्रीनगर - खानकरा - रूद्रप्रयाग - कर्णप्रयाग - चमोली - जोशीमठ - बद्रीनाथ - मना ३७३
७२ हिमाचल प्रदेश सीमेपासून - धलिपुर - साहसपूर - झाजरा - देहरादुन - बुल्लावा - हरिद्वार १००
७२A उत्तर प्रदेश सीमेपासून - माजरा - देहरादुन १५
७३ रुरकी - भगवानपूर उत्तर प्रदेश सीमेपर्यंत २०
७४ हरिद्वार - उत्तर प्रदेश सीमा - जसपुर - काशीपुर - बाराखेरा - रूद्रपूर - किछा - सितारगंज - उत्तर प्रदेश सीमेपर्यंत. १५३
८७ उत्तर प्रदेश सीमेपासून - रूद्रपूर - पंतनगर - हलद्वानी - नैनिताल - भोवाली - अलमोडा - रानीखेत - द्वारहाट - चौकुटिया - गैरसैन - आडबदरी - कर्णप्रयागजवळ रा.म. ५८शी तिठा २८४
९४ ऋषिकेश - अंपाटा - तेहरी - छाम - धरासू - कुठानौर - खरसाली - यमुनोत्री १६०
१०८ धरासू - उत्तरकाशी - मनेरी - भटवारी - पुरगा - भैरवघाटी - गौरीकुंड - गंगोत्री १२७
१०९ रूद्रप्रयाग - तिलवारा - गुप्तकाशी - केदारनाथ ७६
१० ११९ उत्तर प्रदेश सीमेपासून - कोटद्वारा - बाणघाट - बुबाखाल - पौडी - श्रीनगर १३५
११ १२१ काशीपूरजवळ रा.म. ७४ तिठा - रामनगर - धुमकोट - थालीसैन - त्रिपालीसैन - पाबो - पैठानी - बुबाखालजवळ रा.म. ११९तिठा २५२
१२ १२३ हरबतपूरजवळ रा.म. १७२तिठा [ - विकासनगर - कालसी - बडवाला - नैनबाग - नौगांव - बारकोटाबेंड ९५
१३ १२५ सितारगंजजवळ रा.म. ७४तिठा - खाटीमा - तनकपूर - चंपावत - पिठोरागढ २०१

ओरिसा[संपादन]

क्र. रा.म.क्र. मार्ग लांबी (कि.मी.)
बहरागोरा जवळ रा.म.क्र.६शी तिठा - बारीपाडा - बालेश्वर - भद्रख - कटक - भुवनेश्वर - खोर्धा - छत्रपूर - ब्रह्मपूर - आंध्र प्रदेश सीमेपर्यंत. ४८८
५A हरीदासपूरजवळ रा.म.क्र.५शी तिठा - पारादीप बंदर ७७
छत्तिसगढ सीमेपासून - लोबारचट्टी - बारगढ - संबळपूर - देबगढ - बारकोटे - केंदुझारगढ - जशीपूर - बांग्रीपोसी झारखंड सीमेपर्यंत ४६२
२३ झारखंड सीमेपासून - पनपोश - राउरकेला - राजमुंड्रा - बारकोटे - पाला लहार्हा - तालचेर - रा.म.क्र.४२ २०९
४२ संबळपूरजवळ रा.म.क्र.६शी तिठा - रायराखोल - अंगुल - धेनकनाल - कटक जवळ रा.म.क्र.५शी तिठा २६१
४३ छत्तिसगढ सीमेपासून - धनपूंजी - बोरिगुमा - जयपूर - कोरापुट - सुंकी - आंध्र प्रदेश सीमा. १५२
६० पश्चिम बंगाल सीमेपासून - जलेश्वर - बालेश्वर ५७
७५ झारखंड सीमेपासून परसोराजवळ रा.म.क्र. २१५शी तिठा १८
२०० छत्तिसगढ सीमेपासून - मचिदा - झर्सुगुडा - कोचिंदा - देवगढ - तालचेर - कामाख्यानगर - सुकिंदा - चंधिखोल ४४०
१० २०१ बोरिगुमा - अंपानी - भवानीपटना - बेलगान - बालांगीर - लुइसिंगा - जोगीसुरूडा - डुंगुरीपाली - बारगढ ३१०
११ २०३ भुवनेश्वर - पिपिली - पुरी - कोणार्क ९७
१२ २०३A जगन्नाथपुरीजवळ रा.म.क्र. २०३शी तिठा - ब्रह्मगिरी - सातपाडा ४९
१३ २१५ पाणिकोली - आनंदपूर - घाटगन - केंदुझारगढ - परसोरा - कोइरा - राजमुंड्रा ३४८
१४ २१७ छत्तिसगढ सीमेपासून - नौपढा - खरियार - तितलागढ - बेलगान - रमापूर - बलीगुढा - नुआगांव - रैकिया - जी. उदयगिरी - कलिंग - भंजनगर - अस्का - ब्रह्मपूर - नरेंद्रपूर - गोपालपूर ४३८
१५ २२४ खोर्धा - नयागढ - दशापल्ला - पुरुनाकटक - बौडा - सोनापूर - बालांगीर २९८

कर्नाटक[संपादन]

