म्यानमार
म्यानमार ![]() म्यानमारचा संघ | |||||
| |||||
राष्ट्रगीत: गबा म चे![]() | |||||
म्यानमारचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी | नेपिडो | ||||
सर्वात मोठे शहर | यांगोन | ||||
अधिकृत भाषा | बर्मी | ||||
इतर प्रमुख भाषा | जिंगफो, शान, कारेन, मोन, तमिळ | ||||
सरकार | संपूर्ण लष्करी हुकुमशाही | ||||
- राष्ट्रप्रमुख | थान श्वे | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | ४ जानेवारी इ.स. १९४८ (युनायटेड किंग्डमपासून) | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ६,७६,५७८ किमी२ (४०वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | ३.०६ | ||||
लोकसंख्या | |||||
- २००९ | ५,००,२०,०००[१] (२४वा क्रमांक) | ||||
- घनता | ७३.९/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | ७१.७७२ अब्ज[२] अमेरिकन डॉलर (७९वा क्रमांक) | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | १,०३९ अमेरिकन डॉलर (१६२वा क्रमांक) | ||||
मानवी विकास निर्देशांक (२००७) | ▲ 0.586[३] (मध्यम) (१३८ वा) | ||||
राष्ट्रीय चलन | म्यानमारी क्यात | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | म्यानमार प्रमाणवेळ (यूटीसी+६:३०) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | MM | ||||
आंतरजाल प्रत्यय | .mm | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ९५ | ||||
म्यानमार (अधिकृत नाव: बर्मी: , इंग्लिश: Republic of the Union of Myanmar, रिपब्लिक ऑफ यूनियन ऑफ म्यानमार; जूनी नावे: बर्मा, ब्रह्मदेश) हा आग्नेय आशियातील एक देश आहे. ६,७६,५७८ वर्ग कि.मी. क्षेत्रफळ असलेला हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने आग्नेय आशियातील सर्वांत मोठा देश आहे. या देशाची लोकसंख्या जवळपास ६ कोटी असून लोकसंख्येच्या बाबतीत याचा जगात २४ वा क्रमांक आहे. या देशाच्या ईशान्येस चीन, पूर्वेस लाओस, आग्नेयेस थायलंड, पश्चिमेस बांग्लादेश, वायव्येस भारत हे देश असून नैऋत्येस बंगालचा उपसागर आहे. येथील बहुसंख्य जनता बौद्ध धर्मीय आहे. म्यानमारला एकूण परीघाच्या एक तृतीयांश - म्हणजे १,९३० कि.मी. - लांबीची मोठी किनारपट्टी लाभली आहे. पेट्रोलियम, शिसे, जस्त, तांबे, टंगस्टन ही येथील प्रमुख खनिजे आहेत.
ऐतिहासिक काळापासून म्यानमारमधील वांशिक विविधता राजकारणावर व समाजगतिकीवर प्रभाव टाकत आली आहे. आधुनिक काळातदेखील या देशाच्या राजकीय पटलावर वांशिक तणावांची पडछाया पडल्याचे दिसून येते. इ.स. १९९२ सालापासून म्यानमारची शासनव्यवस्था जनरल थान श्वे यांच्या नेतृत्त्वाखालील लष्करप्रणीत आघाडी सरकाराच्या नियंत्रणात आहे.
अनुक्रमणिका
धर्म[संपादन]
अधिक माहिती[संपादन]
भारता मधून पासपोर्ट शिवाय भारतीय नागरिकाला भारता बाहेर जाता येते असे जे थोडे देश आहेत त्यापैकी एक म्हणजे बर्मा म्हणजेच ब्रम्हदेश म्हणजेच म्यानमार! सीमेवरून त्या देशात चक्क चालत जात येते. भारतातल्या मणिपूर राज्याला या देशाची सीमा लागलेली आहे. मणिपूर राज्याची राजधानी इंफाळ या गावा पासून रस्त्याने ३ तास प्रवास केला १०७ किलोमीटर अंतर गेले की मोरेह गाव लागते. हे भारतातले शेवटचे गाव आहे. तिथे सीमा ओलांडून आपण बर्मी नाम फा लाँग बाजार या ठिकाणी पोचतो. या दोन ठिकाणांना जोडणारा एक छोटासा रस्ता आहे आणि त्यात दोन कमानिंच्या मध्ये एक टोल बूथ उर्फ चौकी आहे. तिथे भारतीय असल्याचे कुठलेही ओळखपत्र दाखवले की सीमा ओलांडता येते व तुम्ही म्यानमार मध्ये प्रवेश करू शकता!
या सीमेवर इमिग्रेशनचा अधिकारी नेमलेला आहे. माणशी 20 रु. जमा केले की इमिग्रेशनची पावती मिळते. या पावतीवर सकाळ पासून संध्याकाळपर्यंत बर्माच्या भागात थांबता येउ शकते. भारत व बर्मा या दोन देशांमधली सीमा सकाळी ६.३० ते संध्याकाळी ४.३० या वेळात चालत ओलांडायला खुली असते. त्यानंतर मात्र ही सीमा ओलांडता येत नाही.
इंफाळ या भारतातल्या त्यातल्या त्यात मोठ्ठ्या बाजार पेठेच्या तुलनेने इकडच्या वस्तू बऱ्यापैकी स्वस्त आहेत म्हणून भारतातले अनेक जण अगदी छोटे व्यापारी सुद्धा चौकीपलीकडच्या मार्केट मध्ये जाऊन भरपूर खरेदी करतात (electronics मात्र नाही) आणि चालत परत येतात. इथे सीमेपर्यंत येताना आणि जाताना निदान चार वेळा तरी भारतीय सैन्यात कडून थांबवले जाते. एकदा प्रत्येकाचे ओळखपत्र तपासले जाते. निदान एकदा तरी सगळ्यांना उतरवून गाडीची तपासणी होते. ह्या तपासणीच्या वेळी मुख्यतः अवैध गोष्टी म्हणजेच ड्रग्ज किंवा काही हत्यारे जात नाहीत ना याची पडताळणी केली जाते.
संदर्भ[संपादन]
- ^ Error on call to साचा:cite paper: Parameter title must be specified
- ^ "बर्मा (म्यानमार)" (इंग्लिश मजकूर). आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. ऑक्टोबर इ.स. २०१०.
- ^ "मानवी विकास अहवाल २००९. मानवी विकास निर्देशांकातील कल. सारणी 'ग'" (इंग्लिश मजकूर). संयुक्त राष्ट्रे. ५ ऑक्टोबर, इ.स. २००९ रोजी पाहिले.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- सरकारी संकेतस्थळ (मराठी मजकूर)