वाराणसी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
वाराणसी 
भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर.
IN-Varansasi1.jpg
प्रकार शहर
ह्याचा भाग पूर्वांचल
स्थानवाराणसी जिल्हा, Varanasi division, उत्तर प्रदेश, भारत
लोकसंख्या
  • ११,९८,४९१ (डिसेंबर ३१, इ.स. २०११)
क्षेत्र
  • ३,१३,१०,००,००० m²
समुद्रसपाटीपासूनची उंची
  • ७६ ±1 m
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
विकिडाटा

२५° १८′ २४.८४″ N, ८३° ००′ २१.९६″ E

Blue pencil.svg

वाराणसी (किंवा काशी, बनारस) हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. काशी, असीवरुणा या नद्यांच्या संगमावर वसल्याने त्याला 'वाराणसी' हे नाव पडले.[१] काशी हे हिंदूंना सर्वांत पूज्य असणारे क्षेत्र आहे. हे शहर बनारस, वाराणसी, काशी, अविमुक्त (शंकराच्या वास्तव्यामुळे), आनंदकानन/आनंदवन(शंकराला आनंद देणारे वन), काशिका, तपःस्थली, महास्मशान, मुक्तिक्षेत्र, रुद्रावास (रुद्राचे राहण्याचे ठिकाण), श्रीशिवपुरी वगैरे नावांनी ओळखले जाते. येथील काशी विश्वेश्वर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. गंगा नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले वाराणसी जगातील प्राचीन शहरांपैकी एक मानले जाते.

हे शहर वाराणसी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

जगातील सर्वांत जुने सलग वस्ती असलेले शहर अशी ख्याती असलेले गंगा नदीच्या तीरावर वसलेले हे शहर आहे[ संदर्भ हवा ]. हे शहर, महाभारत युद्धात पांडवांकडून लढणाऱ्या काशी राजाने वसविल्यामुळे यास 'काशी'/'काशिका' हे नाव पडले.[१]

गंगेच्या तीरावरील सिंदिया घाटाचे चित्र
वाराणसी घाट

इतिहास[संपादन]

बनारस हिंदू विद्यापीठ

स्कंद पुराण या इ स पूर्व ५०० ते ९०० वर्षे जुन्या पुराणात काशीचे महात्म्य आढळते. त्या काशीखंडात वाराणसीच्या आसमंतातील शैव मंदिरांचे वर्णन आहे. येथे काशी विश्वनाथ मंदिर होते. हे काशीचे मुख्य विश्वनाथ मंदिर क्रूर आक्रमक कुतुबुद्दीन ऐबक याने पाडले. या मंदिराच्या ठिकाणी मशीद उभारली. अनेक वर्षे दुर्लक्षित आणि मुस्लिमांद्वारे प्रतिबंधित राहिल्यावर अकबराच्या काळात तोरडमल या अभिमानी राजाने या मंदिराचे पुनर्निर्माण केले. परंतु क्रूर आणि धर्मांध औरंगजेब याने हे मंदिर परत पाडून टाकले. अनेक शतके तशीच गेल्यानंतर तेथे अहिल्याबाई होळकर यांनी विश्वनाथ मंदिर बांधले. राजा रणजितसिंग या हिंदू देशाभिमानी राजाने त्याच्या मुख्य शिखरावर सोन्याचा मुलामा चढविला होता. परंतु तो मुसलमानांनी लूटमार करून नेला. सवाई जयसिंग या वैज्ञानिक राजाने इ.स. १७३७ मध्ये बनारसला मानमंदिर येथे वेधशाळा उभारली होती. इ.स. १७८३ च्या आधीपासून काशीवर इंग्रजांचे राज्य होते. १६ व्या शतकात येथेच संत एकनाथानी "एकनाथी भागवत" हा वारकरी संप्रदायाचा महान ग्रंथ लिहिला.

येथील विद्वान आणि अभ्यासू लोकांच्या वास्तव्यामुळे भारतातले पहिले गव्हर्नमेंट संस्कृत कॉलेज इ.स. १७९१ साली स्थापन झाले. येथे पारंपरिक व आधुनिक खगोलशास्त्रांतील अभ्यास होत असे. आज येथे बनारस हिंदू विद्यापीठ आहे.

मंदिरे[संपादन]

काशी शहरात सुमारे १६५४ मंदिरे आहेत. त्यामुळे यास मंदिराचे शहर असेही म्हणतात. त्यांत प्रमुख मंदिर काशी विश्वेश्वराचे आहे.[२]

इतर[संपादन]

'काश्यां तु मरणमुक्ती': काशीत मरण आल्यास त्या जीवाला मुक्ती मिळते असा समज आहे.[१] काशी, गया आणि प्रयाग अशी त्रिस्थळी यात्रा करण्याचा रिवाज आहे.

भुगोल[संपादन]

काशीला गंगा, यमुना, सरस्वती, किरणा व धूतपापा या नद्या पंचगंगेच्या स्वरूपात आहेत.

हेही पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]