क्र. रा.म.क्र. मार्ग लांबी (कि.मी.)
महाराष्ट्र सीमेपासून - संकेश्वर - बेळगांव - धारवाड - हुबळी - हावेरी - दावणगेरे - चित्रदुर्ग - सिरा - तुमकुर - नेलामंगला - बंगळूर - होस्कोट - कोलार - मुलबागल - आंध्र प्रदेश सीमेपर्यंत ६५८
४A बेळगांव - खानापूर - गुंजी - गोवा सीमेपर्यंत ८२
आंध्र प्रदेश सीमेपासून - चिकबळ्ळापूर - देवनहल्ली - बंगळूर - इलेक्ट्रॉनिक सिटी - चंदापुरा - अट्टीबेले - तमिळनाडू सीमेपर्यंत १२५
महाराष्ट्र सीमेपासून - राजेश्वर - हुमनाबाद - मंगलगी - आंध्र प्रदेश सीमेपर्यंत. ७५
१३ महाराष्ट्र सीमेपासून - होर्टी - विजापूर - हुंगुंड - कुश्टागी - होस्पेट - जगलूर - चित्रदुर्ग - होलालकेरे - भद्रावती - शिमोगा - तीर्थहळ्ळी - करकल - मंगळूर ६४८
१७ गोवा सीमेपासून - कारवार - अंकोला - होनावर - भटकळ - बैंदुर - कुंदापुरा - उडुपी - सुरत्कल-मंगलोर - तलपदी - केरळ सीमेपर्यंत. २८०
४८ बंगळूर - नेलमंगला - कुनीगल - चन्नारायपटना - हासन - अलूर - सकलेशपूर - उप्पीनंगडी - मंगळूर ३२८
६३ अंकोला - येल्लापूर - हुबळी - गदग - कोप्पळ - होस्पेट - बेळ्ळारी आंध्र प्रदेश सीमेपर्यंत ३७०
६७ गुंडलुपेट - बांदीपूर - तमिळनाडू सीमेपर्यंत ५०
१० २०६ तुमकुर - तिप्तूर - अर्सीकेरे - कडुर - भद्रावती - शिमोगा - सागर - होनावर ३६३
११ २०७ होसुर - सर्जापूर - देवनहळ्ळी - दोड्डबळ्ळापूर - नेलमंगला १३५
१२ २०९ तमिळनाडू सीमेपासून - चामराजनगर - कोल्लेगल - मलावल्ली - कनकपुरा - बंगळूर १७०
१३ २१२ केरळ सीमेपासून - मड्डुर - गुंडलुपेट - बेगुर - मैसूर - नरसीपूर - कोल्लेगल १६०
१४ २१८ हुबळी - नरगुंद - केरुर - विजापूर - सिंदगी - जवरगी - गुलबर्गा - हुमनाबाद जवळ रा.म.क्र.९शी तिठा ३९९

केरळ[संपादन]

क्र. रा.म.क्र. मार्ग लांबी (कि.मी.)
१७ कर्नाटक सीमेपासून - मंजेश्वर - कासारगोड- पय्यण्णूर - कण्णूर - कोझिकोड(कालिकत) - फेरोख - कुट्टीपुरम - पोन्नानी - चवक्कड - कोडुंगल्लुर - एडाप्पल्लीजवळ रा.म.क्र. ४७शी तिठा ३६८
४७ तमिळनाडू सीमेपासून - पलक्कड (पालघाट) - अलत्तुर - त्रिचूर - अंगमाली - एडाप्पल्ली - एर्नाकुलम - अलप्पुळा- कयानकुलम - कोल्लम - थिरुवनंतपुरम (त्रिवेंद्रम) - तमिळनाडू सीमेपर्यंत. ४१६
४७A रा.म.क्र.४७शी तिठा - विलिंग्डन बेट
४९ कोचीन - त्रिपुनितुरा -मुवट्टुपुळा - कोतामंगलम- अडिमाली - देवीकुलम - तमिळनाडू सीमेपर्यंत १५०
२०८ कोल्लम - कोट्टारकारा - तोनमला - तमिळनाडू सीमेपर्यंत ७०
२१२ कोझिकोड - तमारास्सेरी - कल्पेट्टा - सुलतान बॅटरी - कर्नाटक सीमेपर्यंत ९०
२१३ पालघाट - मनानारक्कड - मंजेरी - रमणट्टुकाराजवळ रा.म.क्र. १७शी तिठा १३०
२२० कोल्लम - कोट्टारकारा - अडूर -तिरुवल्ला - कोट्टायम - कंजिराप्पल्ली - वेंदिपेरयार- तमिळनाडू सीमेपर्यंत २१०

गुजरात[संपादन]

क्र. रा.म.क्र. मार्ग लांबी (कि.मी.)
एन.ई.-१ अमदावाद - वडोदरा द्रुतगती मार्ग ९३
हजीरा - सुरत - बारडोली - व्यारा - सोनगढ - महाराष्ट्र सीमेपर्यंत १७७
पाकिस्तान सीमेपासून - हिम्मतनगर - अमदावाद - नडियाद - वडोदरा - करजण - भरुच - अंकलेश्वर - चलथाण (सुरत) - नवसारी - वलसाड - वापी - महाराष्ट्र सीमेपर्यंत ४९८
८अ अमदावाद - बगोदरा - लिंबडी - बामणबोर - मोरबी - समखियाळी - कंडलामांडवी - विखाडी - कोठरा - नळिया - नारायण सरोवर ६१८
८ब बामणबोर - राजकोट - गोंडल - जेतपूर - धोराजी - कुटीयाणा - पोरबंदर २०६
८क चिलोडा - गांधीनगर - सरखेज ४६
८ड जेतपूर - जुनागढ - माळिया - सोरठी सोमनाथ १२७
८इ द्वारका - पोरबंदर - नवी बंदर - सोरठी सोमनाथ - कोडीनार - उना - महुवा - तळाजा - भावनगर ४४५
१४ राजस्थान सीमेपासून - पालनपुर - डीसा - सिहोरी - राधनपूर १४०
१० १५ समखियाळी - सांतलपूर - राधनपूर - भघर - थराड - राजस्थान सीमेपर्यंत २७०
११ ५९ अमदावाद - कठुआ - गोधरा - दाहोद - मध्य प्रदेश सीमेपर्यंत २११
१२ ११३ दाहोद - लिंबडी - झालोद - राजस्थान सीमेपर्यंत. ४०
१३ २२८ दांडी मार्ग साबरमती आश्रम - असलाली - नवागाम - मातर - नडियाद - आणंद - बोरसद - कंकापुरा - कारेली - अंखी - आमोद - डेरोल - अंकलेश्वर - मांगरोळ - उमरची - भाटगाम - देलाड - सुरत - वंझ - नवसारी - कारडी - दांडी ३७४

गोवा[संपादन]

