मेघालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मेघालय
भारताच्या नकाशावर मेघालयचे स्थान.
भारताच्या नकाशावर मेघालयचे स्थान
देश भारत ध्वज भारत
स्थापना २१ जानेवारी १९७२
राजधानी शिलाँग
सर्वात मोठे शहर शिलाँग
जिल्हे ११
क्षेत्रफळ २२,४२९ चौ. किमी (८,६६० चौ. मैल) (२२ वा)
लोकसंख्या (२०११)
 - घनता
२९,६४,००७ (२३वा)
 - १३० /चौ. किमी (३४० /चौ. मैल)
प्रमाणवेळ भारतीय प्रमाण वेळ (यूटीसी+०५:३०)
प्रशासन
 - राज्यपाल
 - मुख्यमंत्री
 - विधीमंडळ (जागा)
 - उच्च न्यायालय

व्ही. षण्मुखनाथन
मुकुल संगमा
विधानसभा (६०)
मेघालय उच्च न्यायालय
राज्यभाषा इंग्लिश, खासी, गारो
आय.एस.ओ. कोड IN-ML
संकेतस्थळ: http://meghalaya.gov.in/
ईशान्य भारतामधील मेघालयचे स्थान

मेघालय हे भारत देशाचे एक राज्य आहे. मेघालय भारताच्या ईशान्य भागात स्थित असून त्याच्या उत्तर व पूर्वेस आसाम राज्य तर पश्चिमेस व दक्षिणेस बांगलादेश आहे. शिलाँग ही मेघालयची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. १९७२ साली मेघालय राज्य आसामपासून वेगळे केले गेले. २०११ साली मेघालयची लोकसंख्या सुमारे ३० लाख होती. बहुसंख्य ख्रिश्चन धर्मीय रहिवासी असलेल्या केवळ तीन राज्यांपैकी मेघालय असून इंग्लिश ही येथील राजकीय भाषा आहे.

मेघालय भारतामधील सर्वाधिक वर्षाव होणारे राज्य असून येथे दरवर्षी सरासरी १२,००० मिलीमीटर (४७० इंच) इतका पाऊस पडतो. येथील चेरापुंजी हे गाव जगातील सर्वाधिक पाऊस पडणारे स्थान मानले जाते. मेघालयची अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून असून येथील ८० टक्के जनता शेतीवर गुजराण करते.

येथील डोंगराळ भागामुळे मेघालयमध्ये पायाभुत सुविधा पूर्णपणे विकसित होऊ शकल्या नाहीत ज्यामुळे ह्या राज्याची अर्थव्यवस्था उर्वरित भारताच्या तुलनेत मागासलेली राहिली आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत