मथुरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मथुरा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. हे शहर मथुरा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. मथुरा शहर हे, श्रीकृष्ण या विष्णूच्या मानवी अवतारी व्यक्तीची जन्मभूमी आहे. कृष्णाचा जन्म आणि त्याचा मृत्यू, डॉक्टर दफ्तरींच्या मते, अनुक्रमे इ.स.पूर्व १२५१ आणि ११७५ या साली झाले असावेत. कृष्णाचे बालपण मथुरेजवळच्या गोकुळात गेले.