संगमेश्वर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?कसबा
संगमेश्वर
महाराष्ट्र • भारत
—  नगर  —
संगमेश्वर दर्शविणारा नकाशा
महाराष्ट्र दर्शविणारा छोटा भारत नकाशा
भारतातील संगमेश्वर चे स्थान
संगमेश्वर
गुणक: 17°10′19″N 73°32′10″E / 17.17194°N 73.53611°E / 17.17194; 73.53611
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ३७ मी
जवळचे शहर रत्‍नागिरी
प्रांत कोकण
जिल्हा रत्‍नागिरी
लोकसंख्या
लिंग गुणोत्तर
३३,९९३ (2011)
१,०९७ /
भाषा मराठी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४१५६११
• +०२३५४
• MH 08

गुणक: 17°10′19″N 73°32′10″E / 17.17194°N 73.53611°E / 17.17194; 73.53611

संगमेश्वर
जिल्हा रत्‍नागिरी जिल्हा
राज्य महाराष्ट्र
लोकसंख्या N/A
२००१
दूरध्वनी संकेतांक ०२३५४
टपाल संकेतांक ४१५६११
वाहन संकेतांक MH-०८
निर्वाचित प्रमुख N/A
(सरपंच)

संगमेश्वर हे रत्‍नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक गाव आहे. या तालुक्याचे मुख्यालय संगमेश्वर गावापासून १७ किलोमीटरवर असलेल्या देवरुख येथे आहे. देवरुख गावात संगमेश्वर तालुक्याचे पंचायत समिती कार्यालय आहे.

सोनवी आणि शास्त्री या दोन नद्यांच्या संगमावर हे शहर वसले असल्याने याला संगमेश्वर असे नाव मिळाले आहे. ते परिसरातील एक महात्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत येथून रत्‍नागिरीपर्यंत बोटीने जाता येत असे. संगमेश्वर हे मुंबई - गोवा महामार्गावर (राष्ट्रीय महामार्ग ६६वर) वसलेले आहे. तसेच कोकण रेल्वेने देखील संगमेश्वरला जाता येते. संभाजीराजांचे मुख्य ठाणे शृगारपूर हे संगमेश्वरच्या जवळच आहे.

प्रसिद्ध मार्लेश्वराचे देऊळ येथून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर आहे. मार्लेश्वर हे देवालयातील साप आणि देवालयापाठच्या नयनरम्य धबधब्यासाठी प्रसिद्ध आहे.

औरंगजेबाच्या सैनिकांनी मराठ्यांचा राजा संभाजी याला संगमेश्वर येथील एका देवळात पकडले आणि चालवत चालवत आळंदीजवळच्या तुळापूरला नेले.

आख्यायिका[संपादन]

संगमेश्वर हे देवळांचे गाव आहे. हया परिसरात सुमारे ७० पांडवकालीन देवालये आहेत. त्यातले कर्णेश्वराचे एका दगडातून कोरलेले भव्य देऊळ विशेष प्रसिद्ध आहे. ह्या महादेवाच्या देवालयात ५ पालथी ताटे कोरलेली आहेत. आख्यायिकेनुसार पांडव वनवासात असताना त्यांनी कर्ण नामक राजाच्या पणानुसार एका रात्रीत एका दगडातून हे देवालय कोरले. त्यानंतर थकून भागून ते जेवायला बसले असता कोंबडा आरवला. पांडव तसेच त्यांची ताटे पालथी टाकून उठले. देवालयात पांडवकालीन लिपीत कोरलेले लेख आहेत. जेव्हा हे लेख कोणी वाचू शकेल तेव्हा पालथी पाने सुलटी होतील आणि त्या मनुष्याला ताटांखाली लपवलेले द्रव्य मिळेल, अशी समजूत आहे.. कर्णेश्वराच्या देवालयाजवळ एक सूर्यमंदिर आहे.

प्रसिद्ध[संपादन]

संगमेश्वर मधील हॉटेल गणेश यांच्या दुकानामधील खोबर्‍याचे 'मोदक' प्रसिद्ध आहेत.

मार्गदर्शिका[संपादन]

संगमेश्वर बसस्थानकापासून संगमेश्वर रेल्वेस्टेशन ४ कि.मि.अंतरावर आहे. संगमेश्वर बसस्थानकापासून देवरुख १७ कि.मि.अंतरावर आहे. साखरपाला जाण्यासाठी दर ३०मिनिटांनी देवरुख येथून बस आहेत. 'कोल्हापूर' ला जाण्यासाठी या मार्गाचा वापर होऊ शकतो तसेच संगमेश्वराहून रत्नागिरी ,लांजा,आणि राजापूरकडे जाणाऱ्या बसेस आहेत.


  1. अनुक्रम यादी घटक
[ चित्र हवे ] [ चित्र हवे ]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.