क्र. रा.म.क्र. मार्ग लांबी (कि.मी.)
४अ कर्नाटक सीमेपासून - दार्बांदोरा - फोंडा - भोमा - बनस्तारी - पणजी ७१
१७ महाराष्ट्र सीमेपासून - पेर्नेम - म्हापसा - पणजी - कोर्तालिम - वेर्णा - मडगांव - कुणकोलिम - चौरी - पोलेम - कर्नाटक सीमेपर्यंत १३९
१७अ कोर्तालिम - सांकोले - चिकालम - मडगांव १९
१७ब फोंडा - वेर्णा - वास्को दा गामा ४०



चंदीगड[संपादन]

क्र. रा.म.क्र. मार्ग लांबी (कि.मी.)
२१ पंजाब सीमेपासून – चंदिगढ हरियाणा सीमेपर्यंत २४

छत्तीसगड[संपादन]

क्र. रा.म.क्र. मार्ग लांबी (कि.मी.)
महाराष्ट्र सीमेपासून - बाघनदी - चिचोला - राजनांदगांव - दुर्ग - भिलाई - रायपूर - अरंग - पिठोरा - बसना - सराईपाली -ओडिशा सीमेपर्यंत ३१४
१२A मध्य प्रदेश सीमेपासून - चिलपी - कावर्धा - पिपरीया - बेमेतारा - सिमगा १२८
१६ महाराष्ट्र सीमेपासून - भोपालपटनम - विजापूर - भैरामगढ - गिडाम - जगदलपूर २१०
४३ रायपूर - मरोड - धमतरी - चरामा - कांकेर - केसकल - परसगांव - कोंडागांव - जगदलपूर - ओडिशा सीमेपर्यंत ३१६
७८ मध्य प्रदेश सीमेपासून - महेंद्रगड - वैकुंठपूर - सूरजपुर - अंबिकापूर - कुनकुरी - पाथलगांव - यराकेरा - जशपूरनगर - रुपसेरा - झारखंड सीमेपर्यंत ३५६
१११ बिलासपुर - रतनपुर - कटघोरे - केंडाई - लक्ष्मणपुर - अंबिकापूर २००
२०० रायपूर - सिमगा - बैतालपूर - बिलासपुर - रामगढ - चंपा - सक्ती - उरावमिती - रायगढ - ओडिशा सीमेपर्यंत ३००
२०२ भोपालपटनम - भद्रकाली - कोट्टुरू आंध्र प्रदेश सीमेपर्यंत ३६
२१६ रायगढ - सरणगढ - सराईपाली ८०
१० २१७ रायपूर - महासमुंद - सुआरमार - ओडिशा सीमेपर्यंत ७०
११ २२१ आंध्र प्रदेश सीमेपासून कोंटा - सुकमा - कुकनार - दरबा - सोसनपाल - जगदलपूरजवळ रा.म.१६शी तिठा १७४

जम्मू आणि काश्मीर[संपादन]

क्र. रा.म.क्र. मार्ग लांबी (कि.मी.)
१अ पंजाब सीमेपासून - कथुआ - सांबा - जम्मू - नागनोटा - उधमपूर - बातोत - रामबन - खानाबल - अवंतीपूर - पाम्पोरे - श्रीनगर - पट्टण - बारामुल्ला - उरी ५४१
१ब बातोत - दोडा - किस्तवार - सिमथानपास - खानाबल २७४
१क डोमेल - कटरा
१ड श्रीनगर - कारगिल - लेह ४२२

झारखंड[संपादन]

क्र. रा.म.क्र. मार्ग लांबी (कि.मी.)
बिहार सीमेपासून - चौपारण - बढी - बाराकाथा - बागोदार - डुम्री - तोपचंची - गोबिंदपूर - निरसा पश्चिम बंगाल सीमेपर्यंत १९०
ओडिशा सीमेपासून - बहारागोरा - पश्चिम बंगाल सीमेपर्यंत २२
२३ चास - गोला - रामगढ - रांची - बेरो - सिसै - गुमला - पालकोट - कोलेबिरा - सिमदेगा - ओडिशा पर्यंत २५०
३१ बढी जवळ रा.म.२ शी तिठा - कोडारामा - बिहार सीमेपर्यंत ४४
३२ गोबिंदपूर जवळ रा.म.२ शी तिठा - धनबाद - चास - पश्चिम बंगाल सीमा - चंदिल - जमशेदपूर १०७
३३ बढी जवळ रा.म.२ शी तिठा - हजारीबाग - रामगढ - रांची - बुंदू - चंदिल - महुलिया - बहारागोराजवळ रा.म.६शी तिठा ३५२
७५ उत्तर प्रदेश सीमेपासून - नगर उंटारी - गढवा - डाल्टनगंज - लटेहार - चंदवा - कुरू - मंडार - रांची - खुंटी - बंद गांव - चक्रधरपूर - चौबासा - जैनितगढ - ओडिशा सीमेपर्यंत. ४४७
७८ छत्तिसगढ सीमेपासून - सिलाम - गुमला २५
८० बिहार सीमेपासून - साहिबगंज - तलिहारी - राजमहल - बढरवा - पश्चिम बंगाल सीमेपर्यंत १००
१० ९८ बिहार सीमेपासून - हरिहरगंज - छत्रपूर - राझरा जवळ रा.म. ७५शी तिठा ५०
११ ९९ चंदवा - बालुमठ - चत्रा - हंटरगंज - बिहार सीमेपर्यंत १५६
१२ १०० चत्रा - टुटीलावा - हजारीबाग - मेरू - दारू-खारिका - बागोदार ११८

तमिळनाडू[संपादन]

