जम्मू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जम्मू
भारतामधील शहर

Amar Mahal 01.jpg
जम्मू येथील अमर महल राजवाडा
जम्मू is located in जम्मू आणि काश्मीर
जम्मू
जम्मू
जम्मूचे जम्मू आणि काश्मीरमधील स्थान

गुणक: 32°43′30″N 74°51′18″E / 32.72500°N 74.85500°E / 32.72500; 74.85500

देश भारत ध्वज भारत
राज्य जम्मू आणि काश्मीर
जिल्हा जम्मू जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची १,०७३ फूट (३२७ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ५,०२,१९७
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


जम्मू ही भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्याची हिवाळी राजधानी व जम्मू जिल्ह्याचे मुख्यालय आहे. जम्मू शहर दिल्लीच्या ६०० किमी उत्तरेस तावी नदीच्या काठावर वसले आहे. २०११ साली जम्मूची लोकसंख्या सुमारे ५ लाख होती.

दरवर्षी नोव्हेंबर ते एप्रिल ह्या हिवाळी महिन्यांदरम्यान जम्मू आणि काश्मीर राज्याचे सर्व कामकाज जम्मूमधून चालते व उर्वरित काळाकरिता राज्याची राजधानी श्रीनगरमध्ये असते. जम्मू रस्ते, रेल्वे व हवाई मार्गांद्वारे उर्वरित भारतासोबत जोडले गेले आहे. जम्मू तावी रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेचे एक प्रमुख स्थानक असून येथून दिल्ली, मुंबईकोलकातासह बहुतेक सर्व मोठ्या शहरांसाठी थेट सेवा उपलब्ध आहे. जम्मू–बारामुल्ला रेल्वेमार्ग बांधून पूर्ण झाल्यानंतर जम्मूहून श्रीनगरमार्गे थेट बारामुल्लापर्यंत रेल्वेसेवा शक्य होईल. राष्ट्रीय महामार्ग १ ए जम्मूला दिल्लीसोबत व काश्मीर खोऱ्यासोबत जोडतो. जम्मू विमानतळ शहराच्या मधोमध स्थित असून येथून रोज अनेक प्रवासी सेवा पुरवल्या जातात.

वैष्णोदेवी हे पवित्र हिंदू मंदिर जम्मूपासून ५० किमी अंतरावर स्थित आहे.