चिपळूण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?चिपळूण
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
गुणक: 17°32′N 73°31′E / 17.53, 73.52
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

•  m ( ft)
जवळचे शहर खेड
भाषा मराठी
तहसील चिपळूण
पंचायत समिती चिपळूण
कोड
पिन कोड

गुणक: 17°32′N 73°31′E / 17.53, 73.52


चिपळूण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्यातले त्याच नावाच्या तालुक्यातले एक गाव आहे..

चिपळूण
जिल्हा रत्‍नागिरी जिल्हा
राज्य महाराष्ट्र
लोकसंख्या ४६२१३
२००१
दूरध्वनी संकेतांक ०२३५५
टपाल संकेतांक ४१५६०५
वाहन संकेतांक MH-०८
निर्वाचित प्रमुख N/A
(N/A)


इतिहास[संपादन]

विष्णूचा अवतार समजल्या गेलेल्या परशुराम ह्यांनी समुद्र हटवून कोकणभूमी तयार केली अशी आख्यायिका आहे. चिपळूण गावाजवळच लोटे परशुराम येथे परशुरामाचे प्राचीन मंदिरही आहे.

वाहतुकीची साधने[संपादन]

चिपळूण हे मुंबई-गोवा महामार्गावर (राष्ट्रीय महामार्ग १७) वसलेले आहे. चिपळूण हे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील विविध शहरांशी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या (एस.टी.) सेवेने जोडलेले आहे. चिपळूण रेल्वे स्थानक कोकण रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. मात्र हे रेल्वे स्टेशन गावापासून थोडे दूरच आहे.

प्रमुख व्यवसाय[संपादन]

नारळ, पोफळी, कोकमआंब्याच्या बागा हे चिपळूण परिसरातील प्रमुख पारंपरिक व्यवसाय आहेत. आता चिपळूण हे निव्वळ ऐतिहासिक शहर नसून ते एक औद्योगिक शहर बनले आहे. चिपळूण परिसरात अनेक केमिकल्स आणि औषधांचे कारखाने आहेत. वादग्रस्त दाभोळ वीज प्रकल्प येथून जवळच आहे.

चिपळूणजवळची पर्यटनस्थळे[संपादन]

  • परशुराम मंदिर, लोटे परशुराम
  • वाशिष्ठी पॉईंट
  • गुहागर (व्याडेश्वर मंदिर आणि समुद्रकिनारा)
  • डेरवण (छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन दाखवणारी शिल्पसृष्टी)
  • हेदवी [गणपति]
रत्‍नागिरी जिल्ह्यातील तालुके
मंडणगड | दापोली | खेड | चिपळूण | गुहागर | संगमेश्वर | रत्‍नागिरी | लांजा | राजापूर