क्र. रा.म.क्र. मार्ग लांबी (कि.मी.)
आंध्र प्रदेश सीमेपासून - थिरुवल्लम - वालाजेपेट - कांचीपुरम - श्रीपेरुंब्दुर - पूनामल्ली - चेन्नई १२३
आंध्र प्रदेश सीमेपासून - गुम्मिडीपुंडीकावरपेट्टाई - चेन्नई ४५
कर्नाटक सीमेपासून - होसुर - क्रिश्नागिरी - धर्मपुरी - ओमालूर - सेलम - राशिपुरम - नमक्कल - परामती - करूर - डिंडीगूल - वडीपट्टी - मदुराई - विरुधु नगर - सत्तूर - कोविलपट्टी - थिरुनवेली - नांगुनेरी - वट्टकोट्टाई - कन्याकुमारी ६२७
७A पलयन कोट्टाई - वगईकुलम - तूतिकोरीन ५१
४५ चेन्नई - तांबरम - चेंगलपट्टू - मदुरांटकम - टिंडीवनम - विलुप्पुरम - उलुंदरपेट्टाई - एलुट्टुर - पाडलुर - तिरुचिरापल्ली - मनप्पराई - डिंडीगूल - वट्टलगुंडू - पेरियाकुलम - टेनी ४६०
४५A विलुप्पुरम - पॉंडिचेरी - कड्डलोर - चिदंबरम - पूंपुहार - नागोर - नागपट्टिनम १४७
४५B तिरुचिरापल्ली - विरालीमलै - तुवारंकुरिच्ची - मेलूर - मदुराई - करियापट्टी - पंडलगुडी - एट्टैयापुरम - तुतुकुडी २५७
४५C तंजावर जवळ रा.म. ६७शी तिठा - कुंभकोणम - सेथियाथोपे - वडलूर - नयव्हेली टाउनशिप - पनरुती - विक्रवंडी जवळ रा.म. ४५ शी तिठा. १५९
४६ कृष्णगिर - वनियांबडी - वेल्लोर - राणीपेट १३२
१० ४७ सेलम - शंखगिरी - भवनी - अवनाशी - नीलंबुर - कोइंबतूर- कुनियामुतुर - वालयार - केरळ सीमेपर्यंत. २२४
११ ४७B नागरकॉईलजवळ रा.म. ४७शी तिठा - अरलवायमोळी - कवल्कीनारूजवळ रा.म. ७शी तिठा ४५
१२ ४९ केरळ सीमेपासून - बोडिनायक्कणुर - टेनी - उसिलंपट्टी - मदुराई - तिरुप्पच्चेट्टी - परमक्कुडी - रामनाथपुरम - मंडपम - रामेश्वर २९०
१३ ६६ कृष्णगिरी - उत्तनगरै - चेंगम - तिरुवण्णमलै - जिंजी - टिंडीवनम - पॉंडिचेरी २३४
१४ ६७ (निलगिरी घाट) नागपट्टिनम - तिरुवारूर - तंजावर - तिरुचिरापल्ली - कुलिट्टलै - करुर - कंगायम - पल्लडम - सुलुर - कोइंबतूर- तुडीयालूर - मेत्तुपलायम - उदगमंडलमगुडालूर - टेप्पाकडू - कर्नाटक सीमेपर्यंत ५०५
१५ ६८ उलुंदुरपेट्टै - कल्लाक्कुरिच्ची - तलैवसा - अट्टूर - वालापडी - सेलम १३४
१६ २०५ आंध्र प्रदेश सीमेपासून - तिरुट्टानी - तिरुवल्लुर - अंबातुर - चेन्नई ८२
१७ २०७ होसुर - कर्नाटक सीमेपर्यंत २०
१८ २०८ केरळ सीमेपासून - सेनागोट्टाई - तेनकाशी - शिवगिरी - श्रीव्हिल्लीपुत्तुर - केल्लुपाटी - तिरुमंगलम १२५
१९ २०९ डिंडीगूल - पलानी - उदुमलैप्पेट्टाई - पोल्लाची - कोइंबतूर- अण्णू - सत्यमंगलम - हसनूर - कर्नाटक सीमेपर्यंत २८६
२० २१० त्रिची - पुदुक्कोट्टाई - तिरुमायम - करैक्कुडी - देवकोट्टाई - देवीपट्टीनम - रामनाथपुरम १६०
२१ २१९ आंध्र प्रदेश सीमेपासून - कृष्णगिरी २२
२२ २२० केरळ सीमेपासून - गुडलूर - उतमपलायम - तेनी ५५
२३ २२६ तंजावर - गंधर्वकोट्टाई - पुदुक्कोट्टाई - तिरुमायम - किलासेवलपट्टी - तिरुपत्तूर - मदगुपट्टी - शिवगंगा - मनमदुराई १४४
२४ २२७ तिरुचिरापल्ली - लालगुडी - कल्लाकुडी - किळापलूर - उडैयारपलायम - जयमकोंडम - गंगैकोंडचोलापुरम - कट्टुमन्नारकॉइल - लालपेट - कुमारच्ची - चिदंबरम १३५

त्रिपुरा[संपादन]

क्र. रा.म.क्र. मार्ग लांबी (कि.मी.)
४४ आसाम सीमेपासून - अंबासा - अगरतला - उदयपूर - सब्रुम ३३५
४४A मिझोरम सीमेपासून - साखान - मानू ६५

दिल्ली[संपादन]

क्र. रा.म.क्र. मार्ग लांबी (कि.मी.)
बाह्य रिंग रोड/ ट्रान्सपोर्ट नगर - हरियाणा सीमेपर्यंत २२
रा.म.२/रिंग रोड - दिल्ली - हरियाणा सीमेपर्यंत १२
रिंग रोड –हरियाणा सीमेपर्यंत १३
१० बाह्य रिंग रोड - मुंदका - हरियाणा सीमेपर्यंत १८
२४ निझामुद्दीन रस्ता - उत्तर प्रदेश सीमेपर्यंत.

