कोंडापल्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोंडापल्ली खेळणी

कोंडापल्ली हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील कृष्णा जिल्ह्यात असलेले छोटे शहर आहे. हे शहर विजयवाडापासून १६ किमी अंतरावर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३३,३७३ होती.

कोंडापल्लीमध्ये विशिष्ट प्रकारची खेळणी तयार केली जातात. कोंडापल्ली खेळणी नावाने प्रसिद्ध असलेली ही खेळणी मऊ लाकडातून तयार होतात व त्यावर वनस्पतीजन्य रंग तसेच इनॅमलजन्य रंग लावले जातात.