सांकवाळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सांकोले या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

सांकवाळ (Sancoale) हे गोव्यातील एक शहर आहे. येथे पूर्वी सारस्वत समाजाची लक्ष्मी-नृसिंह, शांतांदुर्गा शंखवलेश्वरी आणि विजयादुर्गा यांची मंदिरे होती. साधारण १५६० च्या सुमारास पोर्तुगीजांपासून वाचविण्यासाठी येथील मूर्ती वेलिंग आणि फोंडा येथे हलविण्यात आल्या.

भूगोल[संपादन]

सांकवाळची सरासरी उंची ४१ मीटर (१३५ फूट) आहे.

लोकसंख्या[संपादन]

२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार, सांकवाळची लोकसंख्या २१,९२३ आहे. या लोकसंख्येपैकी ५३% पुरुष आणि ४७% महिला आहेत. सांकवाळचा साक्षरता दर सरासरी ८८.६१% आहे, हा दर गोवा राज्याच्या ८८.७०% या सरासरी दरापेक्षा कमी आहे. पुरुष साक्षरता दर ९१.५४% आणि महिला साक्षरता दर ८०.९३% आहे. सांकवाळ मधील १२.२८% लोकसंख्या ६ वर्षाखालच्या वयाची आहे. [१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Sancoale Population Census 2011". Government of India.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.