नागालॅंड[संपादन]

क्र. रा.म.क्र. मार्ग लांबी (कि.मी.)
३६ आसाम सीमेपासून - दिमापूर
३९ आसाम सीमेपासून - दिमापूर - कोहिमा मणिपूर सीमेपर्यंत ११०
६१ कोहिमा - वोखाल - मोकोकचुंग - मेरांग कॉंग - आसाम सीमेपर्यंत २२०
१५० मणिपूर सीमेपासून - कोहिमा ३६
१५५ मोकोकचुंग - तुएनसांग - सांपुरे - मेलुरी - मणिपूर सीमेपर्यंत १२५

पंजाब[संपादन]

क्र. रा.म.क्र. मार्ग लांबी (कि.मी.)
हरियाणा सीमेपासून - राजपुरा - खन्ना - लुधियाना - फगवाडा - जालंधर - अमृतसर - अटारी - पाकिस्तान सीमेपर्यंत २५४
१A जालंधर - दसुया - पठाणकोट - जम्मू आणि काश्मीर सीमेपर्यंत १०८
१० हरियाणा सीमेपासून - लांबी- मलौट - अबोहर - फझिल्का - पाकिस्तान सीमेपर्यंत ७२
१५ पठाणकोट - गुरदासपूर - बटाला - अमृतसर - तरण तारण - झिरा - फरीदकोट - भटिंडा - मलौट - अबोहर - राजस्थान सीमेपर्यंत. ३५०
२० पठाणकोट - हिमाचल प्रदेश सीमेपर्यंत १०
२१ चंडीगढ सीमेपासून - खरार - कुराली - रूपनगर - घनौली - हिमाचल प्रदेश सीमेपर्यंत ६७
२२ हरियाणा सीमेपासून - डेरा बासी - हरियाणा सीमेपर्यंत. ३१
६४ हरियाणा सीमेपासून - बानूर - राजपुरा - पतियाळा - संगरुर - बर्नाला - रामपुरा फुल - भटिंडा - हरियाणा सीमेपर्यंत. २५५.५
७० जालंधर - होशियारपूर हिमाचल प्रदेश सीमेपर्यंत ५०
१० ७१ जालंधर - नाकोडार - मोगा - बर्नाला - धनौला - संगरुर - दोगल - हरियाणा सीमेपर्यंत. १३०
११ ७२ हरियाणा सीमेपासून हरियाणा सीमेपर्यंत. ४.५
१२ ९५ चंडीगढ सीमेपासून - खरार - रोपर - लुधियाना - जगराओन - मोगा - फिरोजपूर २२५

पश्चिम बंगाल[संपादन]

क्र. रा.म.क्र. मार्ग लांबी (कि.मी.)
झारखंड सीमेपासून-कुल्टी-आसनसोल-राणीगंज-कंक्सा-बर्धमान-पांडुआ-हुगळी-चुंचुरा-श्रीरामपूर-कोलकाता २३५
झारखंड सीमेपासून-खरगपूर-देब्रा-पांस्कुरा-बगनान-कलकत्ता १६१
३१ दालखोला-कंकी-पंजीपारा-इस्लामपूर-बागडोगरा-सेवोक-मैनागुडी-गैरकाता-फलककाता-कूच बिहार-तूफानगंज - आसाम सीमेपर्यंत ३६६
३१A सेवोक-नामथांग सिक्कीम सीमेपर्यंत ३०
३१C गलगलिया-नक्सलबारी-बागडोगरा-चल्सा-नागरकाटा- गैरकाटा- अलिपूरद्वार - आसाम सीमेपर्यंत. १४२
३२ झारखंड सीमेपासून-गूरीनाथधाम -पुरुलिया- कांताडिह-उर्मा- बलरामपूर - झारखंड सीमेपर्यंत ७२
३४ दालखोला-करंदिघी-रायगंज-पंडुआ-इंग्रझ बझार-मोरग्राम-बहरामपूर-पलाशी- कृष्णनगर-बारासात-कलकत्ता ४४३
३५ बारासात-गैघाटा-चांदपारा-बनगांव-भारत/बांगलादेश सीमेपर्यंत. ६१
४१ पांस्कुराजवळ रा.म. ६शी तिठा -तामलुक-महिशादा-हल्दिया. ५१
१० ५५ सिलिगुडी-कुर्सियॉंग-दार्जिलिंग ७७
११ ६० ओरिसा सीमेपासून-दंतान-बेलदा-खरगपूर-मिदनापूर-बनकुरा-मेजिया-रानीगंज-पांडवेश्वर-दुब्राजपूर-सिउरी- मोरग्रामजवळ रा.म. ३४शी तिठा ३८९
१२ ६०A बनकुरा-छटना-हुरा-लांधुर्का-पुरुलिया १००
१३ ८० फरक्का - बिहार सीमेपर्यंत १०
१४ ८१ बिहार सीमेपासून-हरिश्चंद्रपूर-कुमानगर्ज-माल्दा
१५ ११७ सेतू-कलकत्ता-डायमंड हार्बर-कुल्पी-नामखाना-बख्खाली १३८
एकूण लांबी (कि.मी.)
६५,५६९

पॉंडिचेरी[संपादन]

क्र. रा.म.क्र. मार्ग लांबी (कि.मी.)
४५A विलुपुरम - पुदुचेरी - कड्डलोर - चिदंबरम - सिरकाळी - करैकल - नागपट्टिनम २००
६६ पुदुचेरी - टिंडीवनम - तिरुवन्नमलै - चेंगम - उतंगरै - कृष्णगिरी २००

बिहार[संपादन]

