वारंगळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
वारंगळ
వరంగల్
भारतामधील शहर

Warangal District Montage 1.png

वारंगळ is located in तेलंगणा
वारंगळ
वारंगळ
वारंगळचे तेलंगणामधील स्थान

गुणक: 18°0′0″N 79°34′48″E / 18°N 79.58°E / 18; 79.58

देश भारत ध्वज भारत
राज्य तेलंगणा
जिल्हा वारंगळ जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची ९९१ फूट (३०२ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ८,११,८४४
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


वारंगळ हे तेलंगणााच्या वारंगळ जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख शहर आहे. येथील पुरातत्त्वीय अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले वारंगळ शहर तेलंगणाच्या उत्तर भागात वसले असून ते हैदराबादच्या १४० किमी ईशान्येस स्थित आहे. २०११ साली ८.११ लाख लोकसंख्या असलेले वारंगळ हैदराबादखालोखाल राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हैदराबाद संस्थान भारतात विलीन होईपर्यंत (१९४९) हा प्रदेश असफझाई निजामांच्या अखत्यारीत होता.[१]

येथील राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थान, वारंगळ ही एक प्रमुख शैक्षणिक संस्था असून काकाटिया विद्यापीठ हे देखील येथील प्रसिद्ध विश्वविद्यालय आहे. वारंगळ रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्गावर असून ते राज्यातील एक प्रमुख रेल्वे जंक्शन आहे. येथील काझीपेठ रेल्वे स्थानक सिकंदराबादला दिल्ली-चेन्नई मार्गासोबत जोडते. वारंगळ विमानतळ निजाम काळात बांधला गेला होता परंतु आजच्या घडीला येथे प्रवासी सेवा उपलब्ध नाही.

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "वरंगळ" (मराठी मजकूर). महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई. ३१ जुलै २०१४ रोजी पाहिले.