आसनसोल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आसनसोल
আসানসোল
पश्चिम बंगालमधील शहर


आसनसोल is located in पश्चिम बंगाल
आसनसोल
आसनसोल
आसनसोलचे पश्चिम बंगालमधील स्थान

गुणक: 23°40′48″N 86°59′24″E / 23.68000°N 86.99000°E / 23.68000; 86.99000

देश भारत ध्वज भारत
राज्य पश्चिम बंगाल
जिल्हा बर्धमान जिल्हा
क्षेत्रफळ १२७.३ चौ. किमी (४९.२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३१८ फूट (९७ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १२,४३,००८
  - घनता ४,४३४ /चौ. किमी (११,४८० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०
अधिकृत संकेतस्थळ


आसनसोल (बंगाली: আসানসোল) हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्याच्या बर्धमान जिल्ह्यामधील मोठे शहर आहे. “आसन” हा दामोदर नदीच्या किनाऱ्यावरील झाडाचा एक प्रकार आहे. व “सोल” म्हणजे सोल भुमी/Sol-land (खानिजानी समृद्ध भूमि) होय. आसनसोल कोलकाता खालोखाल पश्चिम बंगाल मधील सर्वात मोठे शहर आहे. छोटा नागपुर पठाराच्या मध्यात पश्चिम सीमेवर हे वसलेले आहे. येथील सेनेरैल सायकलचा कारखाना प्रसिद्ध आहे. कोळसा खाणी साठी हे नगर प्रसिद्ध आहे. भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या १०० शहरात जे ११ शहर आहेत हे त्या पैकी एक आहे. येथील स्टील उद्योग देखील प्रसिद्ध आहे.

आसनसोल रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या दिल्ली-हावडा मुख्य रेल्वेमार्गदिल्ली-गया-हावडा रेल्वेमार्ग ह्या दोन्ही प्रमुख मार्गांवरील एक महत्त्वाचे जंक्शन आहे. पूर्व रेल्वे क्षेत्रातील आसनसोल विभागाचे मुख्यालय येथेच स्थित आहे. रेल्वेची चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा येथील चित्तरंजन येथे आहे.