क्र. रा.म.क्र. मार्ग लांबी (कि.मी.)
उत्तर प्रदेश सीमेपासून - मोहानिया - कुद्र - सासाराम - देहरी - औरंगाबाद - मदनपूर - धोबी - बाराचाटी - झारखंड सीमेपर्यंत २०२
१९ उत्तर प्रदेश सीमेपासून – मंझीछपरा - सोनपूर - हाजीपूर - पटणा १२०
२८ बरौनी - बाचीवारा - ताजपूर - मुझफ्फरपूर - मेहसी - चकिया - गोपालगंज उत्तर प्रदेश सीमेपर्यंत. २५९
२८A पिपरा कोठीजवळ रा.म.२८शी तिठा - सगौली - रकसौल - नेपाळ सीमा. ६८
२८B चपवा - बेट्टिया - लौरिया - बगाहा - छिटौनी - उत्तर प्रदेश सीमेपर्यंत १२१
३० मोहनियाजवळ रा.म. २शी तिठा - कोचास - दिनारा - बिक्रमगंज - आरा - दानापूर - पटणा - फटुहा - बख्तियारपूर २३०
३०A फटुहा - चंडी - हरनौट - बाढ ६५
३१ झारखंड सीमेपासून - राजौली - नावडा - बिहार शरीफ - बख्तियारपूर - बाढ - मोकोमा - बरौनी - बेगुसराई - बलिया - खगरिया - बिहपूर - कुरसेलापूर्णियाबैसी - किशनगंज - पश्चिम बंगाल सीमेपर्यंत ३९३
५७ मुझफ्फरपूर - दरभंगा - झांझरपूर - नराहिया - नरपतगंज - फोर्ब्सगंज - अरारिया - पूर्णिया ३१०
१० ५७अ रा.म.५७शी तिठा - फोर्ब्सगंज - जोगबनी १५
११ ७७ हाजीपूर - मुझफ्फरपूर - सीतामढी - सोनवर्षा १४२
१२ ८० मोकामाह - लकीसराई - मुंगेर - भागलपूर - कहालगांव - झारखंड सीमेपर्यंत २००
१३ ८१ कोरा - कटिहार - पश्चिम बंगाल सीमेपर्यंत ४५
१४ ८२ गया - हिसुआराजगिर - बार बिघा - मोकामाह १३०
१५ ८३ पटणा - जहानाबाद - बेला - गया - दोभी १३०
१६ ८४ आरा - बक्सर ६०
१७ ८५ छपरा - एकमा - सिवान - गोपालगंज ९५
१८ ९८ पटणा - अरवल - दौडनगर - औरंगाबाद - अंबा - झारखंड सीमेपर्यंत १५७
१९ ९९ दोभी - हरद्वान - झारखंड सीमेपर्यंत १०
२० १०१ छपरा - बनियापूर - मुहम्मदपूर ६०
२१ १०२ छपरा - रेवाघाट - मुझफ्फरपूर ८०
२२ १०३ हाजीपूर - हजरत जंदाहा - मुश्रीघरारी ५५
२३ १०४ चकिया - मधुबनी - शिवहर - सीतामढी - सुरसंद - जयनगर - नराहिया १६०
२४ १०५ दरभंगा - औंसी - जयनगर ६६
२५ १०६ बिरपूर - पिपरा - माधेपुरा - किशनगंज - बिहपूर १३०
२६ १०७ महेशकुंड - सोनबरसा राज - सिमरीबख्तियारपूरबारियाहीसहरसामाधेपुरा - बनमंखी - पूर्णिया १४५
२७ ११० अरवलजवळ रा.म.९८शी तिठा - जहानाबाद - बंधुगंज - काको- एकंगारसराई - बिहार शरीफ जवळ रा.म.३१शी तिठा ८९

मणिपूर[संपादन]

क्र. रा.म.क्र. मार्ग लांबी (कि.मी.)
३९ नागालॅंड सीमेपासून- माओसॉंगसांग - कारॉंग - कांगपोक्पी - इम्फाल - पलेल - सिबॉंग - म्यानमार सीमेपर्यंत २११
५३ आसाम सीमेपासून- ऑइनामलॉंग - नुंग्बा - इम्फाल २२०
१५० मिझोराम सीमेपासून - पार्बुंग - फैफेंगमुन - चुराचांदपुर - बिश्नुपूर - इम्फाल - उख्रुल - कुइरी - जेसामी - नागालॅंड सीमेपर्यंत ५२३
१५५ नागालॅंड सीमेपासून जेसामी जवळ रा.म.क्र. १५०च्या तिठ्यापर्यंत

मध्य प्रदेश[संपादन]

क्र. रा.म.क्र. मार्ग लांबी (कि.मी.)
राजस्थान सीमेपासून – मोरेना - ग्वाल्हेर - शिवपुरी - गुना - बियाओरा - पचोरे - सारंगपूर - शाजापूर - माक्सी - देवास - इंदूर - ठिकरी - सेंधवा - महाराष्ट्र सीमेपर्यंत ७१२
उत्तरप्रदेश सीमेपासून - मौगंज - मंगावान - रेवा - मुरवारा - जबलपूर - लखनडोन - सिवनी - गोपालगंज - खावासा महाराष्ट्र सीमेपर्यंत. ५०४
१२ जबलपुर - शाहपूर - देओरी - बरेली - ओबैदुल्लागंज - भोपाळ - नरसिंगगढ - बियाओरा - राजगड - खिलचीपूर - राजस्थान सीमेपर्यंत ४९०
१२अ उत्तरप्रदेश सीमेपासून - प्रिथीपूर - तिकमगढ - शाहगढ - हीरापूर - दामोह - तेंदूखेडा - जबलपुर - मंडला - गढी छत्तिसगढ सीमेपर्यंत. ४८२
२५ शिवपुरी - करेरा - उत्तरप्रदेश सीमेपर्यंत ८२
२६ उत्तरप्रदेश सीमेपासून - बरोडिया - सागर - देवरी - नरसिंहपूर - लखनादोन २६८
२६A सागर जवळील रा.म.८६शी तिठेपासुन - जेरुवाखेरा - खुरै - बीना ७५
२७ उत्तरप्रदेश सीमेपासून - सोहागी - मानगावान ५०
५९ गुजरात सीमेपासून - झाबुआ - धर - इंदूर १३९
१० ५९A इंदूर - कन्नोद - खाटेगांव - हरदा - सोदलपूर - बेतुल २६४
११ ६९ भोपाळ - ओबैदुल्लागंज - होशंगाबाद - इटारसी - शाहपूर - बेतुल - पांडूरना - चिचोली - महाराष्ट्र सीमेपर्यंत ३३०
१२ ७५ ग्वालियर - दातिया - उत्तरप्रदेश सीमा - अलीपूर - छत्रपूर - पन्ना - सतना - रेवा - सिधी - बरगना - उत्तरप्रदेश सीमेपर्यंत ६००
१३ ७६ राजस्थान सीमेपासून - कोटा - शिवपुरी ६०
१४ ७८ कटनी - उमरिया - शाहडोल - अनुपूर - छत्तिसगढ सीमेपर्यंत १७८
१५ ७९ राजस्थान सीमेपासून - नीमच - मंदसौर - रतलाम - घाट बिलोड - इंदूर २८०
१६ ८६ उत्तरप्रदेश सीमेपासून - छत्रपूर - हिरापूर - बांदा - सागर - राहतगढ - विदिशा - रायसेन - भोपाळ - शिहोर - अष्टा - देवास ४९४
१७ ८६अ राहतगढ जवळील रा.म.८६शी तिठ्यापासुन - बेगमगंज - गैरतगंज - भोपाळजवळील रा.म.८६शी तिठ्यापर्यंत १७६
१८ ९२ उत्तरप्रदेश सीमेपासून - भिंड - माहगवान - ग्वाल्हेर ९६

