भद्राचलम
Jump to navigation
Jump to search
भद्राचलम हे भारताच्या तेलंगणा राज्यातील भद्राद्री कोठगुडम जिल्ह्यामधील एक लहान शहर आहे. हे शहर तेलंगणाच्या आग्नेय भागात गोदावरी नदीच्या काठावर वसले आहे. राष्ट्रीय महामार्ग ३० येथूनच धावतो. २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे ५५ हजार इतकी होती.
भद्राचलम येथील १७व्या शतकात बांधले गेलेले भद्राचलम राम मंदिर हिंदू धर्मामधील एक प्रमुख स्थान मानले जाते.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमिडिया कॉमन्सवर भद्राचलम शी संबंधित संचिका आहेत.
विकिव्हॉयेज वरील भद्राचलम पर्यटन गाईड (इंग्रजी)