महाराष्ट्र[संपादन]

क्र. रा.म.क्र. मार्ग लांबी (कि.मी.)
मध्य प्रदेश सीमेपासून - सांगवी - धुळे - मालेगाव - नाशिक - इगतपुरी - भिवंडी - ठाणे - मुलुंड - मुंबई ३९१
ठाण्याजवळ रा.म.क्र.३शी तिठा - पनवेल - पुणे - सातारा - कोल्हापूर - कागल कर्नाटक सीमेपर्यंत ३७१
४B जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट - पळस्पे फाटाजवळ रा.म.क्र.४शी तिठा २०
४C कळंबोलीजवळ रा.म.क्र.४ (किमी ११६)- रा.म.क्र.४ब (किमी १६.६८७)
गुजरात सीमेपासून - विसारवाडी - धुळे - एरंडोल - जळगाव - एदलाबाद - खामगांव - अकोला - अमरावती - नागपूर - भंडारा - देवरी छत्तिसगढ सीमेपर्यंत ८१३
मध्य प्रदेश सीमेपासून - देवळापूर - नागपूर - हिंगणघाट - करंजी आंध्र प्रदेश सीमेपर्यंत. २३२
गुजरात सीमेपासून - तलासरी - बांद्रा - मुंबई १२८
१३ सोलापूर - नांदणी - कर्नाटक सीमेपर्यंत ४३
१६ आंध्र प्रदेश सीमेपासून - सिरोंचा - कोपेला छत्तिसगढ सीमेपर्यंत ३०
१० १७ पनवेल - पेण - महाड - पोलादपूर - खेड - आसूर्डे - चिपळूण - संगमेश्वर - रत्‍नागिरी - लांजा - राजापूर - कुडाळ - वेंगुर्ला गोवा सीमेपर्यंत. ४८२
११ ५० नाशिक - संगमनेर - नारायणगांव - खेड - पुणे १९२
१२ ६५ पुणे - इंदापूर - सोलापूर - उमरगा कर्नाटक सीमेपर्यंत. ३३६
१३ ६९ नागपूर - सावनेर मध्य प्रदेश सीमेपर्यंत ५५
१४ २०४ रत्‍नागिरी - पाली - शाहूवाडी - कोल्हापूर १२६
१५ २११ सोलापूर - उस्मानाबाद - बीड - गेवराई - औरंगाबाद - वेरूळ - चाळीसगाव - धुळे ४००
१६ २२२ कल्याणजवळ रा.म.३शी तिठा - अहमदनगर - पाथर्डी - परभणी - नांदेड आंध्र प्रदेश सीमेपर्यंत. ५५०

मिझोरम[संपादन]

क्र. रा.म.क्र. मार्ग लांबी (कि.मी.)
४४A त्रिपुरा सीमेपासून - तुक्कल्ह - मामित - सैरांग - ऐझॉल १६५
५४ आसाम सीमेपासून - छिमलुंग - ब्वालपुई - ऐझॉल - झोबॉक - पांगझॉल - लाँग्ट्लाइ - तुइपांग ५१५
५४A थेरियात - लुंग्लेइ
५४B व्हिनस सॅडल - सैहा २७
१५० ऐझॉल - फैलेंग - थिंगसाट मणिपूर - सीमेपर्यंत १४१
१५४ आसाम सीमेपासून - कानपुई ७०

मेघालय[संपादन]

क्र. रा.म.क्र. मार्ग लांबी (कि.मी.)
४० आसाम सीमेपासून - बार्नी हाट - शिलॉंग - दौकी - जोवाई २१६
४४ नॉॅंगस्टॉइन - शिलॉंग आसाम सीमेपर्यंत २७७
५१ आसाम सीमेपासून - बजेंगडोडा - तुरा - दालू १२७
६२ डमरा - दांबू - बाघमरा - दालू १९०

राजस्थान[संपादन]

क्र. रा.म.क्र. मार्ग लांबी (कि.मी.)
उत्तर प्रदेश सीमेपासून - माजियान मध्य प्रदेश सीमेपर्यंत ३२
हरियाणा सीमेपासून - अजर्का - बेरहोर - कोटपुतली - मनोहरपूर - जयपूर - किशनगड - अजमेर - बीवार - भीम - दिवैर - नाथद्वारा - उदयपूर - खैरवाडा - वेचीवाडा - गुजरात सीमेपर्यंत ६८८
११ उत्तर प्रदेश सीमेपासून - भरतपूर - माहवा - दौसा - जयपूर - रिंगास - सिकर - फतेहपूर - रतनगड - श्री डुनगढ - बिकानेरजवळ रा.म.क्र. १५शी तिठा ५३१
११अ मनोहरपूर - दौसा - लालसोट - कोठुमजवळ रा.म.क्र. १५शी तिठा १४५
११ब लालसोटजवळ रा.म.क्र. ११अशी तिठा - गंगापूर - करौली - सिर - मुथरा - अंजाई - बरौली - बारी - धौलपूर जवळ रा.म.क्र. ३शी तिठा १८०
१२ मध्य प्रदेश सीमेपासून - घटोली - अकलेरा - झालावाड - कोटा - बुंदी - देवली - टोंक - कोठुम - जयपूर ४००
१४ बीवार - चडवल - पाली - संदेराव - सिरोही - पिंडवाडा - आबू रोड - मावल - गुजरात सीमेपर्यंत ३१०
१५ पंजाब सीमेपासून - गंगानगर - सुरतगढ - लुणकरणसर - बिकानेर - कोलायात - फालोडी - पोखरण - जेसलमेर - देविकोट - शिव - बारमेर - संचोर - गुजरात सीमेपर्यंत ९०६
६५ हरियाणा सीमेपासून - राजगढ - चुरू - फतेहपूर - सालासार - लडनुन - डेह - नागौर - सोईला - जोधपूर - पाली ४५०
१० ७१B हरियाणा सीमेपासून - भिवडी - ताओरू - हरियाणा सीमेपर्यंत
११ ७६ पिंडवाडा - गोगुंदा - उदयपूर - चित्तोडगढ - खेरी - कोटा - बारन - किशनगंज - शाहबाद - देवरी - मध्य प्रदेश सीमेपर्यंत ४८०
१२ ७९ अजमेर - नसिराबाद - झारवसा - चित्तोडगढ - निंबाहेरा - मध्य प्रदेश सीमेपर्यंत २२०
१३ ७९A किशनगढ (रा.म. ८) - नसिराबाद (रा.म. ७९) ३५
१४ ८९ अजमेर - पुष्कर - रुन - नागौर - नोखा - बिकानेर ३००
१५ ९० बारन - अकलेरा १००
१६ ११२ जैतारण - बिलारा - कापर्डा - जोधपूर - कल्याणपूर - पाचपाद्रा - बालोत्रा - तिलवारा - कावस - बारमेर ३४३
१७ ११३ निंबाहेरजवळ रा.म.क्र. ७९शी तिठा - बारी - प्रतापगढ - सोहागपुरा - बांसवाडा - गुजरात सीमेपर्यंत २००
१८ ११४ जोधपूरजवळ रा.म.क्र. ६५शी तिठा - बालेसर - शैतरवा - डेछू - पोखरण १८०
१९ ११६ टोंकजवळ रा.म.क्र. १२शी तिठा - उनियारा - सवाई माधोपुर ८०

सिक्कीम[संपादन]

क्र. रा.म.क्र. मार्ग लांबी (कि.मी.)
३१A गंगटोक - सिंगटम - रांगपो पश्चिम बंगाल सीमेपर्यंत. ६२

हरियाणा[संपादन]

क्र. रा.म.क्र. मार्ग लांबी (कि.मी.)
दिल्ली सीमेपासून - कुंडली - मुरथाल - सामलखा - पानिपत - कर्नाल - पिपली - शाहबाद - अंबाला पंजाब सीमेपर्यंत १८०
दिल्ली सीमेपासून - फरीदाबाद - वल्लभगढ - पलवल - रुंधी - होडाल - उत्तर प्रदेश सीमेपर्यंत ७४
दिल्ली सीमेपासून - गुडगांव - धरुहेरा - बावल - राजस्थान सीमेपर्यंत १०१
१० दिल्ली सीमेपासून - बहादुरगड - रोहतक - महम - हंसी (शहर) - हिस्सार - अग्रोहा - बोडोपाल - फतेहाबाद - सिर्सा - ओधन - डबवाली - पंजाब सीमेपर्यंत ३१३
२१A पिंजौर - करापूर - हिमाचल प्रदेश सीमेपर्यंत १६
२२ अंबाला - पंचकुला - चंडी मंदिर - पिंजौर - कालका - हिमाचल प्रदेश सीमेपर्यंत ३०
६४ डबवाली - पंजाब सीमेपर्यंत ०.५
६५ अंबालापेहोवाकैथाल - नरवाणा - बरवाला - हिस्सार - शिवनी - राजस्थान सीमेपर्यंत २४०
७१ पंजाब सीमेपासून - नरवाणा - जिंद - जुलाना - रोहतक - डिघल - झज्जर - गुरौरा - रेवारी - राजस्थान सीमेपर्यंत. १७७
१० ७१A रोहतक - गोहाना - इस्राना - पानीपत ७२
११ ७१B रेवारी - धरुहेरा - तौरू - सोहना - पलवल ६९
१२ ७२ अंबाला - शहझादपूर - नारायणगड - काला आंब - हिमाचल प्रदेश सीमेपर्यंत ४५.५
१३ ७३ उत्तर प्रदेश सीमेपासून - यमुनानगर - मुलाना - सहा - रायपूर - पंचकुला १०८
१४ ७३अ यमुनानगर - जगध्री - मुस्तफाबाद - लेडी - दारपूर - हिमाचल प्रदेश सीमेपर्यंत ४२

हिमाचल प्रदेश[संपादन]

क्र. रा.म.क्र. मार्ग लांबी (कि.मी.)
१A पंजाब सीमेपासून - दमताल - पंजाब सीमेपर्यंत. १४
२० मंडी - जोगिंदरनगर - बैजनाथ - पालमपूर - बागवान - नगरोटा - कोटला - नूरपूर - पंजाब सीमेपर्यंत २१०
२१ पंजाब सीमेपासून - स्वरघाट - बिलासपुर - सुंदर नगर - मंडी - पंडोह - औट - बजौरा - कुलु - रलसान - मनाली २३२
२१A स्वरघाट - कुंडलू - नालागढ - हरियाणा सीमेपर्यंत ४९
२२ हरियाणा सीमेपासून - परवानू - धरमपूर - बरोग - सोलान - कंडाघाट - शिमला - कुफ्री - थेओग - नरकंडा - किंगल - रामपूर - वांगटू - पुह - नामग्या - शिपकिला जवळ चीन सीमेपर्यंत ३९८
७० मंडी - धरमपूर - सरकाघाट - अवादेवी - हमीरपूर - नदुआन - आंब - मुबारकपूर - गगरेत - पंजाब सीमेपर्यंत १२०
७२ हरियाणा सीमेपासून - काला आंब नहान - कोलार - मजराल - उत्तराखंड सीमेपर्यंत ५०
७३अ हरियाणा सीमेपासून - पाओंटासाहिब जवळ रा.म. ७२शी तिठा २०
८८ शिमला - सल्लाघाट - बिलासपुर - घुमरवैन - हमीरपुर - नदुआन - ज्वालामुखी - कांगडा - मटौर ११५

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]